प्रभुर्धनपारायण: सततदुर्गत: सज्जनो नृपाङ्गणगत: खलो मनसि सप्त शल्यानि मे
|| नीतिशतक भर्तृहरी
अर्थ
दिवस सुरु झाल्यावर फिकट झालेला चन्द्र;
तारुण्य निघून गेलेली सुंदरी; कमळे नसलेले तळे; देखण्या माणसाचे अशिक्षित
असणे; पैशाच्या मागे लागलेला मालक; नेहमी वाईट स्थितीत गेलेला सज्जन
माणूस आणि राजदरबारी असलेला दुष्ट, हे माझ्या मनात [सलत राहणारे] सात काटे
आहेत.
No comments:
Post a Comment