दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||
अर्थ
एकाचा [दात्याचा] हात वर असतो आणि दुसऱ्याचा [घेणाऱ्याचा] हात खाली
असतो. या [उच्च स्थान आणि खालच स्थान] या दोन हातांच्या स्थानामुळे [दाता
कोण आणि याचक कोण हे] दाता आणि याचक यांच्यातला फरक कळतो.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, August 30, 2013
१०९१. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |
१०९०. मन्दं हसन्तं प्रभया लसन्तं जनस्य चित्तं सततं हरन्तम् |
वेणुं नितान्तं मधु वादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||
अर्थ
मृदु हास्य करणाऱ्या; तेजाने झळकणाऱ्या सतत लोकांचे चित्त आकर्षित करणाऱ्या; अत्यंत गोड आवाजात बासरी वाजवणाऱ्या बाळकृष्णाचे मी मनापासून स्मरण करते.

Wednesday, August 28, 2013
१०८९. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः |
ध्यानावास्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ||
अर्थ
अतिशय उत्कृष्ट अशा कवनांनी ब्रह्मदेव; वरुण; इंद्र; मरूतगण ज्याची स्तुती करतात; सामगायन करणारे ऋषि वेदाच्या ऋचांचे यथाविधी पठण करतात; त्याच्यावर लक्ष्य एकाग्र करून त्याच्याच स्वरूपात परिणत होऊन योगी ज्याचं दर्शन घेतात; देव किंवा राक्षस या पैकी कोणालाच ज्याच पूर्ण आकलन झालं नाही अशा परमेश्वराला मी वंदन करते.

Friday, August 23, 2013
१०८८. कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |
कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||
अर्थ
मोठ्या प्रासादांचा शेवट अंतर्गत भांडणांमुळे, [खूप श्रीमंती असली तरी भाऊबंदकी मुळे सर्वांचे पैसे वकिलाकडे जाऊन ते वैभव रहात नाही.] मैत्रीचा शेवट वाईट बोलण्याने होतो, राष्ट्राचा अन्त वाईट राजामुळे होतो व अपकृत्यामुळे माणसाची कीर्ती लयाला जाते.

१०८७. प्राप्ते भये परित्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम् |
केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ||
अर्थ
भीतीदायक [परिस्थिती आली] असता मित्र हा रक्षणकर्ता; प्रेमाचा आणि विसाव्याचे स्थान असतो. मित्र हि दोन अक्षरे असलेले हे रत्न कोणी बरे निर्माण केले. [त्या देवाला धन्यवाद.]

१०८६. काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति |
सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणां मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति ||
अर्थ
लाकडे एकामेकावर घासल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो. [खरं म्हणजे हे फार कठीण काम आहे पण प्रयत्नपूर्वक सतत करत राहिल्यास यश मिळत.] जमीन खणत राहिल्याने [खूप काळाने का होईना] पाणी लागत. उत्साही लोकांना अशक्य असे काही नाही. [योग्य रीतीने] प्रयत्न केल्यावर ते फलद्रूप होतातच.

१०८५. तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले |
यावच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ||
अर्थ
[आज संस्कृत -दिन आहे २०/०८/२०१३] जोपर्यंत आर्यांचा वंश या जगामध्ये अस्तित्वात आहे, तोपर्यंत देवांची असलेली ही नितांतसुंदर आणि सामर्थ्यवान अशी संस्कृत भाषा अढळ स्थानी राहील.

Monday, August 19, 2013
१०८४. पशुखलजनमध्ये खलस्त्याज्यो पशुर्वरम् |
पशवस्तु रक्षणीयाः कृतघ्नो न तु दुर्जनः ||
अर्थ
पशु व दुष्ट माणूस यांमध्ये दुष्टाचा त्याग करणे हे बरोबर आहे. [त्या दोघात] पशु बरा. कृतघ्न, दुष्ट माणसाचे रक्षण करू नये, प्राण्यांच करावं.

१०८३. वचस्तत्र प्रयोक्तव्यं यत्रोक्तं लभते फलम् |
स्थायी भवति चात्यन्तं रागः शुक्लपटे यथा ||
अर्थ
बोलणे ज्याठिकाणी फलदायी होईल [बोलण्याचा जिथे उपयोग होईल] त्याच ठिकाणी बोलावे. पांढऱ्या कापडावर दिलेला रंग पक्का बसतो, त्याप्रमाणे [आधीच गडद अशा रंगावर पुन्हा दुसऱ्या रंगाचा हात दिला तर काहीच उपयोग होत नाही तसं असतं.]

Friday, August 16, 2013
१०८२. न स्वल्पस्य कृते भूरि नाशयेन्मतिमान्नर: |
एतदेव हि पाण्डित्यं यत्स्वल्पाद्भूरि रक्षणम् ||
अर्थ
बुद्धीमान माणसाने छोट्याशा गोष्टी साठी मोठ्या गोष्टींचा नाश करू नये. थोडे [देऊन] मोठ्याचं रक्षण करणे यातच शहाणपण आहे.

१०८१. राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा राष्ट्रगीतं तथैव च |
एतानि मानचिह्नानि सर्वदा हृदि धार्यताम् ||
अर्थ
आपला राष्ट्रध्वज [तिरंगा] राष्ट्रगीत [वन्दे मातरम्; जन गण मन] आणि राष्ट्रभाषा हिंदी, ही आपली मानचिह्ने आहेत. त्यांचा आपण नेहमी आदर राखला पाहिजे.

Wednesday, August 14, 2013
१०८०. विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |
आवेष्टितो महासर्पैश्चन्दनो न विषायते ||
अर्थ
संगत [वाईट] असली तरी त्या दोषामुळे सज्जन लोक बिघडत नाहीत. मोठमोठ्या [विषारी] सापांनी वेटोळी घातली, तरीसुद्धा चंदनाचे झाड विषारी बनत नाही.

Tuesday, August 13, 2013
१०७९. ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||
अर्थ
कृती शिवाय ज्ञान श्रेष्ठ नाही [निरुपयोगी आहे] बुद्धी शिवाय कर्म देखील चांगले नाही [डोकं चालवाल्याशिवाय कामाची हमाली देखील वाया जाते] तेंव्हा दोन्ही [बुद्धी आणि कृती यामुळे] चांगले फळं मिळेल, कारण पक्षी एका पंखाने उडू शकत नाही [नुसत ज्ञान असून उपयोग नाही त्याला कृतीची जोड हवी विचारपूर्वक काम केलं तरच यश मिळत.]

१०७८. पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता |
पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदास्तु वः ||
अर्थ
पिनाक [त्रिशूळ] फणी [सर्प] बालेन्दु [चंद्रकोर] भस्म आणि मंदाकिनी [गंगा] या "प " वर्गाने युक्त अशी [भगवान शंकराची] मूर्ति तुम्हाला अपवर्ग [मोक्ष] मिळवून देवो.
Monday, August 12, 2013
१०७७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनैः सुजनैः सह |
स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ||
अर्थ
सुष्ट असोत किंवा दुष्ट [एकाचवेळी] खूप लोकांशी भांडण करू नये. साप [अगदी भयानक आणि] फुरफुरणारा असला तरी [एकटाच असेल तर पुष्कळशा] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.

Friday, August 9, 2013
१०७६. यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा |
यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजं तथाङ्कुरः ||
अर्थ
देश [भूप्रदेशा] प्रमाणे भाषा असते. [काही मैलानंतर बोलीभाषेत फरक पडतो] राजाच्या वर्तनावर प्रजेचं वागणं अवलंबून असत. पाणी तिथल्या जमिनीवर अवलंबून असत. ज्याचं बियाणे लावलं तसलीच फळे मिळतात.

Thursday, August 8, 2013
१०७५. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |
नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ||
अर्थ
जीवनातला एखादा क्षण सुद्धा [कितीही किंमत दिली] अगदी सगळी रत्न दिली, तरीही [परत] मिळत नाही. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.

१०७४. सह्याद्रिर्गगनप्रविष्टशिखरैर्नागाश्रितैर्गव्हरैर्नृत्यद्भिश्च नदद्भिरुच्चशिखरात्पातालगैर्निर्झरैः |
तालैर्वायुविकम्पिपत्ररुचिरैर्वन्यैः सुपुष्पद्रुमैर्भव्यस्तिष्ठति शोभनः पदनतो यस्यापरस्तोयधिः || माधव अणे
अर्थ
गगनचुंबी शिखरांमुळे; सर्पांनी आश्रय घेतलेल्या गुहांमुळे; उंच शिखरांवरून खाली खोलखोल जाणाऱ्या निर्झरानी बनलेल्या मोठ्या नद्यांच्या नर्तनामुळे; वाऱ्यामुळे हलणाऱ्या सुंदर पानांच्या ताडवृक्षामुळे; शोभून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या पायाशी अतुलनीय असा समुद्र लोळण घेत आहे.

Tuesday, August 6, 2013
१०७३. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मतिः |
खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनागपि ||
अर्थ
ज्या अर्थी दुष्ट लोकांच्या धारदार वाग्बाणांनी [अतिशय वाईट अशा
आरोपांनी] देखील सज्जनांच्या अन्तःकरणाला जरा सुद्धा जखम होत नाही,
त्यावरून त्यांची मने अत्यंत कठोर असतात असे मला वाटते.
Subscribe to:
Posts (Atom)