भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Wednesday, July 15, 2026

१४९४. न देवाय न धर्माय न बन्धुभ्य:न चार्थिने ।

१४९४. न देवाय न धर्माय न बन्धुभ्य:न चार्थिने । 

कृपणस्यार्जितं वित्तं ह्रीयते खलु तस्करै:॥


अर्थ :- कंजूस माणसाची संपत्ती नातेवाईक, गरजू लोक, देव धर्म यांच्यासाठी उपयुक्त ठरत नाही. कंजूस माणसाने  मिळवलेले धन चोर चोरून नेतात.


हिंदी अनुवाद

कंजूस व्यक्ति की संपत्ति रिश्तेदारों, जरूरतमंद लोगों या भगवान और धर्म के काम नहीं आती। कंजूस इंसान द्वारा कमाया गया धन चोर चुराकर ले जाते हैं।

English Translation

The wealth of a miser is of no use to relatives, the needy, or for divine and religious purposes. The money accumulated by a miser is ultimately stolen away by thieves.

Monday, June 29, 2026

१४८४. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।

१४८४. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्।

छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥


अर्थ :- काजळासारखी किंवा नीलम मण्यासारखी गडद निळी कांती असणाऱ्या, सूर्यपुत्र आणि यमराजांचे मोठे बंधू असणाऱ्या, सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र असणाऱ्या, त्या मंदगतीने चालणाऱ्या शनिदेवांना मी वंदन करतो.

हिंदी अनुवाद

काजल या नीलमणि के समान गहरे नीले रंग की कांति वाले, सूर्यदेव के पुत्र और यमराज के बड़े भाई, तथा माता छाया और सूर्यदेव से उत्पन्न, उन मंद गति से चलने वाले शनिदेव को मैं प्रणाम करता हूँ।

English Translation

I bow to Shani (Saturn), who possesses a dark blue radiance like blue collyrium (or blue sapphire), who is the son of the Sun god and the elder brother of Yama, who was born to Chhaya and Martanda (the Sun), and who moves slowly.

Thursday, June 25, 2026

१४८०. नीरक्षीरविवेके हंस आलस्यम् त्वम् एव तनुषे चेत्।

१४८०. नीरक्षीरविवेके हंस आलस्यम् त्वम् एव तनुषे चेत्।

विश्वस्मिन् अधुना अन्य: कुलव्रतं पालयिष्यति क:॥


अर्थ :- हे हंसा, दूध आणि पाणी वेगळे करण्याच्या तुझ्या कौशल्यात (विवेकबुद्धीत) जर तूच आळस केलास, तर मग या संपूर्ण जगात आपल्या कुळाचे व्रत (कर्तव्य) दुसरा कोण पाळणार?


हिंदी अनुवाद

हे हंस! यदि दूध और पानी को अलग-अलग करने के अपने कौशल (विवेक) में तुम ही आलस्य करोगे, तो फिर इस संपूर्ण संसार में अपने कुल के व्रत (कर्तव्य) का पालन दूसरा कौन करेगा?

English Translation

O Swan! If you yourself show laziness in your skill (wisdom) of separating milk from water, then who else in this entire world will fulfill the sacred vow (duty) of their lineage?

Thursday, June 4, 2026

१४६०. न राज्यं न राजासीन्न दण्डो न च दाण्डिकः ।

१४६०. न राज्यं न राजासीन्न दण्डो न च दाण्डिकः ।

धर्मेणैव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम् ॥


अर्थ :- 

हे मूळ संस्कृत सुभाषित महाभारतातील (शांतीपर्व) आहे.

त्या काळात (सत्ययुगात किंवा आदर्श समाजात) कोणतेही राज्य नव्हते आणि कोणीही राजा नव्हता; तसेच कोणालाही शिक्षा (दण्ड) नव्हती आणि शिक्षा देणारा कोणी अधिकारीही (दण्डिक) नव्हता. सर्व प्रजा केवळ 'धर्माच्या' (कर्तव्य आणि नैतिकतेच्या) पालनानेच एकमेकांचे रक्षण करत असत.

हे सुभाषित अशा एका आदर्श आणि प्रगल्भ समाजाचे वर्णन करते, जिथे लोकांमध्ये इतकी उच्च नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन करण्याची स्वयंशिस्त होती की, समाज चालवण्यासाठी कोणत्याही राजाची, पोलिसांची किंवा शासन व्यवस्थेची गरज पडत नव्हती. लोक स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागत असत.


Hindi Translation (हिंदी अनुवाद)

"यह मूल संस्कृत सुभाषित महाभारत के (शांतिपर्व) से है।

उस काल में (सत्ययुग या आदर्श समाज में) न तो कोई राज्य था और न ही कोई राजा था; वैसे ही न तो किसी के लिए दंड (सजा) था और न ही दंड देने वाला कोई अधिकारी (शासक) था। सभी प्रजा केवल 'धर्म' (कर्तव्य और नैतिकता) का पालन करते हुए परस्पर (एक-दूसरे की) रक्षा करती थी।

यह सुभाषित एक ऐसे आदर्श और परिपक्व समाज का वर्णन करता है, जहाँ लोगों में इतने उच्च नैतिक मूल्य और कानून का पालन करने का आत्म-अनुशासन (स्वयंशिस्त) था कि समाज चलाने के लिए किसी राजा, पुलिस या शासन व्यवस्था की आवश्यकता ही नहीं पड़ती थी। लोग अपने कर्तव्य को समझते हुए आपस में मिल-जुलकर (प्रेमपूर्वक) रहते थे।"


English Translation (अंग्रेजी अनुवाद)

"This original Sanskrit subhashita (wise saying) is from the Mahabharata (Shanti Parva).

In that era (the golden age or an ideal society), there was neither a kingdom nor a king; likewise, there was no punishment (Danda) nor any authority (Dandika) to inflict punishment. All citizens protected each other solely through the practice of 'Dharma' (righteousness, duty, and morality).

This subhashita describes an ideal and evolved society, where people possessed such high moral values and self-discipline to follow rules that there was no need for a king, police, or governance system to run the society. Being mindful of their duties, people lived together in perfect harmony and goodwill."


Tuesday, June 2, 2026

१४५८. न वेत्ति यो यस्य गुणप्रकर्षं स तं सदा निन्दति नाsत्र चित्रम‌् ।

१४५८. न वेत्ति यो यस्य गुणप्रकर्षं  स तं सदा  निन्दति नाsत्र चित्रम‌् । 

यथा किराती करिकुम्भलग्नां मुक्तां परित्यज्य बिभर्ति गुञ्जाम् ॥


अर्थ :-  एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचे उत्तम गुण न कळल्याने (सामान्य माणूस त्याची सारखी निंदा करतो) यात काहीच नवल नाही. हत्तीच्या गंडस्थळावरचा (अमूल्य असा) मोती टाकून देऊन भिल्ल स्त्रीला जसं गुंजेची फळ (वेणीत) गुंफावीशी वाटतात तसंच (हे निंदा करणं) आहे.


Hindi Translation (हिंदी अनुवाद)

"यदि किसी श्रेष्ठ व्यक्ति के उत्तम गुणों को न समझ पाने के कारण (कोई सामान्य मनुष्य लगातार उसकी निंदा करता है), तो इसमें कोई आश्चर्य की बात नहीं है। यह ठीक वैसा ही है, जैसे कोई भील महिला हाथी के मस्तक से निकले (अमूल्य) गजमुक्ता (मोती) को फेंक कर, उसकी जगह गूंजे के फलों (चिरमिटी के दानों) को अपनी वेणी (बालों) में पिरोना पसंद करती है।"


English Translation (अंग्रेजी अनुवाद)

"It is not at all surprising if an ordinary person constantly criticizes a great individual because they fail to understand their noble qualities. It is just like a tribal (Bhilla) woman who throws away the priceless pearl obtained from an elephant's forehead, choosing instead to weave cheap gunja seeds (rosary peas) into her hair."

Sunday, May 31, 2026

१४५६. न विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत् ।

१४५६. न विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत् । 
कदाचित्कुपितं मित्रं सर्वगुह्यं प्रकाशयेत् ॥

अर्थ :- 

अयोग्य मित्रावर विश्वास ठेवू नये. (जवळच्या) मित्रावर देखील (आंधळा) विश्वास टाकू नये. चिडलेला मित्र एखाद्या वेळी सर्व गुप्त गोष्टी सांगून टाकेल.

Hindi Translation (हिंदी अनुवाद)

"अयोग्य (बुरे) मित्र पर कभी विश्वास नहीं करना चाहिए। यहाँ तक कि अपने (करीबी) मित्र पर भी (अंधा) विश्वास नहीं करना चाहिए। क्योंकि यदि वह मित्र कभी आपसे रुष्ट (क्रोधित) हो गया, तो वह आपकी सभी गुप्त बातें (भेद) दूसरों के सामने उजागर कर सकता है।"


English Translation (अंग्रेजी अनुवाद)

"One should never trust an untrustworthy friend. In fact, one should not put blind faith even in a close friend. For if that friend ever gets angry or upset with you, they might reveal all your secrets to everyone."


Saturday, May 30, 2026

१४५५. नराणां नापितो धूर्त:पक्षिणां चैव वायस:।

१४५५. नराणां नापितो धूर्त:पक्षिणां चैव वायस:।

चतुष्पदां शृगालस्तु स्त्रीणां धूर्ता तु मालिनी ॥


अर्थ :- न्हावी माणसांमध्ये धूर्त असतो. कावळा पक्ष्यांमध्ये धूर्त असतो. चार पायांच्या प्राण्यांमध्ये कोल्हा लबाड असतो. बायकांमध्ये माळ्याची बायको लबाड असते.


Hindi Translation (हिंदी अनुवाद)

"मनुष्यों में नाई सबसे चतुर (धूर्त) होता है। पक्षियों में कौआ चतुर होता है। चार पैरों वाले जानवरों में लोमड़ी (सियार) सबसे चालाक होती है। और महिलाओं में मालिन (माली की पत्नी) सबसे चालाक होती है।"


English Translation (अंग्रेजी अनुवाद)

"Among men, the barber is the shrewdest. Among birds, the crow is the craftiest. Among four-legged animals, the fox (jackal) is the most cunning. And among women, the florist's (gardener's) wife is the most wily."

Thursday, October 16, 2025

१४२९. नानाशास्त्रविदो लोका नानादैवतपूजका:।

आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम्॥


अर्थ :

माणसं वेगवेगळ्या विद्यांमध्ये कौशल्य मिळवतात, निरनिराळ्या देवतांची पूजा करतात. (पण) , हे अर्जुना,  आत्मज्ञाना शिवाय या कुठल्याही गोष्टीचा (मोक्षप्राप्ती साठी) उपयोग नाही.


हिंदी अनुवाद : 

"मनुष्य विभिन्न विद्याओं में निपुणता प्राप्त करता है और अलग-अलग देवताओं की पूजा करता है, परंतु हे अर्जुन, आत्मज्ञान के बिना इन में से किसी का भी (मोक्ष प्राप्ति के लिए) कोई उपयोग नहीं है।"


English translation:
"People attain mastery in different sciences and worship various deities, but O Arjuna, without self-knowledge, none of these lead to Moksha [Liberation]."

Monday, September 22, 2025

१४२६. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ।

 मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥


अर्थ : परमेश्वराने भक्तीचा महिमा सांगितला आहे.

(श्रीकृष्ण म्हणतात) हे नारदा, मी वैकुंठात (देखील) नसतो, योगाचरण करणाऱ्याच्या कडे (सुद्धा) नाही, सूर्यावर नाही,(पण) माझे भक्त जिथे (नाम) गायन करतात तिथे मी उभा राहतो.

अर्थ हिन्दी :

श्रीकृष्ण, नारद मुनि से कहते हैं कि मैं न तो अपने वैकुंठ (निवास स्थान) में रहता हूँ और न ही योगियों के हृदय में रहता हूँ, बल्कि मैं तो वहीं निवास करता हूँ जहाँ मेरे भक्त मेरे नाम का कीर्तन (गायन या गुणगान) करते हैं। 

Meaning in English : 

(Lord Krishna says) "O' Narada, I do not reside in Vaikuntha, nor in the heart of the yogis, nor on the sun, but I stand wherever my devotees sing (my name).

Friday, August 1, 2025

१४२२. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।

येन त्वया भारत तैल पूर्णः

प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः ।।


अर्थ : 

प्रकांड पंडित असणाऱ्या, पूर्ण उमललेल्या कमळाच्या पाकळी प्रमाणे दीर्घ नेत्र असणाऱ्या आणि ज्यांनी (महा)भारत रूपी अगदी भरपूर तेल असणारा, ज्ञानमय असा झगझगीत प्रकाश देणारा दीप प्रज्वलित केलात अशा, हे व्यास महर्षी, तुम्हाला (मी) वंदन करतो/ते. 

Thursday, April 3, 2025

१४१६. नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः।

नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥

ज्याप्रमाणे एक वीणा तारे शिवाय आणि रथ चाका शिवाय चालवता येत नाही, त्याच प्रमाणे एक स्त्री तिच्या पती शिवाय सुखी राहू शकत नाही, जरी तिला शंभर पुत्र असतील तरीही

Sunday, March 30, 2025

१४१३. न प्रहॄष्यति सन्माने नापमाने च कुप्यति।

न क्रुद्ध: परूषं ब्रूयात् स वै साधूत्तम: स्मॄत:॥

जो माणूस सन्मान केल्यावर आनंदी होत नाही आणि अपमान केल्यावर त्याला राग येत नाही, व राग आला तरी कठोर बोलत नाही, त्यालाच सज्जन माणसांमध्ये श्रेष्ठ म्हणतात.

Friday, March 28, 2025

१४१२. न कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचित् रिपु:।

कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवस्तथा॥

कोणी कोणाचा मित्र नाही किंवा शत्रु सुद्धा नाही. कारणानेच लोक शत्रु किंवा मित्र बनतात.

Tuesday, August 9, 2022

१४०३. न त्वमात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे ।

तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ||

कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा। 

नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]


अर्थ

हे ( माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.

Tuesday, February 9, 2021

१३९७. न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।

नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।


अर्थ 

जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाहीये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाहीये. 

'किरातार्जुनीयम्' ह्या काव्य संग्रहात महाकवी 'भारवि' ह्यांनी केवळ 'न' चा वापर करून श्लोक तयार केला आहे.


Monday, December 15, 2014

१३७६. नष्टं मृतमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः |

पण्डितानां च मूर्खाणां विशेषोऽयं यतः स्मृतः ||

अर्थ

मेलेले [संबंधित] नाहीशा झालेल्या [वस्तू] आणि गतकाळ याबद्दल ज्ञानी लोक दुःख करीत नाहीत. [आणि सामान्य शोक करत बसतात.] म्हणून ज्ञानी आणि मूर्ख यातला हाच [महत्वाचा] फरक सांगितला आहे.

Friday, October 17, 2014

१३५९. न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः |

यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः || भागवत

अर्थ

दुष्ट लोकांच्या मर्मावर बोट ठेवणाऱ्या वाग्बाणांनी माणसाची जशी तडफड होते, तितकी बाणांनी अगदी मर्मावर जखम झाली तरी [वाग्बाणांएवढी] तडफड होत नाही.

Friday, October 10, 2014

१३५६. नाविदग्धः प्रियं ब्रूयात्स्फुटवक्ता न वञ्चकः |

निःस्पृहो नाधिकारी स्यान्नाकामी मण्डनप्रियः ||

अर्थ

अपरिपक्व माणूस गोड बोलत नाही. स्पष्टवक्ता लबाड [फसवणारा] नसतो. निरिच्छ माणूस  कुठल्या जबाबदाऱ्या घेत नाही. कामेच्छा नसणारा कधी नटणमुरडणं करत नाही.

Wednesday, September 24, 2014

१३४९. नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कृथाः |

अत्यन्तसरसहृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि ||

अर्थ

हे कूपा [विहिरी] मी अतिशय नीच [हलकट; कमी उंची असणारा] आहे, याबद्दल अजिबात दुःख करू नकोस. कारण अगदी रसाळ [पाण्याने संपृक्त] असं हृदय असूनही तू दुसऱ्यांचे गुण [दोऱ्या पुढे आल्यावर] घेऊन [त्यांची पात्रे भरून] देतो.

Tuesday, September 16, 2014

१३४७. नारिकेलसमाकाराः दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः |

अन्ये बदरिकाकाराः बहिरेव मनोहराः ||

अर्थ

सज्जन [नुसत] पाहिल्यावर नारळासारखे [खडबडीत; कडक; कठोर असावेत असं दिसत]; पण नारळात ज्याप्रमाणे गोड पाणी; स्वादिष्ट खोबर असतं तसे ते असतात. दुसरे [दुर्जन] बाहेरूनच बोराप्रमाणे आकर्षक असतात. [पण अनुभव चांगला येत नाही.]