भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, September 4, 2025

१४२४. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्ययशसः श्रियः |

ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा || 


हा विष्णुपुराणात आला आहे.  (विष्णु पुराण ६\५\७४) काही ठिकाणी धर्मस्य ऐवजी वीर्यस्य असा शब्द आहे. 


अर्थ:

संपूर्ण समृद्धता, धर्म , कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य असणे या सहा गोष्टी एकदम असतात त्याला "भग" असे म्हणतात.

या सर्वांचा स्वामी असल्याने देवाला "भगवान " असे म्हणतात.