एते हि दैवहतकस्तदभिन्नवर्णं त्वां काकमेव कलयन्ति कलानभिज्ञा: ||
अर्थ
अरे मित्रा कोकिळा, या बहिऱ्यांच्या वस्तीमध्ये; खरंतर तुझ्या कोमल
कूजनाचा काय बर उपयोग? कलांची जराही ओळख यांना नसल्यामुळे [आणि
श्रवणशक्तीच्या अभावामुळे] हे दुर्दैवी लोक त्याच [काळ्या] रंगाचा तू असल्यामुळे कावळा आहेस असंच समजतील. [ कोकिलान्योक्ती - कोकीळ = कुठल्या
तरी कलेमध्ये निष्णात; बहिरा ॥ श्रोतृवृंद= अरसिक ]
3 comments:
श्रोतृवृंद= अरसिक ???
मला वाटतं श्रोतृवृंद म्हणजे श्रोत्यांचा समुह.
[ कोकिलान्योक्ती - कोकीळ = कुठल्या तरी कलेमध्ये निष्णात; बहिरा ॥ श्रोतृवृंद= अरसिक ]
ही ओळ वाचलीत तर अर्थ कळेल.
"येथे समस्त बहिरे बसतात लोक ... " यावरूनच आहे का?
Post a Comment