नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।
आळशीपणा हा माणसाचा शरीरातला सर्वात मोठा शत्रु आहे व माणसाचा सर्वात मोठा मित्र परिश्रम हा आहे. याची कास धरल्यास (कोणाचाही) नाश होत नाही.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति।।
आळशीपणा हा माणसाचा शरीरातला सर्वात मोठा शत्रु आहे व माणसाचा सर्वात मोठा मित्र परिश्रम हा आहे. याची कास धरल्यास (कोणाचाही) नाश होत नाही.
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥
[नियमित] व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुख यांची प्राप्ति होते. निरोगी असणे हे परम भाग्य आहे आणि [चांगल्या] स्वास्थ्यामुळे सर्व कार्य सिद्धिस जातात.
धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात्क्रोधं परित्यज॥
क्रोध हा मनाच्या दुखा:चे प्राथमिक कारण आहे. संसार बन्धनाचे कारण असतो. क्रोध हा धर्माचा नाश करणार असतो. त्यामुळे [माणसाने] क्रोधाचा निरंतर त्याग करावा.
तत्कल्याणित्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ||
कस्यैकान्तं सुखम् उपनतं, दु:खम् एकान्ततो वा।
नीचैर् गच्छति उपरि च, दशा चक्रनेमिक्रमेण॥ [२/४९ मेघदूत कालिदास]
अर्थ
हे ( माझ्या) नशीबवान (प्रिये) तू याबद्दल खूप भिऊन जाऊ नकोस. मी स्वतः ला सावरीन. फक्त सुख एके सुख असे कोणाला मिळत? रहाट गाडग्याप्रमाणे ही स्थिती वर खाली फिरत रहाते.
वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ||
अर्थ
हस्त कमलाने चरणकमल मुखकमलामध्ये घालणाऱ्या, वडाच्या पर्णावर शयन करणाऱ्या, छोट्याशा भगवान श्रीकृष्णाचे मी मनापासून स्मरण / मनामध्ये स्मरण करतो/ते.
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
( आम्ही सर्वत्र ज्याचा) गंध (दरवळत असतो अशा, तब्येत) सुदृढ करणार्या तीन नेत्र असलेल्या भगवान शंकरासाठी यज्ञ करतो. ( त्याची भक्ती करतो.) त्यांनी उंबराच्या फळा प्रमाणे आम्हाला मृत्यू पासून सोडवावे मोक्षा पासून नको. ऋषी ना अपमृत्यु असेल तर त्यापासून सुटका हवी आहे. उंबराच फळाला देठाचा काही भाग रहात नाही. आणि अगदी सहज ते गळत. तस घडाव.