भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Sunday, August 2, 2026

१५०६. भुक्तानि यैस्तव फलानि पचेलिमानि क्रोडस्थितैरहह वीतभयै: प्रसुप्तम् ।

१५०६. भुक्तानि यैस्तव फलानि पचेलिमानि क्रोडस्थितैरहह वीतभयै: प्रसुप्तम् ।

ते पक्षिणो जलरयेण विकृष्यमाणं पश्यन्ति पादप भवन्तममी तटस्था:॥


अर्थ :- 

एखाद्या दात्याच्या उदार स्वभाव आणि त्याचे दिवस फिरल्यावर त्याला गरिबी येते तेव्हा त्याचा फायदा घेणारे लोक काहीच मदत करत नाहीत त्या बद्दलची ही अन्योक्ती आहे.

हे वृक्षा, ज्या पाखरांनी तुझी चांगली पिकलेली फळे खाल्ली, तुझ्या फांद्यावर घरटी बांधून बेफिकीर झोपले तेच पाण्याच्या वेगामुळे तू फरफटत जात असताना तटस्थ(पणे, १. त्रयस्थपणे २. आता नवीन मिळालेल्या आधारावर ) बसून (गम्मत) बघत आहेत.


हिंदी अनुवाद

"हे वृक्ष! जिन पक्षियों ने तेरे पके हुए मीठे फल खाए और तेरी शाखाओं पर घोंसले बनाकर बेफ़िक्र होकर सोए, वही पक्षी आज पानी के तेज़ बहाव में तेरे बह जाने पर तटस्थ (उदासीन) होकर किनारे से (मज़ा) देख रहे हैं।"

(विशेष: यह अन्योक्ति ऐसे उदार दानवीर के लिए है, जिसका अच्छा समय बीत जाने पर और गरीबी आने पर वे ही लोग दूर हो जाते हैं जिन्होंने कभी उसके आश्रय और धन का आनंद लिया था।)

English Translation

"O Tree! The very birds that devoured your ripe fruits and slept carelessly in the nests built upon your branches are now sitting indifferently, watching you get swept away by the raging current of water."

(Note: This allegory refers to a generous giver who falls into poverty after his golden days pass, only to be abandoned by the very people who once benefited from his fortune and now silently watch his downfall.)

Friday, July 31, 2026

१५०५. भारती कालिदासस्य दुर्व्याख्याविषमूर्छिता ।

१५०५. भारती कालिदासस्य दुर्व्याख्याविषमूर्छिता । 

एषा संजीवनी टीका तामद्योज्जयिष्यति ॥  मल्लिनाथ


अर्थ :- मराठी भाषेत 'मल्लीनाथी करणे' असा वाक्प्रचार रूढ आहे. भाष्य करणे असा त्याचा अर्थ. या पंडिताने कालिदासाचे काव्य वर स्पष्टीकरण करणाऱ्या टीका लिहिल्या.

कालिदासाचे काव्य चुकीच्या स्पष्टीकरण रूपी विषामुळे मूर्छित झाले आहे. ही संजीवनी टीका आता तिला जीवदान देईल.

सुरवातीला कवीनी अशी प्रस्तावना केली आहे.


हिंदी अनुवाद

मराठी भाषा में 'मल्लीनाथी करना' (मल्लीनाथी करणे) एक मुहावरा प्रचलित है, जिसका अर्थ टिप्पणी या भाष्य करना होता है। इस पंडित (मल्लीनाथ) ने कालिदास के काव्यों पर स्पष्टीकरण देने वाली टीकाएँ लिखीं।

'कालिदास का काव्य गलत व्याख्या रूपी विष के कारण मूर्छित हो गया है। यह संजीवनी टीका अब उसे नवजीवन प्रदान करेगी।'

शुरुआत में कवि (टीकाकार) ने ऐसी प्रस्तावना की है।

English Translation

In the Marathi language, the idiom 'Mallinathi karne' (to do Mallinathi) is popular, which means to commentate or analyze. This scholar (Mallinatha) wrote explanatory commentaries on the poetic works of Kalidasa.

'Kalidasa's poetry has fainted due to the poison of wrong interpretations. This Sanjeevani commentary will now grant it new life.'

The scholar has written such an introduction at the very beginning.

Wednesday, June 3, 2026

१४५९. भ्रमन्सम्पूज्यते राजा भ्रमन्सम्पूज्यते द्विज:।

१४५९. भ्रमन्सम्पूज्यते राजा भ्रमन्सम्पूज्यते द्विज:। 

भ्रमन्सम्पूज्यते योगी , स्त्री भ्रमन्ती विनश्यति ॥


अर्थ:- फिरत राहून (सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणारा) राजा, हिंडून हिंडून (ज्ञान मिळवणारा) ब्राह्मण, सर्व ठिकाणी राहून योग साधणारा योगी यांना मान  मिळतो. पण स्त्री जास्त भटकली तर तिच्या बद्दल वाईट बोलतात.


Hindi Translation (हिंदी अनुवाद)

"घूमते रहकर (सभी बातों पर नजर रखने वाला) राजा, निरंतर भ्रमण कर (ज्ञान अर्जित करने वाला) ब्राह्मण, और विभिन्न स्थानों पर रहकर योग साधना करने वाला योगी—इन सभी को सम्मान मिलता है। परंतु, यदि कोई स्त्री अत्यधिक भटकती (भ्रमण करती) है, तो लोग उसके बारे में बुरा-भला कहते हैं।"


English Translation (अंग्रेजी अनुवाद)

"A king who travels around (to keep a watchful eye on his kingdom), a Brahmin who wanders (to acquire and spread knowledge), and a yogi who practices yoga by living in different places are all highly respected. However, if a woman wanders or roams around excessively, people speak ill of her."

Tuesday, October 21, 2025

१४३२. भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशय:।

१४३२. भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशय:। 

पात्रभेदे यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥


अर्थ:

(अध्यात्मविद्येचा जर संस्कृत भाषेत अभ्यास किंवा उपदेश केला तरच खरं ज्ञान होते असा एक समज होता त्याच खंडन करणारा हा श्लोक आहे)

भाषेमध्ये (मराठी, संस्कृत असा ) फरक असला तरी त्यामधून निष्पन्न होणारा अर्थ एकच आहे यात शंकाच नाही.ज्याप्रमाणे अन्न दोन भांड्यामध्ये ठेवले तरी चवी मध्ये फरक पडत नाही.

Hindi translation:
भले ही भाषा (मराठी या संस्कृत) में अंतर हो, परंतु उनमें से निकलने वाला अर्थ एक ही होता है, इसमें कोई संदेह नहीं है। जैसे भोजन दो अलग-अलग बर्तनों में रखा जाए, तो भी उसके स्वाद में कोई अंतर नहीं पड़ता।

English translation:
Even though the language (Marathi or Sanskrit) may differ, there is no doubt that the meaning conveyed through them remains the same—just as food placed in two different vessels does not differ in taste.

Friday, October 17, 2025

१४३०. भुक्त्वा तृणानि शुष्कानि, पीत्वा तोयं जलाशयात् |

दुग्धं यच्छन्ति लोकेभ्य:, धेनवो लोकमातर: ||


आज गोवत्सद्वादशी म्हणजे वसुबारस.

म्हणून गायींचे महत्त्व विशद करणारा हा संस्कृत श्लोक.


अर्थ:

वाळलेले गवत खाऊन, जलाशयाचे पाणी पिऊन गायी लोकांना दूध देतात. गायी जगाच्या माताच होय.


हिंदी:

सूखी घास खाकर और जलाशय का पानी पीकर गायें लोगों को दूध देती हैं। गायें वास्तव में संसार की माताएँ ही हैं।


English Translation:

Having consumed (eaten) dry grass and drunk water from lakes, cows give milk. They are (indeed) mothers of the world.

Friday, August 1, 2025

१४२३. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह:‌ ।

सदसद्गृहभिक्षान्नं सोमपानं दिने दिने ॥


अर्थ

भिक्षाहारी .........

भिक्षा मागून जेवण करणाऱ्याला (खरं म्हणजे)उपास‌ केल्याचं ( पुण्य ) मिळते. भिक्षा मागणे म्हणजे दान स्वीकारणे नाही. चांगल्या किंवा वाईट लोकांकडून सुद्धा भिक्षा मागणे म्हणजे अमृत पिण्याप्रमाणे (पुण्यकारक) आहे.


Tuesday, February 9, 2021

१३९६. भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे।

भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।।

अर्थ 

जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर हल्ला केला.

संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. 

'माघ' नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या 'शिशुपालवधम्' ह्या महाकाव्यात केवळ 'भ' आणि 'र' ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे.

Monday, March 16, 2015

१३९२. भिक्षाशनं भवनमायतनैकदेशः शय्या भुवः परिजनो निजदेहभारः |

वासश्च जीर्णपटखण्डनिबद्धकन्था हा हा तथापि विषयान्न जहाति चेतः ||

अर्थ

जेवण भिक्षा मागून; घर म्हणजे बसलोय तेवढी जागा; अंथरूण जमीन; आपलं स्वतःच शरीर हाच नोकरवर्ग; जुन्या फाटक्या चिंध्यांची गोधडी एवढेच कपडे [थोडक्यात जवळ काही सुद्धा नाही] तरीही; अरेरे!  मन विषयांचा त्याग करत नाही. [ विषयांमध्ये घोटाळतय!]

Saturday, January 31, 2015

१३८४. भारोऽविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः |

अशान्तस्य मनो भारः भारोऽनात्मविदो वपुः || योगवासिष्ठ
अर्थ

विचार; मनन केलं नाही तर शिक्षण हे फक्त ओझं बनत. [पोपटपंची] आसक्ती [सुटत नसेल] तर  [तत्व] ज्ञान  हे ओझं ठरत. मन हे अस्वस्थ [चंचल] माणसाला त्रासदायक असत. आत्मज्ञान झालं नाही तर आपला देह भारभूत आहे.

Monday, December 22, 2014

१३७७. भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं निगमकृदुपजऱ्हे भृङ्गवद्वेदसारम् |

अमृतमुदधितश्चापाययद् भृत्यवर्गान् पुरुषमृषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि |

अर्थ

भगवान शुक म्हणतात - भ्रमराप्रमाणे [भुंगा जसा कमलाला जराही धका न लावता फुलातून मध घेतो तसं वेदाची ओढाताण न करता] वेदाची निर्मिती करणाऱ्या देवाने वेदाचं सारं [भागवतात कृष्ण-उद्धव संवादात ] काढून किंवा  समुद्र मंथनातून अमृत काढून भक्तांना पाजले आहे, अशा त्या श्रेष्ठ कृष्ण नावाच्या परब्रह्माला मी वंदन करतो.

Monday, November 3, 2014

१३६५. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम् |

गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ||

अर्थ

महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर [शिकून घेतल्यावर] पुनर्जन्म येणारच नाही. [मोक्ष मिळेल.]

Sunday, August 3, 2014

१३३२. भार्यावियोगः स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |

दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

अर्थ

पत्नीचा वियोग; आपल्याच [जवळच्यानी] दोष देणं; कर्ज फेडायचं असणं; कंजूष माणसाची सेवा [नोकरी] करायला लागणं आणि आवडती लोक [अगदी] गरिबी आली असताना भेटायला येणं, या पाच गोष्टी आग नसून सुद्धा होरपळवतात.

Monday, March 10, 2014

१२२५. भाग्यवन्तं प्रसूयेथाः मा शूरं मा च पण्डितम् |

शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः || कुन्ती

अर्थ

नशीबवान [अपत्यांना] जन्म दे. तो शूर हवा असं नाही किंवा विद्वान असला पाहिजे असं पण नाही. अगदी शूर आणि विद्वान अशा माझ्या मुलाचं [या दोन्ही गोष्टी असून सुद्धा] युद्ध [करायला लागल्याने] वाटोळ झालंय.

Monday, January 27, 2014

११९६. भूः पर्यङ्को निजभुजलतागेन्दुकः खं वितानं दीपश्चन्द्रो विरतिवनितालब्धयोगप्रमोदः |

दिक्कन्यानां व्यजनपवनैर्वीज्यमानोऽनुकूलैर्भिक्षुः शेते नृप इव सदा वीतरागो जितात्मा ||
 
अर्थ
 
[जितेंद्रिय यतीचे वर्णन] आसक्तीचा त्याग केलेला जितेंद्रिय भिक्षु - जमीन हाच पलंग; स्वतःचा हात हीच उशी; आकाश हे छत्र; चन्द्र हा दिवा; दिशा रूपी कन्या शीतल  वायुरूपी पंख्यानी वारा घालतायत; अशा वेळी  वैराग्य सुंदरीच्या सहवासाने मिळालेल्या परम सुखाने राजाप्रमाणे सुखात राहतो.

Monday, December 23, 2013

११७२. भवत्येकस्थले जन्म गन्धस्तेषां पृथग्पृथक् |

उत्पलस्य मृणालस्य मत्स्यस्य कुमुदस्य च ||

अर्थ

चंद्रविकासी कमळ; सूर्यविकासी कमळ; नीलकमल आणि मासे या सर्वांचा जन्म एकच ठिकाणी झाला असला तरी प्रत्येकाचा वास वेगवेगळा असतो. [एका घरातल्या माणसांचे स्वभाव वेगवेगळे असू शकतात.]

Sunday, November 24, 2013

११४९. भार्यावियोग: स्वजनापवादो ऋणस्य शेषं कृपणस्य सेवा |

दारिद्र्यकाले प्रियदर्शनं च विनाग्निना पञ्च दहन्ति कायम् ||

अर्थ

आग नसून देखील या पाच गोष्टी शरीराला [मनातून] जाळत राहतात - पत्नीचा [जोडीदाराचा] विरह, आपल्याच नातेवाईकांकडून  दूषण, कर्ज [फेडता न आल्यामुळे] राहिलेली शिल्लक, कंजूष माणसाची नोकरी आणि आपली [फार] गरिबी आलेली असताना आवडत्या माणसांची गाठभेट.

Wednesday, July 3, 2013

१०५५. भीतेभ्यश्चाश्रय: देय: व्याधितेभ्यस्तथौषधम् |

देया विद्यार्थिने विद्या देयमन्नं क्षुधातुरे ||

अर्थ

घाबरलेल्याला आसरा द्यावा. त्याचप्रमाणे आजाऱ्याला औषध द्यावं. जिज्ञासूला ज्ञान द्यावं आणि भूकेजलेल्याला अन्न द्यावं.

Thursday, January 24, 2013

९०६. भये वा यदि वा हर्षे सम्प्राप्ते यो विमर्शयेत् |

कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् || पञ्चतन्त्र

अर्थ

[एकदम खूप] भीती [दायक] किंवा आनंद होईल असं घडलं की जो घाईघाईने काहीतरी न करता जो [त्याचा समग्र] विचार करून मगच [योग्य ते करील] त्याला [नंतर] दु:ख करण्याची वेळ येणार नाही.

Monday, September 17, 2012

७८९. भो भो युवानो निजयौवनानि प्राप्तान्यन्तानि कथं मनुध्वम् |

सुदीर्घमप्यत्र दिनं निशान्तं विलोक्य चित्तं कुरुत प्रशान्तम् ||

अर्थ

अरे तरुणांनो; तुम्हाला आपले तारुण्य कायमचे टिकणारे - चिरंतन कसं बरं वाटतं? दिवस कितीही मोठा वाटला तरी रात्र येऊन तो संपतोच. हे नीट पाहून [म्हातारपण येणार हे लक्षात घेऊन] मन [ताळ्यावर ठेवून] अगदी शान्त करा. [चाळे करू नये अस कवीला सुचवायचं आहे.]

Sunday, September 2, 2012

७७४. भेतव्यं न तथा शत्रोर्नाग्नेनाहेर्न चाशने: |

इन्द्रियेभ्यो यथा स्वेभ्यस्तैरजस्त्रं हि हन्यते ||

अर्थ

[माणुस] शत्रू; साप; आग; वीज यांना भीतो. त्यापेक्षा जास्त  त्याला  स्वतःच्या इंद्रियांची भीती असते. [आसक्तीमुळे पतन होत म्हणून त्यांच्यावर ताबा पाहिजे.] [कारण शत्रू वगैरे कधीतरी त्रास देतात] पण आपल्या वासना सततच हल्ला करत असतात.