तस्याश्चेत्प्रसरो दत्तो दास्यं च शिरसि स्थितम् ||
अर्थ
[माणसांनी] जर हाव सोडून दिली तर मग कोण गरीब आणि कोण श्रीमंत? [आहे
त्यात समाधान राखलं तर सगळेच सारखे होतील] पण तृष्णेला जर शिरकाव करू दिला
तर गुलामी ठरलेलीच. [आपल्याला हे हवं ते हवं म्हणजे कष्ट; लाचारी सगळ आलं]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, March 12, 2015
१३९१. तृष्णां चेह परित्यज्य को दरिद्रः क ईश्वरः |
Monday, March 9, 2015
१३९०. श्रुत्वा षडाननजनुरर्मुदितान्तरेण पञ्चाननेन सहसा चतुराननाय |
शार्दूलचर्म भुजगाभरणं सभस्म दत्तं निशम्य गिरिजाहसितं पुनातु ||
अर्थ
षडानन [सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाच्य] जन्माची [खबर मिळाल्याच्या] आनंदात पंचाननाने [पाच मुखे असणाऱ्या भगवान शंकराने] चटकन चतुराननाला [चार मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला; आपल्या जवळ असणारी संपत्ती [?] वाघाच चर्म; सापांची कडी आणि भस्म दिलं हे ऐकून पार्वतीला जे हसू फुटलं ते [आपल्या सर्वांच] रक्षण करो.

Sunday, March 8, 2015
१३८९. विषस्य विषयाणां हि दृश्यते महदन्तरम् |
उपभुक्तं विषं हन्ति विषयाः स्मरणादपि ||
अर्थ
विषय [हे विषाप्रमाणे असतात असं लोकांना वाटत पण खरं तर] आणि विष यात फार फरक आहे. विष खाल्लं तर [ते खाणाराला] मारून टाकत पण विषय मनात नुसते घोळवून [दुष्परिणाम होतो आणि] मरण ओढवत. [म्हणजे विषापेक्षा विषय वाईट की नाही?]

Monday, February 23, 2015
१३८८. चलन्ति गिरयः कामं युगान्तपवनाहताः |
कृच्छ्रेऽपि न चलत्येव धीराणां निश्चला मतिः ||
अर्थ
[जरी पर्वत वादळामुळे हलत नसले तरी] प्रलय काळातील झंझावातामुळे ते [सुद्धा] डळमळले तर खुशाल घसरू देत पण धैर्यवान; बुद्धिमान लोकांची स्थिर बुद्धी कुठल्याहि संकटात विचलित होत नाही.

Thursday, February 19, 2015
१३८७. प्राप्ता जरा यौवनमप्यतीतं बुधा यतध्वं परमार्थसिद्ध्यै |
आयुर्गतप्रायमिदं यतोऽसौ विश्राम्य विश्राम्य न याति कालः ||
अर्थ
अरे समजदार माणसांनो; तारुण्य तर गेलंच आहे; म्हातारपण येऊन ठेपलंय [आता तरी] अद्ध्यात्माच्या [तत्त्वज्ञानाच्या] प्राप्ती साठी झटा. आयुष्य संपल्यात जमा आहे कारण की काळ [यम] थांबून थांबून [तुमच मन अशान्त आहे म्हणून तुम्हाला वेळ देऊन] येत नाही. [आपली घटका भरली की तो नेतोच.]

Tuesday, February 17, 2015
१३८६. एकेश्वर्ये स्थितोऽपि प्रणतबहुफलो यः स्वयं कृत्तिवासाः कान्तासंमिश्रदेहोऽप्यविषयमनसां यः पूरस्ताद्यतीनाम् |
अष्टाभिर्यस्य
कृत्स्नं जगदपि तनुभिर्बिभ्रतो नाभिमानः सन्मार्गालोकनाय व्यपनयतु स
नस्तामसीं वृत्तिमीशः ||
अर्थ
भक्तांना भरपूर फळ देणारा असा हा महेश सर्व ऐश्वर्य त्याच्यामध्ये एकवटलं असून सुद्धा स्वतः [व्याघ्र] चर्म परिधान करतो. अर्धांगी शरीरातच अन्तर्भूत असूनही; विषयापासून निवृत्त अशा तापसी यतींमध्ये तो भगवान अग्रगण्य आहे. आपल्या अष्ट प्रकृतींनी सर्व जग धारण करत असूनही ज्याला अभिमान शिवत नाही अशा त्या भगवान शंकराने आम्ही सन्मार्गावर रहावं म्हणून आमच्या तामस वृत्तीचे हरण करावे,

Tuesday, February 3, 2015
१३८५. धर्मं प्रसङ्गादपि नाचरन्ति पापं प्रयत्नेन समाचरन्ति |
आश्चर्यमेतद्धि मनुष्यलोकेऽमृतं परित्यज्य विषं पिबन्ति ||
अर्थ
या जगात; [लोक] सत्कृत्य जराही करत नाहीत; पापं अगदी कळत असून मुद्दामहून करतात. हे मोठच नवल आहे की माणसं अमृता [प्रमाणे असणाऱ्या] धर्माच सेवन न करता, अमृत टाकून देऊन विष [पापाचरण करतात] पितात.

Subscribe to:
Posts (Atom)