भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, May 27, 2010

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |

१६४. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् |
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ||

अर्थ

सर्वच जुन्या गोष्टी चांगल्या नसतात किंवा नवीन आहे म्हणून वाईट पण नसतात. सज्जन लोक विचारपूर्वक त्यापैकी जे चांगलं असेल त्याची निवड करतात. मूर्ख मात्र दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे [चांगलं वाईट] ठरवतात.

मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या नाटकातील पहिल्या अंकातला हा श्लोक आहे.

1 comment:

Unknown said...

श्लोक लिहितांना एक शब्द गाळला गेला आहे असे वाटते. पहिली ओळ " पुराणमित्येव न साधु सर्वं, न चापि काव्यं नवमित्यवद्यम् " अशी पाहिजे. 'काव्यं 'शब्द गाळला गेला आहे. तो कृपया त्याजागी टाकावा ही विनंति.