प्रायः श्वश्रूस्नुषयोर्न दृश्यते सौह्रुदं लोके ||
अर्थ
जीथे कारस्थानी लक्ष्मी येऊन राहते, तिथे सरस्वती [विद्वत्ता] कधी
राहायला येत नाही. या जगात सासवा सुनांची सहसा मैत्री नसतेच. [पटतच नाही]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, April 30, 2014
१२६०. कुटिला लक्ष्मीर्यत्र प्रभवति न सरस्वती वसति तत्र |
Tuesday, April 29, 2014
१२५९. दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता |
अभ्यासेन न लभ्येयुश्चत्वारः सहजाः गुणाः ||
अर्थ
औदार्य; गोड बोलणं; धैर्य आणि बरोबर किंवा चूक समजणे हे चारी गुण [काही व्यक्तींना] जन्मजात असतात. ते प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत .

Monday, April 28, 2014
१२५८. अगाधजलसंचारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फुर्फुरायते ||
अर्थ
अथांग पाण्यामध्ये पोहणारा रोहित मासा कधी माज करत नाही. पण अंगठ्या एवढ्या पाण्यात तरंगणारी मासोळी मात्र भारीच माज करते.

१२५७. अग्निदाहे न मे दुःखं छेदे न निकषे न वा |
यत्तदेव महादुःखं गुञ्जया सह तोलनम् ||
अर्थ
मला अग्निमधे टाकून चटके देतात त्याच किंवा कापल्याच किंवा कस लावायच्या दगडावर घासून घेण्याच दुःख होत नाही. [अधिक शुद्धतेसाठी किंवा परीक्षा घेण्याच मला दुःख नाही. मी अधिक कष्ट घेऊन अधिक मौल्यवान होईन.] पण गुंजे सारख्या [क्षुद्र वस्तू] बरोबर तुलना करतात हेच माझं तीव्र दुःख आहे. [सुवर्णान्योक्ती]

१२५६. सकृदपि दृष्ट्वा पुरुषं विबुधा जानन्ति सारतां तस्य |
हस्ततुलयापि निपुणा: पलप्रमाणं विजानन्ति ||
अर्थ
एका दृष्टीक्षेपातच जाणकार एखाद्या माणसाच कर्तृत्व किती आहे ते ओळखतात. हुशार लोक हातानी जोखूनच गुंजेच वजन सांगू शकतात.

Friday, April 25, 2014
१२५५. स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम् |
परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जीवति ||
अर्थ
ज्याने आपल्या [सामर्थ्याने] घराण्याच नाव उज्वल केलं; तोच खरा जन्माला आला [त्याच्या जगण्याचं सार्थक झालं नाहीतर] या जगाच्या रहाटगाडग्यात मेलेला कोण बरे पुन्हा जन्माला येत नाही? सगळे जन्म घेऊन आपल आयुष्य रेटत राहतात, पण याचा जन्म सार्थक होतो.]

Thursday, April 24, 2014
१२५४. उद्धाटितनवद्वारे पञ्जरे विहगोऽनिलः |
यत्तिष्ठति तदाश्चर्यं प्रयाणे विस्मयः कुतः ||
अर्थ
प्राण पक्षी हा [शरीराची] नउ दार सताड उघडी असूनही उडून जात नाही [आयुष्य आहे तेवढा जगतो] हेच खरं आश्चर्य आहे. तो निघून गेला [माणूस मेला ] तर त्यात काय नवल ?

Subscribe to:
Posts (Atom)