चक्रेश: सुरराजतां सुरपति: ब्राहमं पदं
वाञ्छति ब्रह्मा विष्णुपदं हरि: शिवपदम् आशावधिं को गत: ||
अर्थज्याच्याजवळ काहीच नाही तो शंभर [रुपयाची नाणी तरी] मिळावी अशी इच्छा करतो. ज्याच्याजवळ शंभर आहेत त्याला त्याच्या दसपट मिळावे अस वाटत. हजार असतील त्याला लाख मिळावे असं वाटत. [हा फार जुन्या काळातील श्लोक असल्यामुळे लाख हेच भरपूर आहेत अस कवीला वाटतंय.] लक्षधीशाला आपण राजा असाव असं वाटत. [मांडलिक] राजाला चक्रवर्ती राजा व्हाव असं वाटत. चक्रवर्ती राजाला देवांचा राजा [इंद्र] व्हाव असं वाटत. इंद्राला ब्रह्मदेव असाव असं वाटत. ब्रह्मदेवाला विष्णु व्हायला पाहिजे असं वाटत विष्णु देवाला भगवान शंकर व्हावं असं वाटत. [खरी गोष्ट म्हणजे] आशा [खरं तर हाव] कुणाची बर शान्त झालीय? [सगळे आशेचे दास आहेत.]
No comments:
Post a Comment