ह्री: कामिनमलसं श्रीः क्रूरं स्त्री दुर्जनं लोकः ||
अर्थ
ज्यानी पाप [वाईट काम] केलेलच नाही, त्याला भीती वाटत नाही. ज्यानी
सन्मित्र सांभाळलेले आहेत, त्याचा बदलौकिक होत नाही. चुका करणाराला
[अभ्यासात सातत्य न ठेवणाऱ्याला] विद्या सोडून जाते; विषयी माणसाला
लाजलज्जा सोडून जाते; लक्ष्मी आळशाला सोडून पळते; क्रूर माणसाजवळ स्त्री
टिकत नाही; दुष्ट मनुष्य या जगात [कोणालाच] नको असतो.
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, June 18, 2014
१२९८. त्यजति भयमकृतपापं सुमित्रमयशः प्रमादिनं विद्या |
Tuesday, June 17, 2014
१२९७. इन्दुं निन्दति तस्करो गृहपतिं जारो सुशीलं खलः साध्वीमप्यसती कुलीनमकुलो जह्याज्जरन्तं युवा |
विद्यावन्तमनक्षरो धनपतिं नीचश्च रूपोज्वलं वैरूप्येण
हतः प्रबुद्धमबुधो कृष्टं निकृष्टो जनः ||
अर्थ
चोर चंद्राला नाव ठेवतो; जार [प्रेयसीच्या] नवऱ्याची निंदा करतो; दुष्ट सज्जनांना नाव ठेवतो; कुलटा गर्तीच्या स्त्रीची निंदा करते; हलक्या कुळातला घरंदाज माणसाला सोडून जातो; तरुण म्हाताऱ्यांची सांगत सोडतो; अडाणी सुशिक्षिता जवळ रहात नाही; गरीब श्रीमंताजवळ टिकत नाही; कुरूप व्यक्ती देखण्याची निंदा करते; मंद माणूस हुशार व्यक्तीची निंदा करतो [तात्पर्य] गुणांनी निकृष्ट आपल्यापेक्षा गुणी माणसाचा मत्सर करतो.

Monday, June 16, 2014
१२९६. तटस्थैः ख्यापिताश्चेतो विशन्ति गुणिनां गुणाः |
उत्कोचितानां पद्मानां गन्धो वायुभिराहृतः ||
अर्थ
गुणी लोकांच्या गुणांच; तिऱ्हाईतानी गुणवर्णन केल्यावर [श्रोत्याच्या] मनात त्याच कौतुक वाटायला सुरवात होते. [आपले आपण गुण सांगितले तर कुणाला खात्री वाटत नाही,] जसं की उमललेल्या कमळांचा सुगंध जेंव्हा वारा वाहून नेतो तेंव्हाच सगळीकडे पसरतो. [कमळ स्वतः सांगत नाहीत ]

१२९५. यस्मै ददाति विवरं भूमिः फुत्कारमात्रभीतेव |
आशीविषः स दैवाड्डौम्बकरण्डे स्थितिं सहते ||
अर्थ
ज्यानी केवळ फूत्कार सोडल्यावर जमीनसुद्धा भ्याल्याप्रमाणे त्याला वारुळाला जागा देते, असा [खरं तर सामर्थ्यवान] ज्याच्या दाढेमध्ये विष आहे असा [साप] दुर्दैवाने डोम्बाऱ्याच्या करंडीत वेटोळ करून आयुष्य [रखडत रखडत] घालवतो. [दुर्दैवाने सामर्थ्यवान माणसाला सुद्धा वाईट दिवस येतात.]

Thursday, June 12, 2014
१२९४. राजंस्त्वत्कीर्तिचन्द्रेण तिथयः पूर्णिमाः कृताः |
मद्गेहान्न बहिर्याति तिथिरेकादशी भयात् ||
अर्थ
हे राजा तुझ्या कीर्तिरूप चंद्राने [सर्व] तिथ्या पौर्णिमा बनवल्या आहेत. [तुझी परिपूर्ण कीर्ती पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, त्यामुळे सतत पौर्णिमाच ] [आता माझी मात्र उपासमार {एकादशी } रोजच तर जणू काही हि एकादशी] माझ्या घराबाहेर [पडली तर तिची पण पौर्णिमा होईल या] भीतिनी ती माझ्या घरातून बाहेर पडत नाही. [माझी गरिबी हटत नाही तर तूच बघ आता माझ्याकडे.]

१२९३. यथोर्ध्वाक्षः पिबत्यम्बु पथिको विरलाङ्गुलिः |
तथा प्रपापालिकापि धारां वितनुते तनुम् ||
अर्थ
[पाणपोईवर आलेला] वाटसरू नजर वर [पाणपोईवरच्या सुंदरीकडे] लावून [जास्त वेळ उभं राहता यावं म्हणून] बोट [पाणी गळून जावं यासाठी] लांब ताणतो, तर [भेट अधिक वेळ टिकावी म्हणून] सुंदरी सुद्धा धार अगदी लहानलहान करत जाते.

Tuesday, June 10, 2014
१२९२. कुदेशमासाद्य कुतोऽर्थसंचयः कुपुत्रमासाद्य कुतो जलाञ्जलिः |
कुगेहिनीं प्राप्य गृहे कुतः सुखं कुशिष्यमध्यापयतः कुतो यशः ||
अर्थ
अयोग्य प्रदेशात वास्तव्य केल्यास पैसे कसे साठणार? मुलगा वाईट [असंस्कृत] असला तर श्राद्ध कोण करणार [म्हातारपणी शांतता सुख कुठलं मिळायला?] पत्नी चांगली [गुणी आणि अनुकूल] नसेल तर घरात सुख कसलं मिळतय? वाईट [शिकवण्याकडे; अभ्यासाकडे लक्ष न देणारे दंगिष्ट] विद्यार्थी शिकवत राहिल तर कीर्ति कसची मिळणार?

Subscribe to:
Posts (Atom)