यथा समुद्रेऽपि च पोतभङ्गे सांयात्रिको वाञ्छति तर्तुमेव ||
अर्थ
[कितीही] वाईट परिस्थिती आली तरी धीर सोडू नये. [गळाठून गेला तर
आत्ताच नष्ट होईल पण] धीर एकवटून राहील तर केंव्हा तरी त्याला [संकटातून]
बाहेर पडता येईल. समुद्रात जहाज फुटलं तरी सुद्धा [इतक्या अवघड परिस्थितीत
असूनही] नावाडी [पोहून; फळकुटाला धरून; कोणाच्यातरी मदतीने] समुद्र
कसातरी पार करण्याची इच्छा करतो.
No comments:
Post a Comment