भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Monday, August 10, 2026

१५११. दर्शनध्यानसंस्पर्शै: मत्स्यी कूर्मी च पक्षिणी ।

१५११. दर्शनध्यानसंस्पर्शै: मत्स्यी कूर्मी च पक्षिणी ।  

शिशुं पालयते नित्यं तथा सज्जनसंगति: ॥


अर्थ :- 

माशांची मादी (आपल्या संततीला फक्त) समोर ठेवते ‌(नजरे आड होऊ देत नाही.), कासवाची मादी नुसती मनात पिल्लांच्या संगोपन याबद्दल विचार करते, पक्षीण पिलांना स्पर्श करून सूचना देते. त्याप्रमाणे भली माणस सर्व प्रकारांनी आपल्या सोबत्यांची काळजी घेतात.


हिंदी अनुवाद

"मछली केवल अपनी संतान को अपने सामने (नज़रों के सामने) रखती है, कछुआ केवल अपने मन में बच्चों के पोषण का विचार करता है, और चिड़िया (पक्षी) अपने बच्चों को स्पर्श करके निर्देश देती है। ठीक उसी प्रकार, सज्जन (अच्छे) लोग हर तरह से अपने साथियों की देखभाल और रक्षा करते हैं।"

English Translation

"A fish cares for her offspring merely by keeping them before her eyes, a female tortoise nurtures her young ones simply through her thoughts, and a mother bird guides her chicks through touch. In the very same manner, noble people care for and protect their companions in every possible way."

Friday, July 10, 2026

१४९२. दृढतरगलकनिबन्ध: कूपनिपातोsपि कलश , ते धन्य:।

१४९२. दृढतरगलकनिबन्ध: कूपनिपातोsपि कलश , ते धन्य:। 

यज्जीवनदानैस्त्वं तर्षामर्षं नृणां हरसि ॥


अर्थ :- हे कळशी, जरी विहिरी मध्ये तुझा अध:पात झाला असला , तुझ्या गळ्यात पक्का फास आवळलेला असला तरी तू कृतकृत्य आहेस. कारण की जीवन (पाणी)दान करून तू लोकांची तहान भागवतेस.


हिंदी अनुवाद

हे कलश (घड़े), भले ही कुएँ में तेरा पतन (पतन/गिरना) हुआ हो, और तेरे गले में पक्का फंदा कसा हुआ हो, फिर भी तू कृतकृत्य (धन्य) है। क्योंकि जीवन (पानी) का दान देकर तू लोगों की प्यास बुझाता है।

English Translation

O pitcher, even though you have fallen into the well and a tight noose is fastened around your neck, you are still fulfilled and blessed. For by donating life (water), you quench the thirst of the people.

Saturday, June 27, 2026

१४८२. देवानाञ्च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभम्।

१४८२. देवानाञ्च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभम्।

बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्


अर्थ :- देव आणि ऋषींचे गुरु असणाऱ्या, सुवर्णासारखी (सोन्यासारखी) कांती (तेज) असणाऱ्या, बुद्धीचे मूर्तिमंत रूप आणि तिन्ही लोकांचे स्वामी असणाऱ्या, त्या भगवान बृहस्पतींना (गुरु ग्रहाला) मी वंदन करतो.


हिंदी अनुवाद

देवताओं और ऋषियों के गुरु, सुवर्ण (सोने) के समान कांति (चमक) वाले, बुद्धि के प्रतीक और तीनों लोकों के स्वामी, उन भगवान बृहस्पति को मैं प्रणाम करता हूँ।

English Translation

I bow to Lord Brihaspati (Jupiter), who is the preceptor (Guru) of the Gods and sages, who shines with a golden complexion, who is the embodiment of intellect, and the lord of the three worlds.

Friday, June 19, 2026

१४७५. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम्।

 १४७५. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम्।

नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्॥२॥

अर्थ :- दही, शंख आणि दवबिंदू प्रमाणे दिसणाऱ्या, क्षीरसागरात जन्मलेल्या, भगवान शंकराचे शिरोभागी शोभून दिसणाऱ्या सुंदर अशा चंद्राला (मी) नमस्कार करतो/ते. 

नवग्रह स्तोत्र हे महर्षी व्यास यांनी रचलेले एक अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. यामध्ये नऊ ग्रहांची (सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू) स्तुती करून त्यांच्याकडून शुभ आशीर्वाद मागितले आहेत.

हिंदी अनुवाद

"दही, शंख और ओस की बूंदों के समान (श्वेत) दिखने वाले, क्षीरसागर (दूध के सागर) से उत्पन्न हुए और भगवान शिव के सिर पर सुशोभित होने वाले, ऐसे सुंदर चंद्रमा को मैं नमस्कार करता/करती हूँ।"

English Translation 

"I bow to the beautiful Moon, who resembles the whiteness of yogurt, conch shell, and dew-drops, who was born from the Ocean of Milk, and who adorns the head of Lord Shiva."

Tuesday, February 9, 2021

१३९९. दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।

दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥
 

अर्थात 

श्री कृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा‌ व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले!

माघ कवींनी केलेली कृष्ण स्तुती 

साभार : विश्वंभर मुळे (गोंदीकर)

Monday, October 27, 2014

१३६०. दुर्मन्त्रिणं कमुपयान्ति न नीतिदोषाः सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगाः |

कं श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः कं स्वीकृता न विषया ननु तापयन्ति ||

अर्थ

चुकीचा / वाईट सल्ला देणाऱ्या कुणाला नीतिमत्तेचे दोष चिकटत नाहीत? [बदसल्ला दिल्यावर नाचक्की होतेच] कुपथ्य केल्यावर कोणाचा आजार बळावत नाही? संपत्ती कुणाला माज आणत नाही? मरण कुणाला चुकलय? भौतिक सुखांच्या मागे लागून कोणाला त्रास होत नाही? [या कुपथ्य वगैरे गोष्टी टाळणं चांगलं.श्रीमंतानी गर्विष्ठपणा करू नये. मृत्यु अटळ आहे तरी वाईट कामे करू नये.]

Monday, October 13, 2014

१३५७. दुरधीता विषं विद्या अजीर्णे भोजनं विषम् |

विषं गोष्ठी दरिद्रस्य विषं व्याधिरवीक्षितः ||

अर्थ

शिक्षण वाईट रीतीने [लक्ष न देता; गर्वाने अभ्यास न करता; वाईट हेतू मनात ठेऊन] घेतल्यास विषाप्रमाणे असते. आधीच अजीर्ण झालं असताना जेवण हे विष होय. घोळक्यात [नुसतं गप्पा] मारत बसणं गरीब माणसाला विषाप्रमाणे आहे. औषध न करता ठेवलेला आजार अगदी धोकादायक आहे.

Thursday, May 22, 2014

१२७५. देहे पातिनि का रक्षा यशो रक्ष्यमपातवत् |

नरः पतितकायोऽपि यशःकायेन जीवति ||

अर्थ

[केंव्हातरी निश्चितपणे मृत्युमुखी] पडणाऱ्या शरीराच्या रक्षणाबद्दल [अतिचिंता] कशाला करायची?  कीर्तिला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. [कारण] मरून गेल्यावर सुद्धा मनुष्य कीर्तिरूपं शरीराने जिवंत राहतो.

Monday, May 12, 2014

१२६८. दोषोऽपि गुणतां याति प्रभोर्भवति चेत्कृपा |

अङ्गहीनोऽपि सूर्येण सारथ्ये योजितोऽरुणः ||

अर्थ

जर धन्याची कृपादृष्टी असेल तर असलेला एखादा दोष गुणाप्रमाणे भासतो. [त्या दोषाचा तोटा न होता फायदाच होतो] विकलांग [पांगळा] असूनही सूर्याने अरुणाला सारथी नेमले आहे. [त्याला पाय नसले तरी त्याचा वेळ अगदी चांगला जातो. त्याला काही फरकच पडत नाही.]

Wednesday, May 7, 2014

१२६५. देशे देशे किमपि कुतुकादद्भुतं लोकमानाः संपाद्यैव द्रविणमतुलं सद्म भूयोऽप्यवाप्य |

संयुज्यन्ते सुचिरविरहोत्कण्ठिताभिःसतीभिः सौख्यं धन्याःकिमपि दधते सर्वसंपत्समृद्धाः ||

अर्थ

अगदी भरपूर संपत्ती मिळवून परदेशातल्या आश्चर्य वाटेल अशा विविध गोष्टी पाहून आपल्या घरी परत आल्यावर, अतिशय श्रीमंती मिळवलेल्या; कृतकृत्य अशा [कामासाठी परदेशी राहिलेल्याना] पुष्कळ काळपर्यंत झालेल्या विरहामुळे उत्कंठित झालेल्या प्रियेचा सहवास मिळाल्याने अपूर्व सुखाचा अनुभव मिळतो.

Tuesday, April 29, 2014

१२५९. दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता |

अभ्यासेन न लभ्येयुश्चत्वारः सहजाः गुणाः ||

अर्थ

औदार्य; गोड बोलणं; धैर्य आणि बरोबर किंवा चूक समजणे हे चारी गुण [काही व्यक्तींना] जन्मजात असतात. ते प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत .

Wednesday, March 19, 2014

१२३०. दृष्ट्वाऽऽत्मनि जये व्यग्रान्नृपान्हसति भूरियम् |

अहो मां विजिगीषन्ति मृत्योः क्रीडनका नृपाः ||

अर्थ

आपल्याला [पृथ्वीला] जिंकण्याचा खटाटोप करणाऱ्या राजांकडे पाहून ही पृथ्वी [त्यांचा उपहास करत] हसून म्हणते "मृत्यूच्या हातातली बाहूल असलेले हे राजे आणि मला जिंकायची हाव धरतायत !"

Thursday, January 2, 2014

११८०. दुर्जनः प्रियवादीति नैतद्विश्वासकारणम् |

मधु तिष्ठति जिह्वाग्रे हृदये तु हलाहलम् ||

अर्थ

गोड बोलणारा आहे म्हणून दुष्ट माणसावर विश्वास ठेवणे [बरोबर] नाही. [त्याच्या] जिभेवर  मधा [सारखी गोड भाषा] असते पण मनात मात्र जहरी विष असत.

Thursday, December 19, 2013

११७०. दिनमेकं शशी पूर्णः क्षीणस्तु बहुवासरान् |

सुखाद्दुःखं सुराणामप्यधिकं का कथा नृणाम् ||

अर्थ

[देव असूनसुद्धा] चन्द्र एकाच [पौर्णिमेच्या रात्री] पूर्ण बिंब अश्या स्थितीत असतो. तो पुष्कळ दिवस क्षीण राहतो. मग देवांना सुद्धा सुखापेक्षा दुःख अधिक भोगवं लागत, तर माणसांची काय कथा?

Monday, December 2, 2013

११५५. दातव्यं भोक्तव्यं सति विभवे सञ्चयो न कर्तव्यः |

पश्येह मधुकरीणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये ||

अर्थ

आपल्याकडे जर खूप संपत्ती असेल तर दान करावं; उपभोग घ्यावा. साठवत बसू नये. असं पहा की मधमाशांनी साठवलेला [मध ना त्या स्वतः खातात ना दान करतात] दुसरेच [त्यांचं पोळ जाळून मध] पळवतात.

Friday, November 29, 2013

११५४. दिनयामिन्यौ सायंप्रात:शिशिरवसन्तौ पुनरायात: |

काल: क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः ||

अर्थ

रात्र आणि दिव; सकाळ नंतर संध्याकाळ अशा रीतीने सर्व ऋतु एकापाठोपाठ एक पुन्हा पुन्हा येऊन जातात. काळ असा खेळ करत असतो [आपलं] आयुष्य निघून जात तरीदेखील आशा [हाव] संपत नाही. [या आशा हा; काळज्या सोडून देऊन ईशचिंतनात माणसांनी आयुष्य व्यतीत केलं पाहिजे.]

Friday, November 1, 2013

११२८. दक्षः श्रियमाधिगच्छति पथ्याशी कल्यतां सुखमरोगी |

अभ्यासी विद्यान्तं धर्मार्थयशांसि च विनीतः ||

अर्थ

जो सतर्क असतो त्याला श्रीमंती मिळते. आरोग्यदायी अन्न सेवन करणाराची तब्बेत चांगली राहते. सुदृढ माणूस सुखी असतो. अभ्यासूवृत्तीच्या माणसाला अगदी वरपर्यंत शिकता येत. चांगल्या वळणाच्या माणसाला धर्म; संपत्ती आणि कीर्ति यांचा लाभ होतो.

Monday, July 15, 2013

१०६४. दानेन तुल्यः निधिरस्ति नान्यः संतोषतुल्यं सुखमस्ति किं वा |

विभूषणं शीलसमं कुतोऽस्ति ? लाभोऽस्ति  नारोग्यसमः पृथिव्याम् ||

अर्थ

दान देण्यासारखा [उत्तम] दुसरा खजिना नाही. समाधानासारखं दुसरं कुठलं सुख आहे काय? चारित्र्यासारखा [उत्कृष्ट] दागिना मिळतो काय? या जगात तंदुरुस्ती सारखा दुसरा कुठलाही फायदा नाही.

Saturday, July 13, 2013

१०६३. द्वाविमावुदधौ क्षेप्यौ कण्ठे बद्ध्वा दृढां शिलाम् |

श्रीमान्न योऽर्हते दत्ते दरिद्रो योऽलसः सदा ||

अर्थ

गळ्यात मोठा धोंडा चांगला घट्ट बांधून या दोघांना समुद्रात फेकल पाहिजे. - जो श्रीमंत असून लायक व्यक्तीला दान करत नाही त्याला आणि जो गरीब असून सतत आळशीपणा करतो त्याला.

Friday, July 5, 2013

१०५६. दिवाकराद्रक्षति यो गुहासु लीनं दिवाभीतमिवान्धकारम् |

क्षुद्रेऽपि नूनं शरणं प्रपन्ने ममत्वमुच्चैः शिरसामतीव ||   कुमारसम्भव कालिदास

अर्थ

घुबडाप्रमाणेच सूर्याला भिणाऱ्या गुहांमध्ये दडलेल्या; अंधाराचे [उच्चतम असा हिमालय पर्वत] सूर्यापासून रक्षण करतो. खरोखर अगदी क्षुल्लक [व्यक्ती] जरी शरण आली तरी थोर लोकांना [मनाची आणि शरीराची उंची श्रेष्ठ असणाऱ्यांना] त्यांच्याबद्दल फारच आपलेपणा वाटतो.