भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, April 4, 2025

१४१७. गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे ।

अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥

विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.

Thursday, April 3, 2025

१४१६. नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः।

नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥

ज्याप्रमाणे एक वीणा तारे शिवाय आणि रथ चाका शिवाय चालवता येत नाही, त्याच प्रमाणे एक स्त्री तिच्या पती शिवाय सुखी राहू शकत नाही, जरी तिला शंभर पुत्र असतील तरीही

Wednesday, April 2, 2025

१४१५. आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः |

राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमम् ||

दयाळूपणा, करुणा, विद्वत्ता, सत्चरित्रता, आत्मसंयम, शांत स्वभाव, हे सहा गुण नेहमी भगवान रामाला सुशोभित करतात.

Monday, March 31, 2025

१४१४. अव्याहृतं व्याहृताच्छ्रेय आहु:

सत्यं वदेद्‌ व्याहृतं तत्‌ द्वितीयम्‌ ।

प्रियं वदेद्‌ व्याहृतं तत्‌ तृतीयं

धर्मं वदेद्‌ व्याहृतं तच्चतुर्थम्‌ ॥

बोलण्यापेक्षा न बोलण हेच चांगलं सांगितलं आहे. [बोलणं वाणीचं प्रथम वैशिष्ट्य आहे आणि जर बोलावं लागलं तर] खरं बोलणं हे वाणीचं दुसरं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मौनाची अपेक्षा पण अधिक लाभदायक आहे. [सत्य आणि] प्रिय बोलणं वाणीचे तिसरे वैशिष्ट्य आहे. [जर सत्य, प्रिय] यांच्या बरोबर जर धर्म संम्मत बोलणे ही वाणीची चौथी विशेषता आहे. [यांच्यामध्ये उत्तरोत्तर श्रेष्ठता आहे.

Sunday, March 30, 2025

१४१३. न प्रहॄष्यति सन्माने नापमाने च कुप्यति।

न क्रुद्ध: परूषं ब्रूयात् स वै साधूत्तम: स्मॄत:॥

जो माणूस सन्मान केल्यावर आनंदी होत नाही आणि अपमान केल्यावर त्याला राग येत नाही, व राग आला तरी कठोर बोलत नाही, त्यालाच सज्जन माणसांमध्ये श्रेष्ठ म्हणतात.

Friday, March 28, 2025

१४१२. न कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचित् रिपु:।

कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवस्तथा॥

कोणी कोणाचा मित्र नाही किंवा शत्रु सुद्धा नाही. कारणानेच लोक शत्रु किंवा मित्र बनतात.

Wednesday, March 26, 2025

१४११. यस्मिन् जीवति जीवन्ति बहवः स तु जीवति |

काकोऽपि किं न कुरुते चञ्च्वा स्वोदरपूरणम् ||

ज्याच्या जगण्यामुळे अनेक लोकांचे जीवन चालते, तोच माणूस [जीवनात] खरा विजयी म्हटला जातो. जो जगल्यामुळे खूप लोकांना जगण्यासाठी (मदत)ह़ोते.तोच खरा जगला.(त्याच्या जगण्याचं सार्थक झाले, नाही तर) कावळे सुद्धा चोचीने आपले पोट भरत नाहीत काय?