भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, September 21, 2012

७९३. अस्यां सखे बधिरलोकनिवासभूमौ किं कूजितेन खलु कोकिल! कोमलेन |

एते हि दैवहतकस्तदभिन्नवर्णं त्वां काकमेव कलयन्ति  कलानभिज्ञा: ||

अर्थ

अरे मित्रा  कोकिळा,  या बहिऱ्यांच्या वस्तीमध्ये; खरंतर  तुझ्या कोमल कूजनाचा काय बर उपयोग? कलांची जराही ओळख यांना नसल्यामुळे [आणि श्रवणशक्तीच्या अभावामुळे] हे दुर्दैवी  लोक त्याच [काळ्या] रंगाचा  तू असल्यामुळे  कावळा आहेस असंच समजतील.  [ कोकिलान्योक्ती - कोकीळ = कुठल्या  तरी कलेमध्ये निष्णात; बहिरा ॥  श्रोतृवृंद= अरसिक ]

3 comments:

Anonymous said...

श्रोतृवृंद= अरसिक ???
मला वाटतं श्रोतृवृंद म्हणजे श्रोत्यांचा समुह.

मिलिंद दिवेकर said...

[ कोकिलान्योक्ती - कोकीळ = कुठल्या तरी कलेमध्ये निष्णात; बहिरा ॥ श्रोतृवृंद= अरसिक ]
ही ओळ वाचलीत तर अर्थ कळेल.

Gouri said...

"येथे समस्त बहिरे बसतात लोक ... " यावरूनच आहे का?