प्रतिकलमनुकर्षन्येन कीरो निषिद्धः स भवतु मम भूत्यै वाणि ते मन्दहासः ||
अर्थ
हे सरस्वती देवी; कमलाप्रमाणे असणाऱ्या [सुंदर] हातातील स्फटिकाची
जपमाळ [तुझ्या गुलाबी] नखातून पडलेल्या किरणामुळे [मालेचा मणी] डाळिंबाचा
दाणा आहे असं वाटल्याने प्रत्येक क्षणी त्यावर चोच मारणाऱ्या [तुझ्या
हातातल्या] पोपटाला तुझ्या ज्या स्मितहास्याने अडवलं ते माझी भरभराट करो.
[देवीच्या तांबूस नखावरील किरण जपमालेवर पडल्यामुळे ति डाळिंबाच्या
दाण्याप्रमाणे भासली व पोपट टोचू लागला साहजिक देवीला हसू आलं त्यामुळे
तिच्या शुभ्र दंतकळ्या मधून परावर्तित झालेले शुभ्र किरण मण्यावर पडले आणि
पोपटाला हे स्फटिकाचे मणी आहेत हे समजलं मग तो चोच मारायचं थांबला.]
1 comment:
सौ,केळकरमहाभागायाः हार्दं अभिनन्दनम्...........
Post a Comment