विनाभ्यासेन तन्नेह सिद्धिमेति कदाचन ||
अर्थ
[माणूस] कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेणार असेल तर मनापासून अभ्यास
केल्याशिवाय त्याची पूर्तता कधीही होत नाही, मग साधन कुठलीही वापरू देत
[मनापासून पूर्ण प्रयत्नानेच कुठलही काम तडीस जात.]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, October 14, 2013
१११२. यद्येन क्रियते किञ्चिद्येन येन यदा यदा |
Monday, September 30, 2013
११११. ज्ञानेन पुंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |
ज्ञानस्य मत्वेति गुणान् कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः
अर्थ
ज्ञान असल्यामुळे सर्व इच्छित गोष्टी पूर्ण होतात; ज्ञान असल्याशिवाय काहीच [संपत्तीसुद्धा] मिळत नाही. या ज्ञानाच्या गुणांवर विचार करून थोर लोक कधीही ज्ञान संपादन करणे सोडून देत नाहीत.

Friday, September 27, 2013
१११०. अणुपूर्वं बृह्त्पश्चाद्भवत्यार्येषु सङ्गतम् |
विपरीतमनार्येषु यथेच्छसि तथा कुरु ||
अर्थ
सज्जन लोकांशी मैत्री करताना सुरवातीला थोडा वेळ सहवास झाला तरी हळूहळू ति [मैत्री] वाढत जाते. [स्नेह उत्तरोत्तर वृद्धिंगत होतो.] याच्या उलट दुर्जानांच्या मैत्रीच आहे. [याचा विचार करून] तुला जसं [योग्य] वाटेल तसं [मैत्री] कर.

Thursday, September 26, 2013
११०९. कदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम् |
अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेर्नाधः शिखा यान्ति कदाचिदेव || नीतिशतक राजा
भर्तृहरी
अर्थ
धैर्यशील माणसाचा अपमान करून कधीही त्याचं धैर्य खच्ची करता येत नाही. [मशालीचा] दांडा वर करून ठेवला तरी ज्वाळा नेहमी वरच उसळून येतात.

Wednesday, September 25, 2013
११०८. यो यमर्थं प्रार्थयते यदर्थं घटतेऽपि च |
अवश्यं तदवाप्नोति न चेच्छ्रान्तो निवर्तते ||
अर्थ
जर एखाद्या व्यक्तीला कुठलं ध्येय गाठण्याची इच्छा असेल; तो त्या मार्गाने प्रयत्न करत असेल; तर मधेच थकून [किंवा कंटाळून] जर तो माघारा फिरला नाही तर तो ते ध्येय नक्कीच गाठतो. [इच्छित गोष्ट मिळेपर्यंत अथक प्रयत्न केले तर कितीही अवघड असलं तरी ती मिळवता येतेच.]

Tuesday, September 24, 2013
११०७. धृतिः क्षमा दया शौचं कारुण्यं वागनिष्ठुरा |
मित्राणां चानभिद्रोहः सप्तैताः समिधः श्रियः ||
अर्थ
तितिक्षा [सहनशीलता ] दया; पावित्र्य [खोटेपणा न करण्याचं पावित्र्य]; दुसऱ्यांचा विचार करणं; गोड बोलणं; मित्रांचा विश्वासघात न करणं; श्रीमंती प्राप्त करण्याच्या यज्ञातल्या या सात समिधा आहेत.

Monday, September 23, 2013
११०६. तन्मूलं गुरुतायास्तत्सौख्यं तद्यशस्तदौर्जित्यम् |
तत्सौभाग्यं पुंसां यदेतदप्रार्थनं नाम ||
अर्थ
याचना न करणे [आणि ती करायला न लागणे] म्हणजे [ खरं तर] त्यातच मोठेपणा आहे; सुख सामावलेलं आहे; त्यातच सत्कीर्ती आहे; तीच ताकद आहे; ते सुदैव होय.
English Meaning
Asking nothing to anybody is a greatness, is a happiness, is a popularity, is a strength, is a fortune.

Subscribe to:
Posts (Atom)