भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, April 17, 2010

७६. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|

७६. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम:||

अर्थ

ज्याप्रमाणे एखाद लाकूड आणि दुसर लाकूड महासागरात जवळ येतात. जवळ आल्यावर [काही वेळाने] दूर जातात.  [ते लाटा, भरती, ओहोटी वगैरे गोष्टींवर अवलंबून  असते] त्याप्रमाणे प्राण्यांचा सहवास असतो.  हा श्लोक महाभारतातील आहे.

2 comments:

Unknown said...

हेच अप्रतिम काव्य रूपात गदिमा यांनी लिहिले " दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ ".

श्रीहरी गोडबोले said...

This Slok must be be out of Ramayana - This was said said by Lord Rama when Bharat comes to meet him and finally ends up taking Rama's Paduka to Ayodhya