७०९. वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये |
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ || रघुवंश १
अर्थ
[मी] शब्द आणि अर्थ यांचे सम्यक आकलन होऊन [मनोहर काव्यनिर्मिती
व्हावी म्हणून] शब्द आणि अर्थ जसे एकमेकात सामावलेले असतात त्याप्रमाणे
समरस असलेल्या; सर्व जगाचे माता पिता असलेल्या देवी पार्वती आणि भगवान
शंकर यांना वंदन करतो.
No comments:
Post a Comment