ज्ञानस्य मत्वेति गुणान्कदाचिज्ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावाः ||
अर्थ
ज्ञानाने माणसांना सर्व पुरुषार्थ साधता येतात. ज्ञानाशिवाय काहीच साध्य
होत नाही. असे ज्ञानाचे गुण जाणून थोर लोक ज्ञान [मिळवण्याचा प्रयत्न]
कधीही सोडत नाहीत.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, October 31, 2014
१३६३. ज्ञानेन पूंसां सकलार्थसिद्धिर्ज्ञानादृते काचन नार्थसिद्धिः |
Wednesday, October 29, 2014
१३६२. संग्रामे सुभटेन्द्राणां कवीनां कविमण्डले |
दीप्तिर्वा दीप्तिहानिर्वा मुहूर्तादेव जायते ||
अर्थ
कसलेले योद्धे रणांगणात युद्ध करत असताना किंवा पंडितांच्या सभेत [पराक्रमाचा किंवा प्रतिभेचा] लखलखाट पसरणं नाहीतर एकदम काळोखी येते ती अगदी क्षणात!

Monday, October 27, 2014
१३६१. बहुभिर्बत किं जातैः पुत्रैर्धर्मार्थवर्जितैः |
वरमेकः पथि तरुर्यत्र विश्रमते जनः ||
अर्थ
धर्म; अर्थ [असे पुरुषार्थ] संपादन न करणारी पुष्कळ अपत्ये असून काय हो उपयोग ? एक झाड [लावून अपत्याप्रमाणे वाढवलेलं] बरं! की जिथे माणूस विश्रांती घेतो. [वृक्षसंवर्धन अपत्या इतकं चांगलं आहे.]

१३६०. दुर्मन्त्रिणं कमुपयान्ति न नीतिदोषाः सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगाः |
कं
श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः कं स्वीकृता न विषया ननु तापयन्ति
||
अर्थ
चुकीचा / वाईट सल्ला देणाऱ्या कुणाला नीतिमत्तेचे दोष चिकटत नाहीत? [बदसल्ला दिल्यावर नाचक्की होतेच] कुपथ्य केल्यावर कोणाचा आजार बळावत नाही? संपत्ती कुणाला माज आणत नाही? मरण कुणाला चुकलय? भौतिक सुखांच्या मागे लागून कोणाला त्रास होत नाही? [या कुपथ्य वगैरे गोष्टी टाळणं चांगलं.श्रीमंतानी गर्विष्ठपणा करू नये. मृत्यु अटळ आहे तरी वाईट कामे करू नये.]

Friday, October 17, 2014
१३५९. न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः |
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः || भागवत
अर्थ
दुष्ट लोकांच्या मर्मावर बोट ठेवणाऱ्या वाग्बाणांनी माणसाची जशी तडफड होते, तितकी बाणांनी अगदी मर्मावर जखम झाली तरी [वाग्बाणांएवढी] तडफड होत नाही.

Tuesday, October 14, 2014
१३५८. अयि बत गुरुगर्वं मा स्म कस्तूरि यासीरखिलपरिमलानांमौलिना सौरभेण |
गिरिगहनगुहायां लीनमत्यन्तदीनं स्वजनकममुनैव प्राणहीनं करोषि ||
अर्थ
हे कस्तूरी; सर्व सुवासांमध्ये [माझा सुगंध]सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून अगदी ताठ्यात राहू नकोस. [सुगंध जरी श्रेष्ठ असला तरी अगदी अंधाऱ्या गुहेत दडून बसणाऱ्या; गरीब बिचाऱ्या स्वतःच्या बापाचे प्राण त्या [सुवासा] पायीच गमावलेले आहेस.

Monday, October 13, 2014
१३५७. दुरधीता विषं विद्या अजीर्णे भोजनं विषम् |
विषं गोष्ठी दरिद्रस्य विषं व्याधिरवीक्षितः ||
अर्थ
शिक्षण वाईट रीतीने [लक्ष न देता; गर्वाने अभ्यास न करता; वाईट हेतू मनात ठेऊन] घेतल्यास विषाप्रमाणे असते. आधीच अजीर्ण झालं असताना जेवण हे विष होय. घोळक्यात [नुसतं गप्पा] मारत बसणं गरीब माणसाला विषाप्रमाणे आहे. औषध न करता ठेवलेला आजार अगदी धोकादायक आहे.

Subscribe to:
Posts (Atom)