यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकाम् ||
अर्थ
उसळलेल्या वाऱ्यामुळे मोठी गर्जना करणाऱ्या सागरा तुझा धिक्कार असो
[कारण] तुझ्या किनाऱ्यावर तहानलेला वाटसरू विहीर कुठे असेल त्याची विचारणा
करतो. [सागरान्योक्ती सागर = कंजूष श्रीमंत; वाटसरू = गरीब याचक]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 29, 2014
१२८४. वातोल्लासितकल्लोल धिक्ते सागर गर्जितम् |
Wednesday, May 28, 2014
१२८३. शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना |
तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः ||
अर्थ
स्वभावानी शांत [राहून] अशा भगवान शंकरांनी अगदी डोक्यावरच [अगदी कौतुकानी] सांभाळलाय तरीही चन्द्र [मधून का होईना] रोडावतो. बरोबरच आहे दुसऱ्याच्या आधारावर जगणं कठीणच असत.

Tuesday, May 27, 2014
१२८२. मन्त्रिणां भिन्नसंधाने भिषजां सान्निपातिके |
कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे को वा न पण्डितः ||
अर्थ
[आपल्या राज्यातील उच्चपदस्थामध्ये] एकी नसेल अशावेळी मंत्र्याची किंवा सन्निपात आजाराच्या [टॉयफाइड] आजा~यावर उपचार करताना वैद्याची हुशारी स्पष्ट होते. सगळ सरळ चाललं असेल तर सगळेच तल्लख असतात.

Monday, May 26, 2014
१२८१. ऊर्णां नैष दधाति नापि विषयो वाहस्य दोहस्य वा तृप्तिर्नास्य महोदरस्य बहुशो घासैः पलालैरपि |
हा कष्टं कथमस्य पृष्ठशिखरे गोणी समारोप्यते को
गृह्णाति कपर्दकैरमुमिति ग्राम्यैर्गजो हस्यते ||
अर्थ
"याच्या अंगावर [मेंढीसारखी] लोकर पण उगवत नाही. बरं दूध देणारा किंवा वाहून नेणारा पण हा प्राणी नाही. याचा एवढा मोठा पोटोबा टरफल किंवा केवढा तरी चारा घालून सुद्धा भरायचा नाही. बाप रे उंच अशा पाठीवर पोती तरी कशी चढवायची हो [मग अशा {निरुपयोगी} प्राण्याला] केवढ्यातरी रुपड्या खर्चून कोण बरं विकत घेईल? असं म्हणून गावंढळ लोक हत्तीला हसतात. [गजांतलक्ष्मी वगैरे राजे लोकांनाच कळणार ना?]

१२८०. अम्भांसि जलजन्तूनां दुर्गं दुर्गनिवासिनाम् |
स्वभूमिः श्वापदादीनां राज्ञां मन्त्री परं बलम् ||
अर्थ
पाणी ही जलचरांची ताकद असत. किल्ल्यावरील लोकांच गड हे [महत्वाच] बळ असत, आपली हद्द ही जनावरांची [पशू; साप वगैरे] ताकद असते. तर मन्त्री हा राजाचा मुख्य आधार असतो.

Saturday, May 24, 2014
१२७९. मद्यपाः किं न जल्पन्ति किं न भक्षन्ति वायसाः |
कवयः किं न पश्यन्ति किं न कुर्वन्ति दुर्जनाः ||
अर्थ
दारुडे काय बडबडत नाहीत? [वाट्टेल ते - खरं खोटं बोलतात.] कावळे काहीही खातात. कवी काय पहात नाहीत बरे? [जे न देखे रवि ते देखे कवि] दुष्ट लोक वाट्टेल ती कुकर्मे करतात.

१२७८. सर्वेन्द्रियाणि संयम्य बकवत्पतितो जनः |
कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् ||
अर्थ
आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून माणसाने त्या त्या वेळी आणि त्या त्या ठिकाणी जसं वागणं योग्य आहे तसा व्यवहार ठेऊन आपली काम साधून घ्यावी. [मासे पकडण्यासाठी बगळा जसा तासनतास एका पायावर चित्रासारखा उभा राहतो, सगळं व्यवधान तिकडे लावतो तसं.]

Subscribe to:
Posts (Atom)