भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, February 9, 2021

१३९५, क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण:।

तथोदधीन पफर्बाभीर्मयोSरिल्वाशिषां सह।।

अर्थ

पक्ष्यांचं प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसऱ्याच्या बलाच अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल व निर्भीड आणि महासागराच सर्जन करणारा कोण आहे? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचे देखील आशीर्वाद प्राप्त आहेत.
ह्यात जर आपण पाहिलं तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आले आहेत आणि ते ही अगदी क्रमाने. तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली तर ती सर्वात वैज्ञनिकदृष्ट्या तयार झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. 


स्वर - अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः।
व्यंजन -
कंठ्य- क ख ग घ ङ ।
तालव्य- च छ ज झ ञ ।
मुर्ध्न्य- ट ठ ड ढ ण ।
दन्त्य- त थ द ध न ।
ओष्ठ्य- प फ ब भ म ।
मृदु व्यञ्जन - य र ल व श ष स ।
महास्फुट प्राण- ह क्ष । 


वरील वर्गीकरण जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की किती वैज्ञानिक भाषा आहे संस्कृत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर वेगळे व्यंजन वेगळे इंग्रजी सारखं सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जिभेच्या द्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे  ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य. परत पुढे जर पाहिले तर प्रत्येक वर्गातील १ व ३ व्यंजन अल्पप्राण (कमी श्वास लागणारे) आणि २ व ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सगळ्यात योग्य भाषा आहे असं वैज्ञानिकांच मत आहे.

No comments: