भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, August 21, 2012

७६३. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: |

जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च पूजिता: ||

अर्थ

जननी [आई], जन्मभूमी [मायदेश], जाह्नवी [गंगानदी], जनार्दन [विष्णु], जनक [वडिल] या पाच "ज" ने सुरु होणाऱ्या गोष्टींची [नेहमी] पूजा करावी. [त्यांना मान देऊन त्यांची सेवा करावी.]

2 comments:

Anonymous said...

जंम्बुफलभ्रांत्या पतती अलि....

पलाशमुकुलभ्रांत्या .....



असे एक सुभाषित पुसटसे आठवते.

त्याआ अर्थ असा आहे की... पळसाच्या झाडावरबसलेल्या पक्ष्याच्या नजरेला भुंगा पडतो, तो त्याच्याकडे जांभूळ म्हणून झेपावतो, तर त्याचवेळी भुंग्याच्या नजरेस, त्याचा पक्ष्याची चोच पडते, त्याला ती चोच म्हणजे पलाशमुकुल म्हणजेच कळा / तुरा वाटतो. पण ह्यात त्या भुंग्याचाच नाश होतो..

हे सुभाषित प्रकाशित करावे.. मी सांगितलेला शब्दशः अर्थ आहे. पण अजून एक सुप्त अर्थ आहे तो सांगावा.


सुभाषित संग्रहाचा उपक्रम सुंदर आणि स्तुत्य आहे. आता नियमीत वाचेन..

कपिल काळे

R N Dubey said...

हिंदी में अर्थ बतायें