अतिपरिचयदोषात्कस्य नो मानहानिर्नवनवगुणरागी प्रायशो जीवलोकः ||
अर्थ
पहिल्या दिवशी [शुद्ध प्रतिपदेला] उगवलेल्या चंद्राला सर्वजण वंदन
करतात. सर्व कलांनी पूर्ण असलेल्या [पौर्णिमेच्या] चंद्राला नमस्कार
करत नाहीत. अतिपरिचयाने कोणाची मानहानी होत नाही बरे? बहुतांशी मानवप्राणी
नवनवीन गोष्टींवर प्रेम करतो.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, September 2, 2013
१०९३. प्रथमदिवसचन्द्र: स च सकलकलाभि: पूर्णचन्द्रो न वन्द्य: |
१०९२. अन्तःसारैरकुटिलैरच्छिद्रैः सुपरिक्षितैः |
मन्त्रिभिर्धार्यते राज्यं सुस्तम्भैरिव मन्दिरम् ||
अर्थ
वजनदार; सरळ; भरीव [वाळवी वगैरे न लागलेल्या] नीट पारखून [चांगल्या जातीचे टिकाऊ लाकूड असलेल्या] खांबांनी मंदिर जसं भक्कम रहात तसच पोक्त; सुस्वभावी; चुगल्या ऐकून न घेणाऱ्या परिक्षेला पूर्ण उतरलेल्या मंन्त्र्यांमुळे राज्याचे रक्षण होते.

Friday, August 30, 2013
१०९१. एकेन तिष्ठताधस्तादन्येनोपरि तिष्ठता |
दातृयाचकयोर्भेद: कराभ्यामेव सूचित: ||
अर्थ
एकाचा [दात्याचा] हात वर असतो आणि दुसऱ्याचा [घेणाऱ्याचा] हात खाली असतो. या [उच्च स्थान आणि खालच स्थान] या दोन हातांच्या स्थानामुळे [दाता कोण आणि याचक कोण हे] दाता आणि याचक यांच्यातला फरक कळतो.

१०९०. मन्दं हसन्तं प्रभया लसन्तं जनस्य चित्तं सततं हरन्तम् |
वेणुं नितान्तं मधु वादयन्तं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||
अर्थ
मृदु हास्य करणाऱ्या; तेजाने झळकणाऱ्या सतत लोकांचे चित्त आकर्षित करणाऱ्या; अत्यंत गोड आवाजात बासरी वाजवणाऱ्या बाळकृष्णाचे मी मनापासून स्मरण करते.

Wednesday, August 28, 2013
१०८९. यं ब्रह्मावरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः |
ध्यानावास्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ||
अर्थ
अतिशय उत्कृष्ट अशा कवनांनी ब्रह्मदेव; वरुण; इंद्र; मरूतगण ज्याची स्तुती करतात; सामगायन करणारे ऋषि वेदाच्या ऋचांचे यथाविधी पठण करतात; त्याच्यावर लक्ष्य एकाग्र करून त्याच्याच स्वरूपात परिणत होऊन योगी ज्याचं दर्शन घेतात; देव किंवा राक्षस या पैकी कोणालाच ज्याच पूर्ण आकलन झालं नाही अशा परमेश्वराला मी वंदन करते.

Friday, August 23, 2013
१०८८. कलहान्तानि हर्म्याणि कुवाक्यान्तं च सौहृदम् |
कुराजान्तानि राष्ट्राणि कुकर्मान्तं यशो नृणाम् ||
अर्थ
मोठ्या प्रासादांचा शेवट अंतर्गत भांडणांमुळे, [खूप श्रीमंती असली तरी भाऊबंदकी मुळे सर्वांचे पैसे वकिलाकडे जाऊन ते वैभव रहात नाही.] मैत्रीचा शेवट वाईट बोलण्याने होतो, राष्ट्राचा अन्त वाईट राजामुळे होतो व अपकृत्यामुळे माणसाची कीर्ती लयाला जाते.

१०८७. प्राप्ते भये परित्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम् |
केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम् ||
अर्थ
भीतीदायक [परिस्थिती आली] असता मित्र हा रक्षणकर्ता; प्रेमाचा आणि विसाव्याचे स्थान असतो. मित्र हि दोन अक्षरे असलेले हे रत्न कोणी बरे निर्माण केले. [त्या देवाला धन्यवाद.]

Subscribe to:
Posts (Atom)