अहं करोमीति वृथाभिमान: स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोक: ||
अर्थ
[आपल्याला] सुख किंवा दु:ख कोणी [दुसरा] देत नसतो, हे [दु:ख] मला
दुसऱ्याने भोगायला लावले ही विचारसरणी चुकीची आहे. 'मी [मोठा] कर्तृत्ववान
आहे ' असं वाटणं हा खोटा गर्व आहे. माणूस हा स्वतः पूर्वी केलेल्या [संचित]
कर्माच्या धाग्याने बांधलेला असतो. [आपले भोग असतात; त्यामुळे कुणाला तरी
आपल्याला त्रास देण्याची बुद्धी होते. तसंच आपण अगदी करायचं म्हटलं तरी सर्व
काम होतातच अस कुठे आहे? आपण आपल्याला जमेल तेवढा चांगला प्रयत्न करावा
आणि परमेश्वरावर हवाला ठेवावा. दुसऱ्यांनी त्रास दिला म्हणून बदला घ्यायला
जाऊ नये.]
1 comment:
दधातीति means?
Post a Comment