भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, April 4, 2025

१४१७. गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे ।

अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥

विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.

Thursday, April 3, 2025

१४१६. नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः।

नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥

ज्याप्रमाणे एक वीणा तारे शिवाय आणि रथ चाका शिवाय चालवता येत नाही, त्याच प्रमाणे एक स्त्री तिच्या पती शिवाय सुखी राहू शकत नाही, जरी तिला शंभर पुत्र असतील तरीही

Wednesday, April 2, 2025

१४१५. आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः |

राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमम् ||

दयाळूपणा, करुणा, विद्वत्ता, सत्चरित्रता, आत्मसंयम, शांत स्वभाव, हे सहा गुण नेहमी भगवान रामाला सुशोभित करतात.

Monday, March 31, 2025

१४१४. अव्याहृतं व्याहृताच्छ्रेय आहु:

सत्यं वदेद्‌ व्याहृतं तत्‌ द्वितीयम्‌ ।

प्रियं वदेद्‌ व्याहृतं तत्‌ तृतीयं

धर्मं वदेद्‌ व्याहृतं तच्चतुर्थम्‌ ॥

बोलण्यापेक्षा न बोलण हेच चांगलं सांगितलं आहे. [बोलणं वाणीचं प्रथम वैशिष्ट्य आहे आणि जर बोलावं लागलं तर] खरं बोलणं हे वाणीचं दुसरं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मौनाची अपेक्षा पण अधिक लाभदायक आहे. [सत्य आणि] प्रिय बोलणं वाणीचे तिसरे वैशिष्ट्य आहे. [जर सत्य, प्रिय] यांच्या बरोबर जर धर्म संम्मत बोलणे ही वाणीची चौथी विशेषता आहे. [यांच्यामध्ये उत्तरोत्तर श्रेष्ठता आहे.

Sunday, March 30, 2025

१४१३. न प्रहॄष्यति सन्माने नापमाने च कुप्यति।

न क्रुद्ध: परूषं ब्रूयात् स वै साधूत्तम: स्मॄत:॥

जो माणूस सन्मान केल्यावर आनंदी होत नाही आणि अपमान केल्यावर त्याला राग येत नाही, व राग आला तरी कठोर बोलत नाही, त्यालाच सज्जन माणसांमध्ये श्रेष्ठ म्हणतात.

Friday, March 28, 2025

१४१२. न कश्चित् कस्यचिन्मित्रं न कश्चित् कस्यचित् रिपु:।

कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवस्तथा॥

कोणी कोणाचा मित्र नाही किंवा शत्रु सुद्धा नाही. कारणानेच लोक शत्रु किंवा मित्र बनतात.

Wednesday, March 26, 2025

१४११. यस्मिन् जीवति जीवन्ति बहवः स तु जीवति |

काकोऽपि किं न कुरुते चञ्च्वा स्वोदरपूरणम् ||

ज्याच्या जगण्यामुळे अनेक लोकांचे जीवन चालते, तोच माणूस [जीवनात] खरा विजयी म्हटला जातो. जो जगल्यामुळे खूप लोकांना जगण्यासाठी (मदत)ह़ोते.तोच खरा जगला.(त्याच्या जगण्याचं सार्थक झाले, नाही तर) कावळे सुद्धा चोचीने आपले पोट भरत नाहीत काय?

Monday, March 24, 2025

१४१०. वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः

सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः |

स तु भवतु दरिद्रो यस्य तृष्णा विशाला

मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ||

 

आश्रमात रहाणारा योगी एका राजाला म्हणतो,

आम्ही लोक वृक्षाच्या सालाचे वस्त्र धारण करून जितके संतुष्ट आहोत, तितकेच खूप महाग रेशमाचे वस्त्र धारण करून तुम्ही [राजा] संतुष्ट आहात. संतुष्टी (happyness दोघांमध्ये ) सारखीच आहे. त्यात काहीच फरक नाही. जगात दरिद्री तो व्यक्ती आहे की ज्याच्या इच्छा खूप आहेत. मनाने संतुष्ट असणाऱ्याला कोण धनवान आणि कोण निर्धन.

१४०९. मातृवत् परदारेषु परद्रव्याणि लोष्ठवत्।

आत्मवत् सर्वभूतानि यः पश्यति सः पण्डितः॥

दुसऱ्याच्या पत्नीला आपल्या माते समान [जो मानतो], दुसऱ्याच्या संपत्तीला माती समान [जो मानतो]. सर्व वस्तू (चेतन किंवा अचेतन) या मध्ये (ब्रह्माचा अंश तसेच मी) आहे [असे ज्याला समजते] तोच खरा ज्ञानी.

Friday, March 21, 2025

१४०८. पिता धर्मः पिता स्वर्गः पिता हि परमं तपः।

पितरि प्रीतिमापन्ने सर्वाः प्रीयन्ति देवता।।

पिता हाच धर्म आहे, पिता हा स्वर्ग आहे आणि पिता हिच सर्व श्रेष्ठ तपस्या आहे. वडील प्रसन्न झाल्यावर सर्व देव प्रसन्न होतात.

Thursday, March 20, 2025

१४०७. क्षमावशीकृतेर्लोके क्षमया किं न साध्यते।

 शान्तिखड्गः करे यस्य किं करिष्यति दुर्जनः।।

ह्या जगात क्षमा [केल्याने] लोक वश होतात. क्षमा केल्याने काय साधत नाही. [सर्व साध्य होते]. ज्या माणसापाशी शांती रूपी तलवार आहे, [त्याचं] दुष्ट काहिही वाकड करू शकत नाही.

Wednesday, March 19, 2025

१४०६. आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः।

नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।

आळशीपणा हा माणसाचा शरीरातला सर्वात मोठा शत्रु आहे व माणसाचा सर्वात मोठा मित्र परिश्रम हा आहे. याची कास धरल्यास (कोणाचाही) नाश होत नाही.

Tuesday, March 18, 2025

१४०५. व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

[नियमित] व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुख यांची प्राप्ति होते. निरोगी असणे हे परम भाग्य आहे आणि [चांगल्या] स्वास्थ्यामुळे सर्व कार्य सिद्धिस जातात.

Monday, March 17, 2025

१४०४. क्रोधमूलो मनस्तापः क्रोधः संसारबन्धनम्।

धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥

क्रोध हा मनाच्या दुखा:चे प्राथमिक कारण आहे. संसार बन्धनाचे कारण असतो. क्रोध हा धर्माचा नाश करणार असतो. त्यामुळे [माणसाने] क्रोधाचा निरंतर त्याग करावा.