पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित: पृथिव्या इव मानदण्ड: ||
अर्थ
उत्तर दिशेला; पृथ्वी मोजण्यासाठी प्रमाणभूत मानकच जणू काही असा; सर्व
पर्वतांचा सम्राट; देवताचा आत्म्याप्रमाणे असलेला [दैवी शक्तीअसणारा; पवित्र; सात्विक असा; देवतांचे निवासस्थान असणारा], हिमालय पर्वत पूर्व
आणि पश्चिम [बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर] समुद्रामधे अवगाहन करून उभा आहे.
आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करतात.
कालीदासाबद्दल अशी आख्यायिका आहे - विद्वत्तमा नावाची नावाप्रमाणे असणारी
राजकन्या स्वयंवरासाठी असा पण लावते की जो तिला वादात हरवील त्याच्याशी ती
विवाह करील. जे हरत त्यांचा ती खूप अपमान करत असे. याचा प्रधानाला राग आला
आणि त्याने एका मूर्खाला पकडून त्याचं मौन चालू आहे तेंव्हा खुणांनी वाद कर
असे सांगितले आणि त्याच्या खुणांच्या उत्तरांचा आपल्याला सोयीस्कर असा
उत्तम अर्थ लावणारे पण्डित त्याच्या मागे ठेवले आणि मग तो विजयी झाला. मग
अर्थातच तिनी त्याच्याशी लग्न केलं.
पण तिला लवकरच हा मूर्ख आहे हे तिच्या लक्षात आलं.
मग तिने अपमान केल्यामुळे दुखावलेल्या त्या तरुणाने काली देवीची उपासना
केली तो विद्वान होऊन परत आला. पण त्याला तिनी पहिलाच प्रश्न विचारला; 'अस्ति कश्चित् वाग्विशेष:' [तुमच्या वाणीमध्ये काही वैशिष्ठय {सौंदर्य}
प्राप्त झाले काय?] ते सौंदर्य ज्यात अप्रतिम आहे अशा काव्यांची त्यांनी
रचना केली. त्यात "अस्ति 'नी सुरु होणारा कुमारसंभव मधिल पहिला श्लोक.
No comments:
Post a Comment