रत्नानां निचयाःप्रवालमणयो
वैदूर्यरोहः क्वचिच्छम्बुकाः किमु सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||
अर्थ
[बगळे नवीन आलेल्या पक्ष्याला पाहून विचारतात] तांबडे तांबडे डोळे, तोंड [चोच] आणि पाय असणारा तू कोण आहेस? " कोण बरे तू ?"; "हंस "; "कुठून आलास बरं?"; "मानससरोवरातून "; "तिथ काय असत?"; " तिकडे ना
सोनेरी कमळांचे ताटवेच्या ताटवे. अमृतासारखं पाणी. रत्नांच्या राशीच असतात.
कुठे कुठे वैदूर्याचे कोंबसुद्धा मिळतात." [इतकं वैभव ऐकून परत बगळे
विचारतात] "शिंपले असतात का रे ?"; "नाही बाबा" हे ऐकून बगळे खदाखदा हसले.
[काय एकेकाची आवड असते.]
No comments:
Post a Comment