भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, November 5, 2014

१३६७. यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम् |

यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ

या किंवा त्या  कुठल्यातरी झाडाच मूळ [घेऊन] त्यात हे नाहीतर ते मिसळलं [आणि औषध म्हणून] कुणाला पण दिलं [तर काय होणार? आजारी] असा [बरा] किंवा तसा [अजून खराब] होईल. [नीट निदान; योग्य औषध; त्याची प्रकृती पाहून उपाय योजना केली तर फायद्याची होते. कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी.]

1 comment:

Unknown said...

प्रथम श्लोकाचा संपूर्ण शब्दश: अर्थ देऊन मगच त्या श्लोकातून निघणारा निष्कर्ष देणे उचित होईल.