तस्माद्द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||
अर्थ
कृती शिवाय ज्ञान श्रेष्ठ नाही [निरुपयोगी आहे] बुद्धी शिवाय कर्म
देखील चांगले नाही [डोकं चालवाल्याशिवाय कामाची हमाली देखील वाया जाते]
तेंव्हा दोन्ही [बुद्धी आणि कृती यामुळे] चांगले फळं मिळेल, कारण पक्षी एका
पंखाने उडू शकत नाही [नुसत ज्ञान असून उपयोग नाही त्याला कृतीची जोड हवी
विचारपूर्वक काम केलं तरच यश मिळत.]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Tuesday, August 13, 2013
१०७९. ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्मप्रधानं न तु बुद्धिहीनम् |
१०७८. पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता |
पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदास्तु वः ||
अर्थ
पिनाक [त्रिशूळ] फणी [सर्प] बालेन्दु [चंद्रकोर] भस्म आणि मंदाकिनी [गंगा] या "प " वर्गाने युक्त अशी [भगवान शंकराची] मूर्ति तुम्हाला अपवर्ग [मोक्ष] मिळवून देवो.
Monday, August 12, 2013
१०७७. बहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनैः सुजनैः सह |
स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ||
अर्थ
सुष्ट असोत किंवा दुष्ट [एकाचवेळी] खूप लोकांशी भांडण करू नये. साप [अगदी भयानक आणि] फुरफुरणारा असला तरी [एकटाच असेल तर पुष्कळशा] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.
अर्थ
सुष्ट असोत किंवा दुष्ट [एकाचवेळी] खूप लोकांशी भांडण करू नये. साप [अगदी भयानक आणि] फुरफुरणारा असला तरी [एकटाच असेल तर पुष्कळशा] मुंग्या त्याला खाऊन टाकतात.
Friday, August 9, 2013
१०७६. यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा |
यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजं तथाङ्कुरः ||
अर्थ
देश [भूप्रदेशा] प्रमाणे भाषा असते. [काही मैलानंतर बोलीभाषेत फरक पडतो] राजाच्या वर्तनावर प्रजेचं वागणं अवलंबून असत. पाणी तिथल्या जमिनीवर अवलंबून असत. ज्याचं बियाणे लावलं तसलीच फळे मिळतात.
अर्थ
देश [भूप्रदेशा] प्रमाणे भाषा असते. [काही मैलानंतर बोलीभाषेत फरक पडतो] राजाच्या वर्तनावर प्रजेचं वागणं अवलंबून असत. पाणी तिथल्या जमिनीवर अवलंबून असत. ज्याचं बियाणे लावलं तसलीच फळे मिळतात.
Thursday, August 8, 2013
१०७५. आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते |
नीयते स वृथा येन प्रमादः सुमहानहो ||
अर्थ
जीवनातला एखादा क्षण सुद्धा [कितीही किंमत दिली] अगदी सगळी रत्न दिली, तरीही [परत] मिळत नाही. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.
अर्थ
जीवनातला एखादा क्षण सुद्धा [कितीही किंमत दिली] अगदी सगळी रत्न दिली, तरीही [परत] मिळत नाही. त्यामुळे जर वेळ वाया घालवला तर तो अतिशय मोठा गुन्हा आहे.
१०७४. सह्याद्रिर्गगनप्रविष्टशिखरैर्नागाश्रितैर्गव्हरैर्नृत्यद्भिश्च नदद्भिरुच्चशिखरात्पातालगैर्निर्झरैः |
तालैर्वायुविकम्पिपत्ररुचिरैर्वन्यैः सुपुष्पद्रुमैर्भव्यस्तिष्ठति शोभनः पदनतो यस्यापरस्तोयधिः || माधव अणे
अर्थ
गगनचुंबी शिखरांमुळे; सर्पांनी आश्रय घेतलेल्या गुहांमुळे; उंच शिखरांवरून खाली खोलखोल जाणाऱ्या निर्झरानी बनलेल्या मोठ्या नद्यांच्या नर्तनामुळे; वाऱ्यामुळे हलणाऱ्या सुंदर पानांच्या ताडवृक्षामुळे; शोभून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या पायाशी अतुलनीय असा समुद्र लोळण घेत आहे.

Tuesday, August 6, 2013
१०७३. हृदयानि सतामेव कठिनानीति मे मतिः |
खलवाग्विशिखैस्तीक्ष्णैर्भिद्यन्ते न मनागपि ||
अर्थ
ज्या अर्थी दुष्ट लोकांच्या धारदार वाग्बाणांनी [अतिशय वाईट अशा
आरोपांनी] देखील सज्जनांच्या अन्तःकरणाला जरा सुद्धा जखम होत नाही,
त्यावरून त्यांची मने अत्यंत कठोर असतात असे मला वाटते.
Subscribe to:
Posts (Atom)