अन्तर्भिन्नेन संप्राप्तं मौक्तिकेन निबन्धनम् ||
अर्थ
मोती अतिशय सुंदर; गोल अगदी स्वच्छ [कठीणपणा नाही; खुपणारा नाही असा] जमवून घेणारा. त्यांनी जर स्वतःत फट पडून घेतली तर त्याला [दागिन्यात
अडकून पडाव लागत] [मौक्तीकान्योक्ती सर्व चांगले गुण आणि त्यात स्वतः कणखर न
राहता भोक पडू दिलं, तर त्याचा फायदा घेतला जातो.]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, June 9, 2014
१२९१. अत्यच्छेनाविरुद्धेन सुवृत्तेनातिचारुणा |
Friday, June 6, 2014
१२९०. तवैतद्वाचि माधुर्यं जाने कोकिल कृत्रिमम् |
प्रपोषितो यैस्तानेव जातपक्षो जहासि यत् ||
अर्थ
अरे कोकिळा; तुझ्या बोलण्यातला हा गोडवा नकली आहे हे [मला] ठाऊक आहे, कारण पंख फुटल्यावर लगेच ज्यानी तुझं पालनपोषण केलं त्यांना सोडून देतोस. [जर हा गोडवा खरा असता तर ज्यानी संभाळलं त्यांचा असा त्याग तू केलाच नसतास. मनापासून चांगुलपणाचा अभावच आहे. बोलण नुसत गोडगोड] कोकिलान्योक्ती

Thursday, June 5, 2014
१२८९. अयि मलयज महिमायं कस्य गिरामस्तु विषयस्ते |
उद्गिरतो यद्गरलं फणिनः पुष्णासि परिमलोद्गारैः ||
अर्थ
अरे चंदनवृक्षा; तुझा मोठेपणा कोणाला बरं [योग्य इतका] वर्णन करता येईल. तू तर गरळ ओकणाऱ्या सापांच सुद्धा सुगंध देऊन पोषणच करतोस. [चंदनान्योक्ती]

Wednesday, June 4, 2014
१२८८. उच्चैरेष तरुः फलं च विपुलं दृष्ट्वैव हृष्टःशुकः पक्वं शालिवनं विहाय जडधीस्तं नारिकेलं गतः |
तत्रारुह्यबुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा
तस्य न केवलं विगलिता चञ्चूर्गता चूर्णताम् ||
अर्थ
"हे झाड खूप उंच आहे आणि फळे पण भरपूर आहेत" असा विचार करून आनंदित झालेला मंद पोपट तयार आशा साळीच शेत सोडून "त्या " नारळाच्या झाडाकडे गेला. भुकेजलेल्या त्यानी त्या झाडावर फळ फोडायचा प्रयत्न केला [पण अरेरे] त्याची आशाच फक्त लयाला गेली असं नाही तर चोचीच सुद्धा पीठ पीठ झालं. [शुकान्योक्ती]

Monday, June 2, 2014
१२८७. यः परस्य विषमं विचिन्तयेत्प्राप्नुयात्स कुमतिः स्वयं हि तत् |
पूतना हरिवधार्थमाययौ प्राप सैव वधमात्मनस्ततः ||
अर्थ
जो दुष्ट माणूस दुसऱ्याच वाईट करण्याच ठरवतो त्याच स्वतःचच तसेच वाईट घडत. पूतना श्रीकृष्णाला ठार मारायला गेली पण तिलाच मृत्यू आला.

१२८६. माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी |
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ||
अर्थ
आई घरात नसेल आणि पत्नी कडवटपणे बोलणारी [पतीला समजून घेऊन गोड शब्दात आपलं मत सांगणारी अशी नसेल] तर अशा माणसाने जंगलात निघून जावे, कारण घर आणि वन यात काही फरकच नाही ना!

१२८५. तावत्गर्जन्ति मण्डुकाः कूपमाश्रित्य निर्भयाः |
यावत्करिकराकारः कृष्णसर्पो न विद्यते ||
अर्थ
विहिरीच्या आश्रयाने बेडूक न घाबरता तोपर्यंत डराव डराव करत ओरडत राह्तात की जोपर्यंत हत्तीच्या सोंडेप्रमाणे [बळकट] असा काळा कुळकुळीत साप तिथे नसतो. [सर्पान्योक्ती ]

Subscribe to:
Posts (Atom)