अष्टाभिर्यस्य
कृत्स्नं जगदपि तनुभिर्बिभ्रतो नाभिमानः सन्मार्गालोकनाय व्यपनयतु स
नस्तामसीं वृत्तिमीशः ||
अर्थ
भक्तांना भरपूर फळ देणारा असा हा महेश
सर्व ऐश्वर्य त्याच्यामध्ये एकवटलं असून सुद्धा स्वतः [व्याघ्र] चर्म परिधान
करतो. अर्धांगी शरीरातच अन्तर्भूत असूनही; विषयापासून निवृत्त अशा तापसी
यतींमध्ये तो भगवान अग्रगण्य आहे. आपल्या अष्ट प्रकृतींनी सर्व जग धारण
करत असूनही ज्याला अभिमान शिवत नाही अशा त्या भगवान शंकराने आम्ही
सन्मार्गावर रहावं म्हणून आमच्या तामस वृत्तीचे हरण करावे,
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Showing posts with label ए. Show all posts

Tuesday, February 17, 2015
Monday, May 19, 2014
१२७२. एकसार्थप्रयातानां सर्वेषां तत्र गामिनाम् |
यद्येकस्त्वरितं यातस्तत्र का परिदेवना ||
अर्थ
सर्वच लोक जिथे [परलोकी] जाणार आहेत अशा तांड्यातील एक जण जर पटकन गेला तर त्याच काय दुःख करायचय ? [एखाद्या आप्ताला लवकर मृत्यू आला म्हणून दुःख करण्यापेक्षा आपल्याला पण मृत्यू येणार आहे] म्हणून आसक्ति घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Saturday, April 12, 2014
१२४७. एकः स एव जीवति हृदयविहीनोऽपि सहृदयो राहुः |
यः सकललघिमकारणमुदरं न बिभर्ति दुःपूरम् ||
अर्थ
खरोखर तो राहू हा एकटा [अगदी निष्काळजी असा मजेत ऐश करून] राहतो. [त्याच्या कठोर वागण्यानी असं वाटत की हळव असं] मन त्याला नाही. [पण आपल्याला अमृत मिळाल पाहिजे असं वाटणार ] हृदय आहे आणि [त्याच धड अमृतमंथनाच्या वेळी कापल्यामुळे] सर्व अपमानाचं कारण असणार आणि पूर्तता करण्यास फार कठीण असं उदर नाहीये [त्यामुळे त्याला काही चिंताच नाही.]

Wednesday, March 26, 2014
१२३४. एकः स्वादु न भुञ्जीत नैकः सुप्तेषु जागृयात् |
एको न गच्छेदध्वानं नैकश्चार्थान्प्रचिन्तयेत् ||
अर्थ
[बरोबरच्या इतरांना वगळून] एकट्याने गोड [किंवा स्वादिष्ट] खाऊ नये. [सगळे] झोपलेले असताना एकट्याने जागू नये. रस्त्याने [प्रवासाला] एकट्याने जाऊ नये. [इतर भागीदार सोडून] एकट्यालाच फायदा; समृद्धी मिळवायचा विचार करू नये.

Sunday, March 9, 2014
१२२४. एता हसन्ति च रुदन्ति च वित्तहेतोर्विश्वासयन्ति पुरुषं न च विश्वसन्ति |
तस्मान्नरेण कुलशीलसमन्वितेन वेश्या: श्मशानघटिका इव वर्जनीयाः ||
अर्थ
वेश्या या पैशासाठी [कृत्रिम] हसतात किंवा रडतात. त्या गिऱ्हाइकाला [नाटक करून त्यांच प्रेम असल्याची] खात्री पटवतात, पण त्या त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हे राजा; स्मशानातील मडक्याप्रमाणे घरंदाज माणसाने त्यांना टाळावं.

Tuesday, December 31, 2013
११७८. एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च हन्यते |
सराष्ट्रं सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ||
अर्थ
विष [पाजल्यावर] एकालाच मारता येत. शस्त्रांनी एखादाच [मेला तर] मरतो. पण गुप्त खलबत्ताच्या वादळाने सगळ्या प्रजेसकट आणि राजासकट सर्व राष्ट्र नाश पावत.

Thursday, November 14, 2013
११३९. एको हि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोरिति यो बभाषे |
न तेन दृष्टं कविना समस्तं दारिद्र्यमेकं गुणकोटिहारि ||
अर्थ
पुष्कळ गुण असताना एखादा दोष लपून जातो, [झाकला जातो] असं कवि [कालिदासाने कुमारसंभवात असं लिहिल आहे] म्हणतो, त्याला हे काही दिसलं नव्हत [त्याच्या हे कसं लक्षात आल नाही की] गरिबी [हा] एकच दोष कोट्यावधी गुणांचा नाश करतो.

Friday, August 30, 2013
१०९१. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |
दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||
अर्थ
एकाचा [दात्याचा] हात वर असतो आणि दुसऱ्याचा [घेणाऱ्याचा] हात खाली असतो. या [उच्च स्थान आणि खालच स्थान] या दोन हातांच्या स्थानामुळे [दाता कोण आणि याचक कोण हे] दाता आणि याचक यांच्यातला फरक कळतो.

Tuesday, July 23, 2013
१०६९. एकमेवाक्षरं यस्तु गुरुः शिष्यं प्रबोधयेत् |
पृथिव्यां नास्ति तद्द्रव्यं यद्दत्वा चानृणी भवेत् ||
अर्थ
गुरुनी शिष्याला जरी एखादंच अक्षर शिकवलं तरी; त्यांना एखादी वस्तु देऊन; त्या उपकाराची फेड करता येईल अशी कोणतीही वस्तु या जगात नाही.

Wednesday, January 23, 2013
९०५. एतेन मापयति भित्तिषु कर्ममार्गमेतेन मोचयति भूषणसम्प्रयोगान् |
उद्धाटको भवति यन्त्रदृढे कपाटे दष्टस्य कीटभुजगैः परिवेष्टनं च || मृच्छकटिक
अर्थ
[जानव्याचे चोराला उपयोग] [कुठे आणि किती काम { खोदण्याचं किंवा वेगळं} करायचं आहे ते] ह्या [जानव्यानी] मोजता येत; एकमेकात घट्ट गुंतलेले दागिने सोडवता येतात. कुलपाने घट्ट लावलेली कपात उघडता येतात आणि किडे; साप चावले तर [दंश केलेली जागा] घट्ट बांधता येते.
Saturday, January 12, 2013
८९२. एह्यागच्छ गृहाण चासनमिदं कस्माच्चिरात् दृश्यसे ? का वार्ता ?ह्यतिदुर्बलोऽसि कुशलं प्रीतोऽस्मि ते दर्शनात् |
एवं ये
समुपागतान्प्रणयिन: प्रल्हादयन्त्यादरात्तेषां युक्तमशङ्कितेन मनसा
हर्म्याणि गन्तुं सदा ||
अर्थ
जे प्रेमळ लोक त्यांच्या घरी गेल्यावर; " ये ,ये ह्या बैठकीवर बैस. किती दिवसांनी भेटतोयस, काय [नवी] बातमी? खूप खराब झालायस. [सगळं] ठीक आहे ना? तुला भेटून खूप बर वाटलं" अशाप्रकारे बोलून [पाहुण्याला] आनंदित करतात, त्यांच्या घरी निर्भय मनाने नेहमी जावं.

Thursday, December 20, 2012
८७६. एकस्य कर्म संवीक्ष्य करोत्यन्योऽपि तादृशम् |
गतानुगतिको लोको न लोक: पारमार्थिक: ||
अर्थ
एखाद्या माणसानी काही कृती केली की ती पाहून दुसरा पण तसच करतो. जग हे अनुकरणप्रिय असतं. [त्या कामाच] खर कारण काय याचा कोणी विचार करत नाही.

Tuesday, August 21, 2012
७६२. एकवर्णं यथा दुग्धं भिन्नवर्णासु धेनुषु |
तथैव धर्मवैचित्र्यं तत्वमेकं परं स्मृतम् ||
अर्थ
गाई वेगवेगळया रंगाच्या असल्या तरी त्यांच दुध मात्र एकाच रंगाच [थोडस पिवळसर] असतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे धर्म असले तरी [सत्य; अहिंसा वगैरे] तत्व सर्वं धर्मात सारखीच असतात असे आपल्या स्मृतीत [हिंदू धार्मिक ग्रंथ] सांगितले आहे.

Monday, June 18, 2012
७०४. एकवस्तुं द्विधा कर्तुं बहवः सन्ति धन्विन: ||
धन्वी स मार एवैको द्वयोरैक्यं करोति य: ||
अर्थ
एका वस्तूचे दोन [किंवा अधिक] तुकडे करणारे खूप धनुर्धर आहेत. पण एकच
[आश्चर्यकारक] धनुर्धर [मदन] आहे की जो [त्याच्या धनुष्याचा नेम धरून]
दोघांच्या मधे ऐक्य घडवून आणतो. [तोडफोडी न करता उलट जोडण्याचं काम करतो.]
Tuesday, May 8, 2012
६६६. एक एव खगो मानी चिरं जीवतु चातक: |
म्रियते वा पिपासार्त: याचते वा पुरन्दरम् ||
अर्थ
अतिशय स्वाभिमानी असा एकच चातक पक्षी आहे [त्याला] प्रदीर्घ आयुष्य लाभो. तो एक तर इंद्राच्या [मेघाकडे] याचना करतो आणि [जर त्यांनी पाऊस पाडला नाही तर] मरून जातो [पण दुसऱ्या कोणाकडे तोंड वेंगाडत नाही; अशी कवि कल्पना आहे की चातक पक्षी फक्त ढगातून पडणारं ताज पाणीच पितो नद्या; तलाव; विहिरी यातलं पाणी तो कधीही पीत नाही.]

Monday, April 23, 2012
६५३. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |
दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||
अर्थ
एक खाली असलेला [हात आणि] आणि दुसरा वर असलेला हात अशा दोन हातांमुळे देणारा आणि घेणारा समजतोच. [देणा-याचा हात वर आणि घेणा-याचा हात खाली असतो. म्हणजे दाता श्रेष्ठ आहे अगदी प्रत्यक्षच दिसत.]

Tuesday, February 7, 2012
५८६. एक एव तप: कुर्यात् द्वौ स्वाध्यायपरौ हितौ |
त्रयोऽधिका वा क्रीडायां प्रवासेऽपि च ते मता: ||
अर्थ
तपश्चर्या करायला एकट्यानेच बसावे. अभ्यासाला मात्र दोघे असणं हितकारक असतं. खेळ किंवा प्रवासाला तीन किंवा त्यापेक्षा अधिक सवंगडी चांगले असं म्हणतात.

Tuesday, December 13, 2011
५३१. एष वन्ध्यासुतो याति खपुष्पकृतशेखर: |
कूर्मक्षीरचये स्नात: शशशृङ्गधनुर्धर: ||
अर्थ
सशाच्या शिंगाचं धनुष्य घेऊन; डोक्यावर आकाशपुष्पे माळून; विपुल अशा कासवाच्या दुधात नाहून हा वांझोटीचा मुलगा चालला आहे. [तत्वज्ञानी लोक जग हा असा आभास आहे असं सांगतात; वदतो व्याधात असं अशा वाक्यांना म्हणतात]

Tuesday, October 18, 2011
४७४. एते सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यमभृता स्वार्थाविरोधेन ये |
तेऽमी मानुषराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये , ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे ||
अर्थ
स्वतःच्या फायद्याचा त्याग करून दुसऱ्यांची कामे करतात ते सज्जन. स्वतःच्या मतलबाला धक्का न लावता [जेवढी जमेल तेवढी] मदत दुसऱ्यासाठी करतात त्यांना सामान्य लोक म्हणावे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच नुकसान करता ते मनुष्य रूपी राक्षसच होत. [पण स्वतःचा काही फायदा सुद्धा नसताना] विनाकारणच दुसऱ्यांच नुकसान करणारांना काय म्हणावं ते आम्हाला [सुद्धा] समजत नाही.

Thursday, September 15, 2011
४४४. एह्यागच्छ गृहाणमासनमिदं कस्माच्चिरात् दृश्यसे? का वार्ता? ह्यतिदुर्बलोऽसि कुशलं प्रीतोऽस्मि ते दर्शनात् |
एवं ये समुपागतान्प्रणयिन: प्रल्हादयन्त्यादरात् तेषां युक्तमशङ्कितेन मनसा हर्म्याणि गन्तुं सदा ||
अर्थ
"या; या; ह्या आसनावर बसा; किती दिवसांनी भेटलात! [तुमच्याकडची] काय बातमी? किती खराब झालात [सगळं] खुशाल आहे ना? तुमच्या भेटीमुळे [मला फार] आनंद झाला" अशाप्रकारे प्रेमळ असे जे लोक पाहुण्यांना आनंदित करतात त्यांच्या घरी नेहमी निर्धास्तपणे जाणे चांगल [कंटाळा करणाऱ्याकडे जाऊ नये.]

Subscribe to:
Posts (Atom)