सकलरसायनसारो दोषेणैकेन लशुन इव || पण्डित राज जगन्नाथ
अर्थ
सर्व औषधीमधे महत्वाची असलेली लसूण तिच्या [उग्र वास] या एकाच दोषाने
निंद्य ठरते, तसे असंख्य गुण असून सुद्धा एखाद्या दोषाने एखाद्या पदार्थाला
[एखाद्या व्यक्तीला] नावे ठेवली जातात.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, September 11, 2014
१३४५. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति |
Tuesday, September 9, 2014
१३४४. आयातो भवतः पितेति मातुर्निशम्योदितं धूलीधूसरितो विहाय शिशुभिः क्रीडारसान्प्रस्तुतान् |
दूरात्स्मेरमुखः प्रसार्य ललितं बाहुद्वयं बालको
नाधन्यस्य पुरः समेति परया प्रीत्या रटन्घर्घरम् ||
अर्थ
"तुझे बाबा आले रे" असं आईनी म्हटलेलं ऐकल्यावर; चालू असलेली मित्रांबरोबरची भरपूर गम्मत टाकून हसत हसत सुंदर हात पसरून घशातून आनंदाचे उद्गार काढत धुळीने माखलेलं आपलं मूल आनंदाने ज्याच्या सामोर येत; असा [पिता] खरोखर धन्य होय.

Monday, September 8, 2014
१३४३. कुत्र विधेयो यत्नो विद्याभ्यासे सदौषधे दाने |
अवधीरणा क्व कार्या खलपरयोषित्परधनेषु ||
अर्थ
कशाच्या बाबतीत [अविरत;अथक] प्रयत्न करावा? शिक्षण; चांगलं औषध आणि दान. केंव्हा दुर्लक्ष करावं? दुष्ट लोक; दुसऱ्याची पत्नी आणि परधन.

Friday, September 5, 2014
१३४२. सम्प्रति न कल्पतरवो न सिद्धयो नापि देवता वरदाः|
जलद त्वयि विश्राम्यति सृष्टिरियं भुवनलोकस्य ||
अर्थ
आजकाल कल्पतरू [त्याच्या खाली बसून इच्छित वस्तू देणारे वृक्ष कुठेही] नसतात; [अष्ट] सिद्धि पण नसतात देव सुद्धा वर देत नाहीत. [बाबारे] जलदा [पाणी देणाऱ्या मेघा] तू जर विश्रांती घेतलीस [धारा बरसायचं सोडून दिलंस] तर हे सगळं जग गळाठून जाईल [त्याला सक्तीची विश्रांती मिळेल.]

Thursday, September 4, 2014
१३४१. अयं रत्नाकरोऽम्भोधिरित्यसेवि धनाशया |
धनं दूरेऽस्तु वदनमपूरि क्षारवारिभिः ||
अर्थ
हा सागर रत्नांची खाण आहे म्हणून पैशाच्या आशेने मी ह्याचं सेवन [सेवा; पाण्याचं सेवन] केलं. पण [अरेरे] संपत्ती दूरच [मिळण्याची जराही शक्यता नाही] तोंड मात्र खारट पाण्यानी खराब झालं. [समुद्रान्योक्ती समुद्र = कंजूष श्रीमंत मनुष्य; कवि =गरजू माणूस.]

Tuesday, September 2, 2014
१३४०. किं पौरुषं रक्षति यो न वार्तान्किं वा धनं नार्थििजनाय यत्स्यात् |
सा किं क्रिया या न हितानुबद्धा किं जीवितं साधुविरोधि यद्वै ||
अर्थ
दीनदुबळ्यांच जो रक्षण करत नसेल त्याच्या पराक्रमांचा काय बरं उपयोग? गरजूंना ज्या संपत्तीचा उपयोग होत नाही तिच्या पासून काय फायदा? जे काम कल्याणासाठी नाही त्याचा काय उपयोग? सज्जनांना त्रास देणाऱ्या आयुष्याचा काय बरं उपयोग?

Monday, September 1, 2014
१३३९. लोभमूलानि पापानि व्याधयो दोषमूलकाः |
स्नेहमूलानि दुःखानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||
अर्थ
हाव [या दुर्गुणामुळे माणूस] पापे करतो; [आपल्याच] चुकांमुळे आजार होतात; आसक्तीने कुठेतरी जीव जडल्यामुळे, दुःख होतात. या तीन गोष्टींचा त्याग करून सुखी हो.

Subscribe to:
Posts (Atom)