भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Friday, September 4, 2026

१५१९. बालादपि ग्रहीतव्यं युक्तायुक्तं मनीषिभि: ।

१५१९. बालादपि ग्रहीतव्यं युक्तायुक्तं मनीषिभि: । 

रवेरविषये किं न प्रदीपस्य प्रकाशनम् ॥


अर्थ : - 

सुस्वभावी लोकांनी, चांगले वाईट या गोष्टींचा विचार करून लहान मुलांच्या सांगण्यातलं तथ्य स्वीकारावं. लहान मुलांना देखील कधी कधी जास्त समजत त्यांच कौतुक केले पाहिजे.


हिंदी भाषांतर 

सुस्वभावी लोगों को अच्छे-बुरे का विचार करके छोटे बच्चों की बातों में छिपी सच्चाई को स्वीकार करना चाहिए। कभी-कभी छोटे बच्चों को भी अधिक समझ होती है, इसलिए उनकी भी सराहना की जानी चाहिए।

English Translation 

Good-natured people should evaluate what is right and wrong and accept the truth in what young children say. Sometimes, young children understand things better, and their wisdom should be appreciated.



Thursday, July 23, 2026

१४९८. बोधयन्ति न याचन्ते भिक्षाद्वारा गृहे गृहे।

१४९८. बोधयन्ति न याचन्ते भिक्षाद्वारा गृहे गृहे। 

दीयतां दीयतां नित्यमदातु: फलमीदृशम्॥


अर्थ :- (लोकांच्या) दाराशी उभे राहून भीक मागणारे (खर तर) भीक मागत नसतात तर देणाऱ्यांना असं लक्षात आणून देतात की नक्की दान द्या, दान न करणाऱ्याची अवस्था आमच्या सारखी होते.

हिंदी अनुवाद

(लोगों के) द्वार पर खड़े होकर भीख माँगने वाले (दरअसल) भीिक नहीं माँग रहे होते, बल्कि देने वालों को यह याद दिलाते हैं कि दान ज़रूर दें, दान न करने वालों की हालत हमारे जैसी हो जाती है।

English Translation

Those who stand at (people's) doorsteps begging are not (actually) asking for alms; rather, they serve as a reminder to the givers to surely practice charity, for those who do not give may end up in a condition like theirs.

Friday, July 3, 2026

१४८८. बहुनिष्कपटद्रोही बहुधान्योपघातक:।

१४८८. बहुनिष्कपटद्रोही बहुधान्योपघातक:। 

रन्ध्रान्वेषी च सर्वत्र दूषको मूषको यथा ॥


अर्थ :- निंदक हा उंदिरा सारखा असतो असे कवि सांगतो बहु-निष्क- पट- द्रोही - उंदीर. किमती कपडे कुरतडणारा.  निंदक -  निरागस माणसांचा द्वेष्टा.

बहु-धान्य- उपघातक. पुष्कळ धान्यांचा सत्यानाश करतो. हे उंदराबद्दल आहे. निंदक - बहुधा अन्योपघातक  दुसऱ्याला त्रास देणारा. उंदीर - रन्ध्रान्वेषी - बिळे शोधतो. निंदक - अगदी छोट्या छोट्या दोषांवर टीका करतो.

उंदराप्रमाणे जो अत्यंत कपटी (खोटारडा), द्रोह (विश्वासघात) करणारा, धान्याचे (किंवा इतरांच्या संपत्तीचे) मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारा, नेहमी इतरांचे दोष किंवा उणिवा शोधणारा आणि प्रत्येक गोष्टीत दूषण (दोष) ठेवणारा असतो (तो माणूसही उंदरासारखाच असतो).


हिंदी अनुवाद 

चूहे के समान जो बहुत कपटी (धोखेबाज़), द्रोह (विश्वासघात) करने वाला, अनाज (या धन-संपत्ति) का भारी नुकसान करने वाला, हमेशा दूसरों की कमियाँ या छिद्र ढूँढ़ने वाला और हर चीज़ में दोष निकालने वाला होता है (वह व्यक्ति चूहे के ही समान निंदनीय है)।

भावार्थ: इस श्लोक में एक दुष्ट और निंदक व्यक्ति की तुलना चूहे से की गई है। जैसे चूहा अनाज को नष्ट करता है, छिपकर वार करता है और हमेशा दीवारों में छेद तलाशता रहता है; वैसे ही दुर्जन व्यक्ति भी दूसरों का नुकसान करता है, पीठ पीछे धोखा देता है, हमेशा दूसरों की कमजोरियों (कमियों) को खोजता है और हर अच्छी बात में भी दोष निकालता है।

English Translation

Just like a mouse (or rat), a person who is highly deceitful, treacherous, a massive destroyer of grain (or wealth), always searching for loopholes (or weaknesses in others), and constantly criticizing or finding faults everywhere (is considered contemptible).

Meaning: This verse draws a parallel between a malicious person and a rat. Just as a rat is sneaky, destroys harvested grain, constantly looks for holes or vulnerabilities in a house, and ruins things by gnawing; a toxic person betrays trust, causes financial or emotional harm, constantly hunts for other people's flaws, and speaks ill of everything.

Friday, May 15, 2026

१४४०. ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

  १४४०. ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गेहे मङ्गलं कुरू ॥


अर्थ :- सर्वांना इच्छित वस्तू प्राप्त करून देणाऱ्या ब्रह्मध्वजा ,(उभारलेली गुढी) माझ्या घरात सुद्धा, नेहमी कल्याण कारक गोष्टी घडवून आण.


हिंदी अनुवाद (Hindi Translation)

"सभी को उनकी इच्छित वस्तुएं प्रदान करने वाले ब्रह्मध्वज (उभरी हुई गुढी), मेरे घर में भी हमेशा कल्याणकारी बातें (शुभ चीजें) घटित कराएं।"


अंग्रेजी अनुवाद (English Translation)

"O Brahmadhavaj (the hoisted Gudhi), who grants everyone their desired wishes, always bring auspiciousness and well-being into my home as well."

Wednesday, October 29, 2025

१४३३. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः

 १४३३. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः। 

गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बन्धनम् ॥


अर्थ:

अद्वैत वेदान्ताचे सर्व तत्वज्ञान या एकाच‌ श्लोकात सांगत आहेत.

(त्रि) गुणांच्या अस्तित्वामुळे आत्म्याचे वर्णन (जन्म मरणाच्या साखळीतून) मुक्त -सुटका झालेला. किंवा बद्ध - अडकलेला असे केले आहे. हे (त्रिकालाबाधित) सत्य नाही. गुण हे मायेची निर्मिती असल्याने खरं तर (आत्म्याला) बन्ध हि नाही आणि मोक्षप्राप्ती सुद्धा नाही.

Hindi:
अद्वैत वेदान्त का सम्पूर्ण तत्वज्ञान इस एक ही श्लोक में बताया गया है।
तीनों गुणों (सत्व, रज, तम) के अस्तित्व के कारण आत्मा का वर्णन कभी मुक्त (जन्म-मरण के बंधन से छूटा हुआ) और कभी बंध (बंधन में पड़ा हुआ) ऐसा किया गया है।
लेकिन यह सत्य नहीं है, क्योंकि गुण माया की उत्पत्ति हैं। इसलिए वास्तव में आत्मा को न तो कोई बंधन है और न ही कोई मोक्ष प्राप्ति।


English:
The entire philosophy of Advaita Vedanta is expressed in this single verse.
Due to the existence of the three qualities (sattva, rajas, and tamas), the Self is described as either liberated (freed from the cycle of birth and death) or bound (caught in it).
However, this is not the ultimate truth, because the qualities themselves are creations of Maya. Hence, in reality, the Self is neither bound nor liberated.

Wednesday, December 10, 2014

१३७४. बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |

न च्छन्दसा केनचिदुधृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||

अर्थ

[खूप शिक्षण झालं; व्याकरण येत असलं तरी] भुकेजलेला असताना व्याकरण खात नाहीत. [त्यानी भूक भागत नाही.] तहानलेल्याला काव्य रस पिऊन [तहान भागत नाही]. वेदांच अध्ययन करून कुणीही घर वर काढलेलं नाही. हे गुण निरुपयोगी आहेत. संपत्ती मिळव बाबा.

Monday, October 27, 2014

१३६१. बहुभिर्बत किं जातैः पुत्रैर्धर्मार्थवर्जितैः |

वरमेकः पथि तरुर्यत्र विश्रमते जनः ||

अर्थ

धर्म; अर्थ [असे पुरुषार्थ] संपादन न करणारी पुष्कळ अपत्ये असून काय हो उपयोग ? एक झाड [लावून अपत्याप्रमाणे वाढवलेलं] बरं! की जिथे माणूस विश्रांती घेतो. [वृक्षसंवर्धन अपत्या इतकं चांगलं आहे.]

Thursday, May 8, 2014

१२६६. ब्रह्मन्; कृष्णकथाः पुण्याः माध्वीर्लोकमलापहाः |

को नु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो   नित्यनूतनाः || भागवत

अर्थ

हे [शुक] महर्षे; अतिशय रसाळ; नेहमी नव्याप्रमाणे वाटणाऱ्या; पुण्य मिळवून देणाऱ्या; या जगाच काळबेरं [वाईट; पाप] नाहीसं करणाऱ्या अशा कृष्णकथा ऐकताना कोणाला बरे समाधानी वाटणार नाही? [त्या अजून अजून ऐकाव्या असंच वाटेल.]

Monday, March 24, 2014

१२३२. ब्रह्मघ्ने च सुरापे च चौरे भग्नव्रते शते |

निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः ||

अर्थ

शहाण्या लोकांनी विद्वानाला ठार करणाऱ्याला; दारु पिणाराला; चोराला; शपथा मोडणाऱ्याला प्रायश्चित्त [घेऊन त्या पापातून मुक्त होता येईल असं] सांगितलेलं आहे. पण कृतघ्नपणाला प्रायश्चित्त नाही. [ही गोष्ट त्या सर्वांपेक्षाही वाईट आहे.]

Monday, August 12, 2013

१०७७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनैः सुजनैः सह |

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ||

अर्थ

सुष्ट असोत किंवा दुष्ट [एकाचवेळी] खूप लोकांशी भांडण करू नये. साप [अगदी भयानक आणि] फुरफुरणारा असला तरी [एकटाच असेल तर पुष्कळशा] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

Tuesday, June 18, 2013

१०४१. बधिरयति कर्णविवरं वाचं मूकयति नयनमन्धीयति |

विकृतयति गात्रयष्टिं सम्पद्रोगोऽयमद्भुतो लोके ||
अर्थ = श्रीमंती [चा माज] रूपी रोग फारच आश्चर्यकारक आहे. [दुसरा एखादा रोग झाला तर एखादा अवयव दुखावेल पण हा तर सर्व शरीरावर परिणाम करतो. पैशाचा माजामुळे ऐकलं असून सुद्धा न् ऐकल्या सारखं] कानाला बहिर करतो; वाणीला मुकी करतो; डोळे [असून डोळेझाक केल्याने] आंधळेपण येते. [आपलं शरीर ताठ असत ते] वेडवाकड करून सोडतो. [म्हणून श्रीमंतीचा माज फारच वाईट.]

Monday, January 21, 2013

९०२. बकवच्चिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत् |

वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् || मनुस्मृति

अर्थ

बगळ्याप्रमाणे [गुपचूप; एकाग्रतेने भरपूर] संपत्ती [कशी मिळवावी याबद्दल] विचार करावा. शौर्य गाजवावं सिंहासारखं, झडप घालावी लांडग्या सारखी [आणि पळून जायची वेळ आली तर] सशासारखं निसटावं.

Tuesday, November 27, 2012

८५६. बृहत्सहाय: कार्यान्तं क्षोदीयानपि गच्छति |

संभूयाम्भोधिमभ्येति महानद्या  नगापगा ||

अर्थ

अगदी लहान [क्षुद्र] जरी असला, तरी थोरामोठ्यांच्या मदतीने त्याच काम पूर्ण होत. जसं पर्वतातून निघालेले ओढे मोठ्या नदीला मिळाल्यावर समुद्राला जाऊन मिळतातचं.

Thursday, September 13, 2012

७८६. बलिनो बलमाहन्ति भीतिश्चित्ते कृतास्पदा |

रिपोर्बिभ्यत् स्वदौर्बल्यात्सबलं कुरुते रिपुम् ||
अर्थ

मनात घर करून बसलेली भीति [माणूस जरी] ताकदवान [असला तरी] त्याचे बळ ती भीतिच मारून टाकते.[त्याची सगळी ताकद नष्ट होते] आणि तो या स्वतःच्या घाबरटपणा या  दुबळेपणामुळे शत्रूला  भिऊन; त्याला  समर्थ बनवतो.

Sunday, August 5, 2012

७४९. बुद्धिर्यस्य बलं तस्य ; निर्बुद्धेस्तु कुतो बलम् |

पश्य सिंहो मदोन्मत्त: शशकेन निपातितः ||

अर्थ

जो बुद्धिमान असतो तोच सामर्थ्यवान बनतो. मंद [व्यक्ती] कशी ताकदवान होईल? असं पहा की; माजलेल्या [अति ताकदवान असून सुद्धा बुद्धि न चालवल्यामुळे] सिंहाला [आपल्या हुशारीने ] सशाने पराभूत केले.

Tuesday, June 5, 2012

६९३. बुधाग्रे न गुणान् ब्रूयात्साधु वेत्ति यत: स्वयम् |

मूर्खाग्रेऽपि च न ब्रूयात् बुधप्रोक्तं न वेत्ति स: ||

अर्थ

[आपले] गुण विद्वान माणसाला सांगू नयेत, कारण त्याला स्वतःलाच ते समजतात आणि मूर्ख माणसा समोर पण आपलं गुणगान करू नये, कारण शहाण्यांनी सांगितलं तरी त्याला कळतच नाही. [मग आपलं स्वतःच गुणगान करून काय उपयोग? म्हणून आपले गुण आपण स्वतः कधी गाऊ नयेत.

Tuesday, April 17, 2012

६४९. बुद्धेर्बुद्धिमतां लोके नास्त्यगम्यं हि किञ्चन |

बुद्ध्या यतो हता नन्दाश्चाणक्येनासिपाणय:||

अर्थ

बुद्धिमान लोकांच्या बुद्धीला अवगत न होणारे असे काहीच नसते. नुसत्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चाणक्याने शस्त्रधारी नंदांचाही नाश केला.

Tuesday, October 18, 2011

४७७. बन्धनानि किल सन्ति बहूनि ; प्रेमरज्जुमयबन्धनमाहु: |

दारुभेदनिपुणोऽपि षडङ्घ्रि: निष्क्रियो भवति पङ्कजकोषे ||

अर्थ

बंधन तर बरीच [बऱ्याच प्रकारची] असतात. पण प्रेमाच्या धाग्यांच बन्धन [तोडण्यास सर्वात कठीण] असे सांगतात. [असे पहा कि] लाकडे पोखारण्यात निष्णात अश्या भुंग्याला देखील [अतिशय कोमल असूनही] कमळाच्या पाकळ्या [कुरतडून बाहेर पडण्यास असमर्थ ठरतो] निष्क्रीय बनवतात. [भुंगा मध खायला गेल्यावर सूर्यास्त झाला तर कमळ मिटत आणि तो आत अडकतो.]

Thursday, September 15, 2011

४४७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनै: सज्जनैरपि |

स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिका: ||

अर्थ

[एकाच वेळेला] खूप जणांशी विरोध करू नये. ते सज्जन असूत का दुर्जन [पण एकाच वेळी खूप लोकांशी भांडल्यामुळे आपला पराभवच होईल.] अगदी सळसळता नागराज असला तरी [अगदी क्षुद्र असूनही संख्या मोठी असल्यामुळे] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

Tuesday, May 10, 2011

३४६. बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदुषिताः |

अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम् || नीतिशतक राजा भर्तृहरि

अर्थ

सुवचनांचा [कोणालाच उपयोग न होता ती ] स्वतःच्या ठिकाणीच गलीतगात्र होऊन जातात [कारण ] ज्ञानी लोकांना [एकमेकांचा ] मत्सर असतो [ते सुभाषितांची चर्चा करत नाहीत ]; सत्ताधारी लोकांना माजाची बाधा असते [ते कोणाला सुविचाराबद्दल चौकशी करत नाहीत ]उरलेल्या लोकांना काही ज्ञान नसल्याने त्यांना सुवचनांचा पत्ताच नसतो [त्यामुळे हे सर्व ज्ञान वाया जातं ]