भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, December 7, 2012

८६६. अतिदाक्षिण्ययुक्तानां शङ्कितानां पदे पदे |

परापवादभीरूणां दूरतो यान्ति सम्पद: ||

अर्थ

या लोकांपासून समृद्धी [विपुल संपत्ती] दूर पळते - जे [नेहमी उदारपणे दुसऱ्यांना संधी देण्याचे] दाक्षिण्य दाखवतात. पावलोपावली घाबरतात. दुसऱ्यांनी नाव ठेवण्याला खूप घाबरतात.

Thursday, December 6, 2012

८६५. नोदन्वानर्थितामेति सदाम्भोभि: प्रपूर्यते |

आत्मा तु पात्रतां नेय: पात्रमायान्ति सम्पद: ||


अर्थ

समुद्र कधीही याचना करीत नाही [असं असूनही सदैव नद्या त्याच्याकडे] भरपूर पाणी [आणून त्याला] तुडुंब भरतात [यावरून असं दिसत की] आपण पात्रता [लायकी] मिळवली पाहिजे. ज्याला पात्रता आहे त्याच्याकडे विपुल समृद्धी स्वतःच चालत येते.

Wednesday, December 5, 2012

८६४. पुष्पाणीव विचिन्वन्तमन्यत्रगतमानसम् |

अनवाप्तेषु कामेषु मृत्युरभ्येति मानवम् ||

अर्थ

फुले वेचायला [गेलं असूनही त्याच्या ऐवजी]  दुसरीकडे लक्ष गेल्यावर त्या माणसाची [फुलं तर गोळा होत नाहीतच पण वेळ संपतो ] तसंच [भलतीकडेच रमत बसल्यावर] आपले ध्येय न गाठताच माणसाला मृत्यू गाठतो.

Tuesday, December 4, 2012

८६३. न च नि:स्पन्दता लोके दृष्टेह शवतां विना |

स्पन्दाच्च फलसम्प्राप्तिःस्तस्माद्दैवं निरर्थकम् || योगवासिष्ठ

अर्थ

या जगामध्ये हालचाल पूर्णपणे बंद ही गोष्ट प्रेताशिवाय कोठेही दिसत नाही. आणि हालचालीने त्याच फळं तर मिळणारच. त्यामुळे नशीब वगैरे अर्थशून्य  आहे [आपल्याला हवं ते प्राप्त होईपर्यंत अथक प्रयत्न केले पाहिजेत.]

Monday, December 3, 2012

८६२. दण्ड: शास्ति प्रजा: सर्वा दण्ड एवाभिरक्षति |

दण्ड: सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधा: || महाभारत

अर्थ

दण्ड [शिक्षा करणे; याच्या भीतीनेच] सर्व जनतेवर प्रशासन [व्यवस्थित] होत. दंडानेच [शिक्षेच्या भीतीमुळेच दुबळ्यांच] रक्षण [करता] येत. जे अज्ञानी असतात त्यांच्या बाबतीत दण्डच काम करत असतो [म्हणून] ज्ञानी लोक  दण्ड  [कायदा] हा धर्मच आहे असे समजतात.

८६१. गीर्भिर्गुरूणां परुषाक्षराभिस्तिरस्कृता यान्ति नरा महत्वम् |

अलब्धशाणोत्कषणा नृपाणां न जातु मौलौ मणयो वसन्ति ||

अर्थ

गुरूंच्या कठोर वाक्ताडनानी झोडपले गेल्यानंतरच माणसे थोरपणा प्रत पोहोचतात. निकषाच्या[धारदार]   दगडावर पैलू पाडून झाल्याशिवाय [सर्वं बाजूंनी धारेनी तासल्यावरच सुंदर तेज येत] कधी रत्ने राजांच्या डोक्यातील [मुगुटाला] शोभा आणत नाहीत.

Saturday, December 1, 2012

८६०. मूढैः प्रकल्पितं दैवं तत्परास्ते क्षयं गता: |

प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तममास्थिताः || योगवासिष्ठ

अर्थ

मूर्ख लोकांनी [स्वतःचं] दैवाची कल्पना काढली आहे आणि तीच [योग्य असे धरून] श्रेष्ठ समजून त्यांनी स्वतःचा अधःपात करून घेतला आहे. [आणि घेत राहतात] पण जाणते मात्र पराक्रम [आणि प्रयत्न] यांनी श्रेष्ठ स्थानी विराजमान होतात.