भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, July 28, 2025

१४२१. पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत्पतति भूतले ।

उत्थाय च पुनः पीत्वा, पुनर्जन्म न विद्यते ॥

अर्थ :- (हा चार्वाक दर्शनाच्या तत्वज्ञानाचा श्लोक आहे)
(भरपूर दारू) पिऊन पुन्हा, जो जमिनीवर लोळण घेईल आणि उठल्यावर पुन्हा प्यावी. (जमेल तेवढा उपभोग घ्यावा.) पुनर्जन्म वगैरे काही नसते.

Friday, July 25, 2025

१४२०. अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात्।

नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।

अर्थ

अच्युत, अनन्त, गोविन्द या नावांच्या उच्चारणरुपी औषधामुळे सर्व रोग दूर होतात. हे मी अगदी खरं खरं म्हणतो आहे.  

Thursday, June 26, 2025

१४१९. सर्पो नृत्यति चेन्मञ्चे चक्राटस्तत्र कारणम्।

तं निगृह्य खलं पूर्वं कुर्यात् सर्पावरोधनम्॥


अर्थ : जर व्यासपीठावर (दुष्ट माणूस खूप महत्त्वाची) सूत्रे हलवत असेल तर गारुडी हा (मुख्य सूत्रधार) कारण आहे. त्या दुष्टाला पहिल्यांदा ताब्यात घेऊन मग सापाला निर्बंध घालावेत. 

दुष्ट माणूस - सर्प


Monday, June 16, 2025

१४१८. जन्मदु:खं जरादु:खं नित्यदु:खं पुनः पुनः।

संसारसागरे दु:खं तस्माज्जागृहि जागृहि॥

संसार रूपी समुद्रात (प्रत्येकाला) जन्माच्या वेळी, म्हातारपणी (वेगवेगळ्या दुखण्यामुळे) दु:ख असे सारखे दु:खच भोगावे लागते.म्हणून, जागा हो. जागा हो.(आणि मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर)

 


Friday, April 4, 2025

१४१७. गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे ।

अपारकरुणापूरतरङ्गितदृशे नमः ॥

विघ्नरूपी अंध:काराचा नाश करणारा, व करुणारूपी अथांग जलराशींनी भरलेल्या डोळ्यांचा [असा] गणपती नावाच्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.

Thursday, April 3, 2025

१४१६. नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः।

नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥

ज्याप्रमाणे एक वीणा तारे शिवाय आणि रथ चाका शिवाय चालवता येत नाही, त्याच प्रमाणे एक स्त्री तिच्या पती शिवाय सुखी राहू शकत नाही, जरी तिला शंभर पुत्र असतील तरीही

Wednesday, April 2, 2025

१४१५. आनृशंस्यमनुक्रोशः श्रुतं शीलं दमः शमः |

राघवं शोभयन्त्येते षड्गुणाः पुरुषोत्तमम् ||

दयाळूपणा, करुणा, विद्वत्ता, सत्चरित्रता, आत्मसंयम, शांत स्वभाव, हे सहा गुण नेहमी भगवान रामाला सुशोभित करतात.