भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, March 8, 2021

१४०० : ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(  आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्‍या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. ( त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत. तस घडाव.

Tuesday, February 9, 2021

१३९९. दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।

दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः॥
 

अर्थात 

श्री कृष्ण, प्रत्येकास वरदान देणारा, दुराचारी माणसाचा छळ करणारा‌ व त्यांना शुद्ध करणारा, जो आपल्या हातांनी दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या दुराचारी लोकांचा नाश करू शकतो. त्या कृष्णाने शत्रूवर आपले वेदनादायक बाण मारले!

माघ कवींनी केलेली कृष्ण स्तुती 

साभार : विश्वंभर मुळे (गोंदीकर)

१३९८. विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः।

विकाशमीयुर्जगतीशमार्गणा विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः॥


अर्थ 

अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत. ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. ह्याप्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पाहण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत. 

महायमक अलंकरातील एक श्लोक आहे. ह्याचे चारही पद सारखे आहेत पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे. 

१३९७. न नोननुन्नो नुन्नोनो नाना नाना नना ननु।

नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नन्नुनन्नुनुत्।।


अर्थ 

जो मनुष्य युध्दात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून घायाळ होतो तो खरा मनुष्य नाहीये, जो आपल्यापेक्षा दुर्बलांना घायाळ करतो तो ही खरं मनुष्य नाही ये, ज्या मनुष्याचा स्वामी घायाळ नाही ये तो घायाळ नाहीये आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाहीये. 

'किरातार्जुनीयम्' ह्या काव्य संग्रहात महाकवी 'भारवि' ह्यांनी केवळ 'न' चा वापर करून श्लोक तयार केला आहे.


१३९६. भूरिभिर्भारिभिर्भीभीराभूभारैरभिरेभिरे।

भेरीरेभिभिरभ्राभैरूभीरूभिरिभैरिभा:।।

अर्थ 

जमिनीला पण वजनदार वाटेल अशा, वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणाऱ्या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर हल्ला केला.

संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतातील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. 

'माघ' नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या 'शिशुपालवधम्' ह्या महाकाव्यात केवळ 'भ' आणि 'र' ह्यांचा वापर करून एक श्लोक तयार केला आहे.

१३९५, क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।

तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।

अर्थ

पक्ष्यांचं प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसऱ्याच्या बलाच अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराच सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत.
ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आले आहेत आणि ते ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. 


स्वर - अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः।
व्यंजन -
कंठ्य- क ख ग घ ङ ।
तालव्य- च छ ज झ ञ ।
मुर्ध्न्य- ट ठ ड ढ ण ।
दन्त्य- त थ द ध न ।
ओष्ठ्य- प फ ब भ म ।
मृदु व्यञ्जन - य र ल व श ष स ।
महास्फुट प्राण- ह क्ष । 


वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे  ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण (कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे.

Wednesday, September 27, 2017

१३९४. सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् |

चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते ||

विवेकचूडामणि, २४.

अनायास जे सर्व दुख: आपल्याला प्राप्त होतं, त्याचा प्रतिकार न करता किंवा त्याचा शोक न करता, शान्तचित्ताने त्याला सामोरे जाणे म्हणजेच तितिक्षा.