ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Showing posts with label ग. Show all posts

Monday, June 8, 2026
१४६४. गुणवज्जनसंसर्गाद् याति स्वल्पोऽपि गौरवम् ।
Friday, April 4, 2025
१४१७. गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे ।
अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥
विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.
Monday, June 30, 2014
१३०७. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणाः |
रात्रौ दीपशिखाकान्तिः न भानावुदिते सति ||
अर्थ
जरी [काही व्यक्ती खूप] गुणी असल्या त्यांच्या पेक्षा अधिक गुणवान लोकांसमोर त्यांचे गुण झाकोळून जातात. जसं दिव्याच्या ज्योतीच तेज रात्री पडत पण सूर्य उगवल्यावर [त्याच्या प्रखर तेजापुढे ते फिकं पडत आणि दिसतच] नाही.

१३०६. गाढं गुणवती विद्या न मुदे विनयं विना |
मूर्खतापि मुदे भुयान्महत्सु विनयान्विता ||
अर्थ
नम्रपणा नसला तर सखोल ज्ञान असून सुद्धा [श्रोत्याला] आनंद होणार नाही. थोर लोक जरी [एखाद्या विषयात] अडाणी असले तरी नम्रपणामुळे [आनंददायी] होतील. [माहित नसलेल्या गोष्टी ते नीट विचारून जाणून घेतील. गर्विष्ठपणा लोकांना तापदायक वाटतो.]

Monday, February 24, 2014
१२१६. गुणानामन्तरं प्रायस्तज्ञो वेत्ति न चापरः |
मालतीमल्लिकाऽमोदं घ्राणं वेत्ति न लोचनम् ||
अर्थ
त्या त्या गोष्टीतला ज्ञान्याला त्यातलं बिनचूक कळत इतरांना ते समजत नाही. मालतीचा सुवास नाकालाच कळतो डोळ्याला नाही.

Wednesday, January 8, 2014
११८४. गाङ्गमम्बु सितमम्बु यामुनं कज्जलाभमुभयत्र मज्जतः |
राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न चापचीयते ||
अर्थ
हे राजहंसा; गंगानदीच पाणी धवल असत; यमुनेच मात्र काळसर असत, पण दोन्ही पाण्यात विहार करत असताना तुझ शुभ्रपणा तस्साच असतो, तो वाढतही नाही आणि कमी सुद्धा होत नाही. [राजहंसान्योक्ती - राजहंस = ज्ञानी मनुष्य; भोवतालची परिस्थिती.]

Saturday, October 26, 2013
११२५. गृह्णन्तुसर्वे यदि वा यथेष्टं नास्ति क्षति: क्वापि कवीश्वराणाम् |
रत्नेषु लुप्तेषु बहुष्वमर्त्यैरद्यापि रत्नाकर एव सिन्धुः ||
अर्थ
जर आवडत असेल तर [आपली वाङ्गमय रत्न] सगळे जण हव्वी तेवढी घेवोत; श्रेष्ठ कविना [त्याची काहीच चिन्ता नसते] त्यात त्यांच काही नुकसान होत नाही. देवांनी [समुद्रमंथनाच्या वेळी खूप रत्न] पळवली तरी अजूनही सागर हा रत्नाकर - रत्नांचा खजिना आहेच. [प्रतिभावान कवींच अप्रतिम सारस्वत वाचून रसिकांनी मनसोक्त आनंद लुटला तरी त्या कलाकृतींच सौंदर्य कधीच कमी होत नाही हे या वाङ्गमय संपत्तीच वैशिष्ठ्य आहे.]

Friday, October 18, 2013
१११७. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः |
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनि:सृता ||
अर्थ
दुसऱ्या शास्त्रांच्या पसाऱ्याची जरूरच काय आहे? गीतेचे चांगल्या प्रकारे पठण करावे. ती तर खुद्द परमेश्वराच्या मुखकमलातून बाहेर आलेली आहे. [सर्व ज्ञानाच सार त्यात भरलेलं आहे.]

Sunday, July 7, 2013
१०५७. गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा |
पापं तापं च दैन्यं च हन्ति साधुसमागमः ||
अर्थ
गंगा [भागीरथी मधे स्नान केलं तर] पाप नाहीशी होतात. चन्द्र आपल्या [शीतल किरणांनी उन्हाचा] त्रास नाहीसा करतो. कल्पवृक्ष [आपण मागू ती वस्तू देऊन] गरिबी नाहीशी करतो [हे तिघं एकएक त्रासातून सुटका करतात पण] सज्जनांचा सहवास [एकटाच] ह्या तिन्ही त्रासातून सुटका करतो.

Friday, May 31, 2013
१०२६. गुणवन्त: क्लिश्यन्ते; प्रायेण भवन्ति निर्गुणा: सुखिनः |
बन्धनमायान्ति शुका; यथेष्टसंचारिण: काका: ||
अर्थ
या जगात गुणी लोकांनाच खूप कष्ट करावे लागतात. तर गुणहीन [काही कौशल्य नसलेले किंवा] दुर्गुणी लोक सुखात [आरामात] राहतात. पोपट पिंजऱ्यात अडकतात तर कावळे मात्र स्वैर विहार करत असतात.

Tuesday, May 28, 2013
१०२२. ग्रासोद्गलितसिक्थेन का हानिः करिणो भवेत् |
पिपीलिका तु तेनैव सकुटुम्बोपजीवति ||
अर्थ
हत्तीच्या घासातला एखादा तुकडा खाता खाता गळून पडला तर हत्तीच काय नुकसान होणार आहे? पण तेवढ्या [त्याच्या दृष्टीने लहानशा] तुकड्यात मुंगीचे अख्खे कुटुंब पोसले जाईल.

Tuesday, May 7, 2013
१००२. गुणेन स्पृहणीय: स्यान्न रूपेण युतो नर: |
सौगन्ध्यहीनं नादेयं पुष्पं कान्तमपि क्वचित् ||
अर्थ
[फक्त] देखणा आहे म्हणून [कौतुक मिळवणं ह्यापेक्षाही] माणसानी आपल्या गुणांमुळे हवाहवास वाटायला पाहिजे. फूल दिसायला सुंदर असलं तरी सुवासिक नसलं तर ते सहसा दिलं जात नाही. [रूपापेक्षा गुण अधिक महत्वाचे आहेत.]

९९८. गुणिनि गुणज्ञो रमते; नागुणशीलस्य गुणिनि परितोष: |
अलिरेति वनात्पद्मं; न दर्दुरस्त्वेकवासोऽपि ||
अर्थ = [स्वतः] गुणी माणसालाच गुणवंतांच प्रेम - कौतुक असत, ज्याला स्वतःला त्यात गति नसेल तर त्याला गुणवंताचा आदर - प्रेम काही वाटत नाही. भुंगा [अगदी दुरून] अरण्यातून [सरोवराकडे] येतो पण त्याच जलाशयात रहात असूनही बेडूक कमळाच्या [जवळपास] फिरकत नाही.

Tuesday, April 23, 2013
९९१. गुणैः सर्वत्र तुल्योऽपि सीदत्येको निराश्रयः |
अनर्घ्यमपि माणिक्यं हेमाश्रयमपेक्षते ||
अर्थ
सर्व गुणांनी इतरांएवढाच तुल्यबळ असला, त्याला कुणाचा आधार नसेल, तर तो [मनुष्य] जगात असफल बनतो. माणिक हे रत्न बहुमोल असले तरी त्याला कोंदण म्हणून सोन्याची जरुरी असतेच.

Thursday, February 28, 2013
९४०. गावो गन्धेन पश्यन्ति वेदै: पश्यन्ति वै द्विजा: |
चारै: पश्यन्ति राजानश्चक्षुभ्यामितरे जना: ||
अर्थ
गाई; बैलांना वासाने [पदार्थाचे] ज्ञान होते. ज्ञानी लोक वेदाने [त्यांना असणाऱ्या माहितीतून विचार करून सगळं] बघतात [त्या प्रसंगाचा सर्वंकष विचार करतात]; राजे [प्रशासक] हेरांच्या करवी लक्ष ठेवतात. आणि सामान्य माणसाला [मात्र] डोळ्याला दिसत [ते खरं] असं दिसत [वाटत.]

Monday, December 3, 2012
८६१. गीर्भिर्गुरूणां परुषाक्षराभिस्तिरस्कृता यान्ति नरा महत्वम् |
अलब्धशाणोत्कषणा नृपाणां न जातु मौलौ मणयो वसन्ति ||
अर्थ
गुरूंच्या कठोर वाक्ताडनानी झोडपले गेल्यानंतरच माणसे थोरपणा प्रत पोहोचतात. निकषाच्या[धारदार] दगडावर पैलू पाडून झाल्याशिवाय [सर्वं बाजूंनी धारेनी तासल्यावरच सुंदर तेज येत] कधी रत्ने राजांच्या डोक्यातील [मुगुटाला] शोभा आणत नाहीत.

Tuesday, November 6, 2012
८३६. गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यमादौ परिणतिरवधार्या यत्नत: पण्डितेन |
अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्तेर्भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाक: ||
अर्थ
चांगले [भले थोरले] किंवा अगदी साधं सुद्धा काम करण्यापूर्वी ज्ञानी माणसाने त्याचा परिणामांचा नीट विचार करावा. अतिशय घाईघाईने केलेल्या कामाचा हृदयाला जाळून टाकेल असा अतिशय बोचरा परिणाम, संकट संपेपर्यंत छळत राहतो.

Tuesday, October 16, 2012
८१६. गुणवत्तरपात्रेण च्छाद्यन्ते गुणिनां गुणा: |
रात्रौ दीपशिखाकान्ति: न भानावुदिते सति ||
अर्थ
माणूस [खूप] गुणी [असला तरी] त्याच्या पेक्षा अधिक गुणी [ज्ञानी] विद्वान जवळ असला तर त्याचे गुण झाकले जातात. [तितक कौतुक होत नाही; ते डोळ्यात भरत नाहीत] दिव्याच्या ज्वाळेचा उजेड रात्री जसा पडतो तसा सूर्य उगवल्यावर काहीच वाटत नाही.

Sunday, September 30, 2012
८००. गुणेषु क्रियतां यत्न: किमाटोपै: प्रयोजनम् |
विक्रीयन्ते न घण्टाभिर्गावो क्षीरविवर्जिता: ||
अर्थ
गुण [अंगी बाणवण्याचा] प्रयत्न करावा, बडेजावाचा काय बरं उपयोग? जर गाई दूध देत नसतील तर [त्यांच्या गळ्यात बांधलेल्या] घंटांमुळे त्या विकल्या जात नाहीत.

Thursday, August 30, 2012
७७२. गृहं शिशुविवर्जितं विगतभर्तृका बालिका पुरी सततनिर्जला जनपदोऽरिभि: पीडित: |
वनं दवसमाकुलं तरुमनाश्रिता वल्लरी शठः परमधार्मिको मनसि सप्त शल्यानि
मे ||
अर्थ
मुल नसलेलं घर; विधवा मुलगी; पाण्याचे वांधे असणार गाव; दुष्ट त्रास देत असलेल ठिकाण; सगळीकडे दवं पसरलेलं अरण्य; झाडाचा आधार न मिळालेली वेल आणि अतिशय धार्मिक असा ठग अशी सात शल्ये माझ्या मनाला बोचतात. [शशी दिवसधूसरो या श्लोकाचे अनुकरण ]

Subscribe to:
Posts (Atom)