अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन प्रसीदेत्याक्रोशन्निमिषमिव नेष्यामि दिवसान् ||
अर्थ
स्वर्धुनी गंगेच्या काठी; वल्कले परिधान करून; डोक्यावर [नम्रपणे
भक्तिपूर्वक] हातानी नमस्कारासाठी अंजली धारण करत हे शंकरा; पार्वतीपती;
त्रिपुरारी; त्र्यंबका असा भगवंताच्या नामाचा जप करत एका क्षणाप्रमाणे मी
आयुष्य कधी बरं घालवीन?
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, February 27, 2014
१२१८. वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् |
यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ||
अर्थ
झाड तोडून; प्राण्यांना मारून; रक्ताचा चिखल करून [या नरकात पडण्यासारख्या सद्गुणांमुळे{?}] जर स्वर्गात जाता येत असेल तर नरकात कोण जातो?

Wednesday, February 26, 2014
१२१७. रोलम्बैर्निमितं गृहं विघटितं धूमाकुलै: कोकिलैर्मायूरैश्चलितं पुरैव रभसा कीरैरधीरैर्गतम् |
ऐकेनापि सपल्लवेन तरुणा दावानलोपद्रव: सोढ: को न विपत्सु
मुञ्चति जनो मूर्ध्नापि यो लालितः ||
अर्थ
भुंगे निघून गेले; धुरानी त्रासलेल्या कोकीळानी घरे मोडली; मोर आधीच पळाले. धास्तावलेले पोपट तर जोरात पळाले; वणवा पेटल्यावर एकट्या पर्णायुक्त वृक्षानी त्या वणव्याच्या यातना सोसल्या. अगदी लाडानी डोक्यावर घेतलं [त्या साऱ्या पाखरांना] तरी, संकटामध्ये कोण बरे साथ करतो?

Monday, February 24, 2014
१२१६. गुणानामन्तरं प्रायस्तज्ञो वेत्ति न चापरः |
मालतीमल्लिकाऽमोदं घ्राणं वेत्ति न लोचनम् ||
अर्थ
त्या त्या गोष्टीतला ज्ञान्याला त्यातलं बिनचूक कळत इतरांना ते समजत नाही. मालतीचा सुवास नाकालाच कळतो डोळ्याला नाही.

Saturday, February 22, 2014
१२१५. कपाले मार्जार: पय इति करांल्लेढि शशिनस्तरुछिद्रप्रोतान्बिसमिति करी संकलयति |
रतान्ते तल्पस्थान्हरति वनिताप्यंशुकमिति प्रभामत्तश्चन्द्रः
जगदिदमहो विप्लवयति ||
अर्थ
चांदण्याचा वर्षाव करून हा चन्द्र सगळ्या जगाला वेगळेच भास घडवतोय, मडक्यातले चांदण्याचे किरण दूधच समजून मांजर ते चाटतय. झाडाच्या ढोलीतले किरण, हत्ती कमळ तंतू म्हणून गोळा करतोय. एक सुंदरी पलंगावरच चांदणच वस्त्र म्हणून पांघरतेय. [भ्रांतीमान अलंकाराच उदाहरण]

Thursday, February 20, 2014
१२१४. शाठ्येन धर्मं कपटेन मित्रं परोपतापेन समृद्धिभावम् |
सुखेन विद्यां परुषेण नारीं वाञ्छति ये व्यक्तमपण्डितास्ते ||
अर्थ
लबाडी करून धर्म केला असं ज्यांना वाटत ते मूर्ख आहेत हे अगदी उघड आहे. तसंच कपट करून मित्र मिळेल; दुसऱ्याला त्रास देऊन भरभराट होईल; विद्या कष्टांवाचून मिळेल; कठोरपणे वागून एखादी बाई वश होईल; अशी इच्छा करणारे अगदी निश्चित मूर्ख असतात.

Wednesday, February 19, 2014
१२१३. सप्रतिबन्धं कार्यं प्रभुरधिगन्तुं सहायवानेव |
दृश्यं तमसि न पश्यति दीपेन विना सचक्षुरपि ||
अर्थ
[माणूस] सामर्थ्यवान असलातरी अडथळे असलेले [अडचणी असलेल] काम पूर्ण करायला मदतनीस [चांगले मित्र; हितचिंतक] असले तरच शक्य होत. चांगले डोळे असले तरी अंधारात दिव्याशिवाय दिसू शकत नाही.

Subscribe to:
Posts (Atom)