अन्धस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसङ्गः ||
अर्थ
अगदी उत्कृष्ट अन्न मिळालं तरी गाढव किंवा डुक्कर यांना त्याची काय चव
लागणार? [त्यांना ते गोड लागणार नाही] पशू आणि पक्षी यांना रत्नाच्या
हाराची किंमत कळणार नाही. दृष्टीहीनाला दिव्याचा उपयोग नसतो. बहिऱ्याला
मधुर संगीताची गोडी समजणार नाही. अगदी तसच मूर्ख माणसाला शास्त्रसिद्ध
गोष्टी सांगून त्याला त्याच काहीच महत्व वाटणार नाही.
No comments:
Post a Comment