क्षीयते वर्धते चन्द्र: कदाचिनैव तारका: ||
अर्थ
संकटे काय किंवा वैभव काय थोरामोठ्यांच्या वाट्याला येते. कलेकलेने वाढतो तो चंद्रच, तारका तर कधीच [आकार बदलत ] नाहीत.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 9, 2013
Wednesday, May 8, 2013
१००६. नोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते |
स स्नातो यो दमस्नात: सबाह्याभ्यन्तरं शुचि: ||
अर्थ
अंग पाण्याने भिजवले म्हणजे स्नान झाले असे म्हणत नाहीत. तर जो इंद्रिय निग्रह या व्रताने नखशिखान्त शुद्ध झाला, त्यानेच खरे स्नान केले असे म्हणतात. [तो अंतर्बाह्य पवित्र असतो.]

Tuesday, May 7, 2013
१००५. अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरु: |
बादरायणसम्बधाद्यूयं यूयं वयं वयम् ||
अर्थ
आमच्या बैलगाडीच चाक, बोरीच्या लाकडापासून बनवलेले आहे आणि तुमच्या [अंगणात साक्षात] बोरीच झाडच आहे. [एवढाचं] तुमचा आणि आमचा बोरीमुळे आलेला संबंध [तेवढा सोडला तर] तुम्ही; तुम्ही आहात आणि आम्ही; आम्ही. [यावरून मराठीत बादरायण संबध = अतिशय लांबचा संबध असा शब्द आला आहे.] [जेंव्हा स्वतःच्या फायद्यासाठी जवळीक दाखवायची इच्छा असते तेंव्हा, अशी दुरुनची नाती[?] असली तरी चालतात.]

१००४. वाग्वादश्चार्थसम्बध: परोक्षे दारभाषणम् |
यदीच्छेद्विपुलां मैत्रीं त्रीणि तत्र न कारयेत् ||
अर्थ
जर एखाद्याची कायमची आणि उदंड मैत्री हवी असेल तर त्याच्या बाबतीत तीन गोष्टी टाळाव्या. शाब्दिक वादविवाद; पैशाची देवाणघेवाण, व त्याच्या अनुपस्थितीत एकांतात त्याच्या पत्नीशी संभाषण.

१००३. आपातालगभीरे मज्जति नीरे निदाघसन्तप्तः |
न स्पृशति पल्वलाम्भः पञ्जरशेषोऽपि कुञ्जरः क्वापि ||
अर्थ
[मुक्त] हत्ती उन्हाळ्यात उन्हाने त्रासला की पाताळाएवढ्या खोल पाण्यातही [स्वैरपणे] डुंबत राहू शकतो पण तोच पिंजऱ्यात अडकला की डबक्यातल्या पाण्याला स्पर्शसुद्धा करत नाही.

१००२. गुणेन स्पृहणीय: स्यान्न रूपेण युतो नर: |
सौगन्ध्यहीनं नादेयं पुष्पं कान्तमपि क्वचित् ||
अर्थ
[फक्त] देखणा आहे म्हणून [कौतुक मिळवणं ह्यापेक्षाही] माणसानी आपल्या गुणांमुळे हवाहवास वाटायला पाहिजे. फूल दिसायला सुंदर असलं तरी सुवासिक नसलं तर ते सहसा दिलं जात नाही. [रूपापेक्षा गुण अधिक महत्वाचे आहेत.]

१००१. वरं बुद्धिर्न सा विद्या विद्याया बुद्धिरुत्तमा |
बुद्धिहीना विनश्यन्ति यथा ते सिंहकारका: ||
अर्थ
नुसती सहजबुद्धि [कॉमन सेन्स] असलेली परवडली; [कुठली तरी विशिष्ट] विद्या नसली तरी चालेल, कारण [एखाद्या विषयातल नुसत] ज्ञान असण्यापेक्षा अक्कल श्रेष्ठ ठरते. सहज बुद्धि नसणारे लोक मात्र त्या सिंह निर्माण करणाऱ्या [दीड शहाण्यासारखे] नाश पावतात.

Subscribe to:
Posts (Atom)