भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

Wednesday, August 5, 2026

१५०७. विद्यार्थी सेवक: पान्थ:क्षुधार्तो भयकातर:।

१५०७. विद्यार्थी सेवक: पान्थ:क्षुधार्तो भयकातर:। 

भाण्डारी प्रतिहारी च सप्त सुप्तान् प्रबोधयेत् ॥


अर्थ :-  कोणी झोपलेल असताना उठवणं हे पाप आहे असे म्हणतात . पण असं असलं तरी... विद्यार्थी, नोकर , वाटसरू, भुकेलेला, घाबरलेला, गोदाम व्यवस्थापक, निरोप्या हे सात जणांना उठवावे.


हिंदी अनुवाद:

ऐसा कहा जाता है कि सोए हुए व्यक्ति को जगाना पाप होता है। लेकिन फिर भी... विद्यार्थी, नौकर, यात्री (राहगीर), भूखा व्यक्ति, डरा हुआ व्यक्ति, गोदाम प्रबंधक (स्टोरकीपर) और संदेशवाहक—इन सात लोगों को सोए हुए होने पर भी जगा देना चाहिए।


English Translation:

It is said that waking up a sleeping person is a sin. Nevertheless... a student, a servant, a traveler, a hungry person, a frightened person, a storekeeper (warehouse manager), and a messenger—these seven people should be woken up.

Monday, July 27, 2026

१५०२. वलिभिर्मुखमाक्रान्तं पलितैरङ्कितं शिर:।

१५०२. वलिभिर्मुखमाक्रान्तं  पलितैरङ्कितं शिर:।

गात्राणि शिथिलायन्ते , तृष्णैका तरुणायते॥


अर्थ :- मनुष्यस्वभावाबद्दल कवींनी हा श्लोक रचला आहे. म्हातारपण इतकं झाले आहे की,  (सर्व) तोंडभर सुरकुत्या पडलेल्या आहेत, मस्तक पांढऱ्या केसांच्या ताब्यात गेले आहे (म्हणजे काळा केस उरलेला नाही एवढे वय वाढले आहे) अवयव काम करत नाहीसे झाले आहेत. (इतके म्हातारपण येऊन, सर्व अवयवांची कार्यक्षमता कमी होत असली तरी) हावरे पण ही एक च गोष्ट ( कमी न होता) तरुण होते आहे. (माणूस मरायला टेकला तरी त्याचा लोभ कमी न होता उलट वाढत जातो.)

हिंदी अनुवाद

कवियों ने मनुष्य के स्वभाव पर यह श्लोक रचा है। बुढ़ापा इतना बढ़ चुका है कि पूरे चेहरे पर झुर्रियां पड़ गई हैं, सिर पूरी तरह से सफेद बालों के कब्ज़े में आ गया है (अर्थात एक भी काला बाल नहीं बचा है), और शरीर के सभी अंग निष्क्रिय हो चुके हैं। (इतना बुढ़ापा आने और अंगों की क्षमता कम होने के बावजूद) केवल यह 'लालच/तृष्णा' ही एक ऐसी चीज़ है जो कम होने के बजाय और भी तरुण (युवा) होती जा रही है। (अर्थात मनुष्य मृत्यु के निकट पहुँच जाए, तब भी उसका लोभ कम होने के बजाय बढ़ता ही जाता है।)

English Translation

"Poets have composed this verse depicting human nature. Old age has advanced to the point where the entire face is covered in wrinkles, the head is completely taken over by white hair (meaning not a single black hair remains), and the body parts have lost their ability to function. (Despite such extreme old age and diminishing physical capacity), 'greed/desire' is the only thing that, instead of fading, keeps becoming younger and stronger. (A person may be on the verge of death, yet their greed does not diminish; rather, it continues to grow.)

Tuesday, July 14, 2026

१४९३. विषदिग्धस्य बाणस्य दन्तस्य चलितस्य च ।

१४९३. विषदिग्धस्य बाणस्य दन्तस्य चलितस्य च । 

अमात्यस्य च दुष्टस्य मूलादुद्धरणं सुखम् ॥


अर्थ :- विषारी बाण, हलायला लागलेला दात आणि दुष्ट मंत्री या सर्व गोष्टींच अगदी मु‌ळापासून उच्चाटन केले पाहिजे.(वर वर उपाय केल्यास दुप्पट त्रास होईल.)


हिंदी अनुवाद

विषैला बाण, हिलता हुआ दाँत और दुष्ट मंत्री—इन सभी चीज़ों का जड़ से ही उन्मूलन (नाश) कर देना चाहिए। (क्योंकि केवल ऊपर-ऊपर से उपाय करने पर इनसे दुगना कष्ट होगा।)

 

English Translation

A poisoned arrow, a loose tooth, and a wicked minister—all of these must be eradicated completely from their very roots. (For applying superficial remedies will only cause double the pain.)

Wednesday, July 1, 2026

१४८७. विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह ।

१४८७. विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह ।

अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ॥ ११ ॥


हा श्लोक ईशावास्य उपनिषदातील (Isha Upanishad) ११ वा मंत्र आहे.

या श्लोकात 'विद्या' (आध्यात्मिक ज्ञान/आत्मज्ञान) आणि 'अविद्या' (व्यावहारिक ज्ञान/लौकिक कर्म) या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधावा, हे सांगितले आहे.

अर्थ :- 

माणूस विद्या (आत्मज्ञान) आणि अविद्या (लौकिक कर्म/व्यावहारिक ज्ञान) या दोन्ही गोष्टींना एकत्र आणि योग्य प्रकारे समजून घेतो; तो अविद्येच्या (कर्तव्य कर्मांच्या) साहाय्याने मृत्यू पार करतो (संसारातील दुःखांवर आणि मृत्यूच्या भयावर विजय मिळवतो) आणि विद्येच्या (आत्मज्ञानाच्या) साहाय्याने अमृतत्व (मोक्ष/परमानंद) प्राप्त करतो.


हिंदी अनुवाद

यह श्लोक ईशावास्य उपनिषद (Isha Upanishad) का ११वां मंत्र है।

"जो मनुष्य विद्या (आत्मज्ञान) और अविद्या (लौकिक कर्म/व्यावहारिक ज्ञान) इन दोनों को ही एक साथ सही रूप में जानता है; वह अविद्या (कर्तव्य कर्मों) के द्वारा मृत्यु को पार करके, विद्या (ज्ञान) के द्वारा अमृतत्व (मोक्ष) को प्राप्त करता है।"

सरल शब्दों में भावार्थ:

यहाँ 'अविद्या' का अर्थ मूर्खता नहीं, बल्कि इस भौतिक संसार में जीने के लिए आवश्यक व्यावहारिक ज्ञान, विज्ञान और हमारे सांसारिक कर्तव्य (Karma) हैं। 'विद्या' का अर्थ आध्यात्मिक ज्ञान (Spiritual Knowledge) है।

उपनिषद कहता है कि केवल संसार में डूबे रहना या संसार को पूरी तरह छोड़कर भाग जाना—दोनों ही मार्ग अधूरे हैं। एक सफल और सार्थक जीवन के लिए मनुष्य को अपने सांसारिक कर्तव्यों को भी अच्छी तरह निभाना चाहिए (जिससे वह इस संसार के दुखों और मृत्यु के भय को पार कर सके) और साथ ही आत्मज्ञान भी प्राप्त करना चाहिए (जिससे उसे मोक्ष मिल सके)।

English Translation

This verse is the 11th mantra of the Isha Upanishad.

"He who knows both Vidya (spiritual knowledge) and Avidya (worldly action/material knowledge) together, overcomes death through Avidya and attains immortality through Vidya."

Detailed Explanation:

  • Avidya (Worldly Knowledge/Action): In this context, Avidya does not mean ignorance; rather, it refers to empirical knowledge, science, and the performance of one's worldly duties. By fulfilling responsibilities and understanding the material world, a person overcomes the fears and limitations of physical existence (crosses over death).

  • Vidya (Spiritual Wisdom): Vidya refers to the higher spiritual knowledge of the Self and the Divine. Through this inner wisdom, a person transcends the cycle of birth and death to attain ultimate liberation (immortality).

In short: The Upanishad advises a balanced approach to life. One must neither neglect material duties nor ignore spiritual growth. True liberation comes from harmonizing outer actions with inner wisdom.

Friday, June 26, 2026

१४८१. व्याधेस्तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रह:।

१४८१. व्याधेस्तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रह:। 

एतद्वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्य: प्रभुरायुष:॥


अर्थ :- रोगाचे अचूक ज्ञान करून देणे, रुग्णांच्या वेदना दूर करणे या गोष्टी वैद्य करतो. तो माणसाच्या आयुष्याचा स्वामी नाही. (अमर करू शकत नाही).

हा विचार वैद्यकीय क्षेत्राची मर्यादा आणि वास्तव स्पष्ट करतो. डॉक्टर किंवा वैद्य हे रोगाचे निवारण करण्याचे माध्यम आहेत, पण जीवन-मरणावर अंतिम नियंत्रण निसर्गाचे किंवा काळाचेच असते.


हिंदी अनुवाद

रोग की सटीक पहचान करना और रोगी की पीड़ा (दर्द) को दूर करना, यही वैद्य (डॉक्टर) का काम है। वह मनुष्य के जीवन का स्वामी नहीं है (अर्थात वह किसी को अमर नहीं बना सकता)।

English Translation

A physician's role is to accurately diagnose the disease and relieve the patient's pain. He is not the master of human life (meaning, he cannot make someone immortal).

Monday, June 15, 2026

१४७१. वेश्या रागवती सदा तदनुगा षड्‌भिरसैर्भोजनं,

१४७१. वेश्या रागवती सदा तदनुगा षड्‌भिरसैर्भोजनं,

शुभ्रं धाम मनोहरं वपुरहो! नव्यो वयः संगमः।

कालोऽयं जलदाविलस्तदपि यः कामं जिगायाऽऽदरात्,

तं वन्दे युवतिप्रबोधकुशलं श्रीस्थूलभद्रं मुनिम्॥


अर्थ :- 

जिच्या महालात वेश्या (कोशा) नेहमी प्रेमाने अनुरक्त असायची, जिथे तिचे सेवक सतत सेवेसाठी तत्पर असायचे, जिथे रोज षड्रसांनी (सहा चवींनी) युक्त उत्तम भोजन मिळायचे, जिथे राहण्यासाठी शुभ्र, सुंदर आणि मनमोहक महाल होता, जिचे शरीर अत्यंत लावण्यमय होते आणि तारुण्याचा नवा बहर (नव्य वय) व सुंदर समागम उपलब्ध होता; त्यात भर म्हणून पावसाळ्याचे (मेघांचे) रोमँटिक वातावरण होते – अशा सर्व प्रकारच्या कामोत्तेजक परिस्थितीतही, ज्यांनी आपल्या वासनेवर आणि कामावर आदरपूर्वक (दृढतेने) विजय मिळवला; आणि त्या तरुण स्त्रीला (वेश्येला) देखील सन्मार्गाचा बोध देण्यात जे कुशल ठरले, अशा त्या 'श्री स्थूलभद्र मुनींना' मी वंदन करतो.

हे सुभाषित जैन परंपरेतील एक महान आणि परम प्रतापी मुनी श्री स्थूलभद्र यांच्या अलौकिक आत्मसंयमाची आणि ब्रह्मचर्याची स्तुती करणारे आहे.

पार्श्वभूमी: दीक्षा घेण्यापूर्वी स्थूलभद्र हे 'कोशा' नावाच्या रूपवान वेश्येच्या प्रेमात होते आणि १२ वर्षे तिच्या महालात राहिले होते. दीक्षा घेतल्यानंतर, आपल्या आत्मसंयमाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी चातुर्मासाचे चार महिने त्याच वेश्येच्या महालात घालवण्याचा कठीण निश्चय केला. भोग आणि विलासाचे सर्वच साधन समोर असूनही, त्यांनी आपल्या वासनेवर पूर्ण विजय मिळवला आणि कोशा वेश्येलाही अध्यात्माचा मार्ग दाखवला.


हिन्दी अनुवाद

जहाँ वेश्या (कोशा) सदा प्रेम से आसक्त रहती थी, उसके सेवक हर पल सेवा में तत्पर रहते थे, जहाँ प्रतिदिन छह रसों से युक्त स्वादिष्ट भोजन मिलता था, जहाँ रहने के लिए श्वेत, सुंदर और मनभावन महल था, जिसका शरीर अत्यंत लावण्यमयी था और युवावस्था का नया मिलन सुलभ था; और तो और, जब बादलों से घिरा वर्षा ऋतु का कामोत्तेजक समय था – ऐसी विकट परिस्थितियों में भी जिन्होंने अपनी वासना और कामदेव पर अत्यंत आदरपूर्वक (दृढ़ता से) विजय प्राप्त की; तथा उस युवती (वेश्या) को भी सन्मार्ग का बोध कराने में जो कुशल सिद्ध हुए, उन 'श्री स्थूलभद्र मुनि' को मैं वंदन करता हूँ।

English Translation

Where the courtesan (Kosha) was always affectionately attached, her attendants were ever-ready to serve, where food rich in all six tastes (delicacies) was served daily, where there was a brilliant, beautiful, and captivating palace to reside, and an exquisite body with the fresh bloom of youth available for union; and above all, it was the rainy season cloudy and romantic – even in such a deeply enticing environment, the one who respectfully and firmly conquered all lust (desire), and who was skilled in awakening (guiding to the right path) that young woman; to that great sage 'Shri Sthulabhadra Muni', I bow down.


Monday, March 24, 2025

१४१०. वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः

सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः |

स तु भवतु दरिद्रो यस्य तृष्णा विशाला

मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ||

 

आश्रमात रहाणारा योगी एका राजाला म्हणतो,

आम्ही लोक वृक्षाच्या सालाचे वस्त्र धारण करून जितके संतुष्ट आहोत, तितकेच खूप महाग रेशमाचे वस्त्र धारण करून तुम्ही [राजा] संतुष्ट आहात. संतुष्टी (happyness दोघांमध्ये ) सारखीच आहे. त्यात काहीच फरक नाही. जगात दरिद्री तो व्यक्ती आहे की ज्याच्या इच्छा खूप आहेत. मनाने संतुष्ट असणाऱ्याला कोण धनवान आणि कोण निर्धन.

Tuesday, March 18, 2025

१४०५. व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

[नियमित] व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुख यांची प्राप्ति होते. निरोगी असणे हे परम भाग्य आहे आणि [चांगल्या] स्वास्थ्यामुळे सर्व कार्य सिद्धिस जातात.

Tuesday, February 9, 2021

१३९८. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।

विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥


अर्थ 

अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. 

महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. 

Sunday, March 8, 2015

१३८९. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् |

उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||

अर्थ

विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की नाही?]

Tuesday, January 27, 2015

१३८२. वासश्चर्म विभूषणं शवशिरो भस्माङ्गलेपः सदा ह्येको गौः स च लाङ्गलाद्यकुशलः सम्पत्तिरेतादृशी |

इत्यालोच्य विमुच्य शङ्करमगाद्रत्नाकरं जाह्नवी कष्टं निर्धनिकस्य जीवितमहो दारैरपि त्यज्यते ||

अर्थ

कपडा म्हणजे काय तर कातडं! दागिना म्हणजे प्रेताची कवटी; अंगाला तर कायम भस्म फासलेलं; जवळ एकच बैल आणि त्याला [जमीन] नांगरायला वगैरे काहीच येत नाही, एवढीच काय ती मालमत्ता. असं सगळ बघून शंकराला सोडून दिऊन गंगा [रत्नांची खाण असणाऱ्या] समुद्राकडे की हो निघून गेली! दरिद्र्याच जगणंच कठीण! अहो बायको सुद्धा टाकून देते.

Monday, July 14, 2014

१३१८. वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैस्तनूमार्जनं भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |

पाठः संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे हा हा हन्त तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

अर्थ

[पोपट महाराज बोलतायत] माझा निवास सोन्याच्या पिंजऱ्यात आहे; राजेसाहेबांच्या करकमलानी स्नान होतय; गोडगोड आंबे, डाळिंब याचा आहार; अमृतासारखे पाणी प्यायला मिळतय; बुद्धिमान अशा मला दरबारात सतत रामनाम घ्यायचं काम [इतक्या सगळ्या आनंददायी गोष्टी लाभून सुद्धा] अरेरे माझं मन मात्र जिथे जन्म झाला त्या वृक्षाच्या फांदीकडेच धाव घेतय. [शुकान्योक्ती - शुक = पारतंत्र्यातली व्यक्ती ]

Wednesday, July 9, 2014

१३१७. वयं काका वयं काका जल्पन्तीति प्रगे द्विकाः |

तिमिरारिस्तमो हन्यादिति शङ्कितमानसाः ||

अर्थ

पहाटे कावळे [सूर्याला सांगण्यासाठी] "आम्ही कावळे आहोत; आम्ही कावळे आहोत असं ओरडत असतात. कारण तिमिरारि [अंधाराचा शत्रु असलेला] सूर्य तम [असं समजून] त्यांना मारून टाकेल ना, म्हणून ते घाबरलेले असतात!

Thursday, May 29, 2014

१२८४. वातोल्लासितकल्लोल धिक्ते सागर गर्जितम् |

यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकाम् ||

अर्थ

उसळलेल्या वाऱ्यामुळे मोठी गर्जना करणाऱ्या सागरा तुझा धिक्कार असो [कारण] तुझ्या किनाऱ्यावर तहानलेला वाटसरू विहीर कुठे असेल त्याची विचारणा करतो. [सागरान्योक्ती  सागर = कंजूष श्रीमंत; वाटसरू = गरीब याचक]

Friday, April 4, 2014

१२४०. व्यतिषजति पदार्थानान्तरः कोऽपि हेतुर्न खलु बहिरुपाधीन्प्रीतयः संश्रयन्ते |

विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकं द्रवति च हिमरश्मावुद्गते चन्द्रकान्तः ||


अर्थ

खरोखर प्रीति ही कुठल्यातरी बाह्य कारणावर अवलंबून नसते. अन्तःकरणातून ती पाझरते. पद्म [सूर्यविकासी कमळ] हे सूर्योदय झाला की [आपलं आपण] उमलत [खरं त्यांच्यात दृश्य असं काही संबंध नसला तरी] चंद्रकांत रत्न चंद्रोदय झाला की पाझरतो.

Wednesday, March 5, 2014

१२२१. वसन्त्यरण्येषु चरन्ति दूर्वा: पिबन्ति तोयान्यपरीग्रहाणि |

तथापि वध्या हरिणा नराणां को लोकमाराधयितुं समर्थः ||

अर्थ

हरणं जंगलात राहतात; कुणाची मालकी नसलेलं [जंगलातीलच] पाणी पितात; [इतर कोणाला नको असलेलं] गवत खातात. [म्हणजे कुणाचा ते तोटा करत नाहीत] तरीही माणसं त्यांना ठार करतात. [काय म्हणून मारतात? सर्व] जगाला कोणी संतुष्ट करू शकत नाही.

Thursday, February 27, 2014

१२१८. वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् |

यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ||

अर्थ

झाड तोडून; प्राण्यांना मारून; रक्ताचा चिखल करून [या नरकात पडण्यासारख्या  सद्गुणांमुळे{?}] जर स्वर्गात जाता येत असेल तर नरकात कोण जातो?

Tuesday, February 18, 2014

१२१२. वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |

विरते पयसि घनेभ्यः शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||

अर्थ

जोपर्यंत उदार मनुष्य दान करत असतो तोवर सर्वजण त्याच्याबद्दल गोड बोलत असतात. [पण त्याच्या कडचे पैसे संपले की स्तुती थांबते ] ढगांमधल पाणी संपल की मोरांचा केकारव थांबलाच.

Tuesday, February 11, 2014

१२०६. विषस्य विषयाणां च दृश्यते महदन्तरम् |

उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||

अर्थ

विषय आणि विष [सारखेंच असं काहीना वाटत पण] त्यांच्यात फार फरक आहे. विष खाल्लं तरच मारत विषयांच्या मात्र स्मरणाने सुद्धा माणसाला मृत्यू येईल.

Monday, February 10, 2014

१२०५. व्रजत्यध: प्रयात्युच्चैर्नरः स्वैरेवचेष्टितैः |

अधः कूपस्य खनक ऊर्ध्वं प्रासादकारकः ||

अर्थ

स्वतःच्या कृत्यान्मुळेच माणसाची प्रगती किंवा अधोगती होते. [आपण त्याबद्दल दुसऱ्याला दोष देऊ नये, जसं] खणत राहील तो खालीखाली जातो, मोठ घर बांधत राहिलं तर [आपोआप] वरवरच चढेल.