भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, January 7, 2013

८८७. यावज्जीवं सुखं जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |


भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||
चार्वाक [नास्तिक आणि सदसद्विवेकबुद्धी नसणाऱ्या लोकांचा मोठा आचार्य ]

अर्थ

जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मजेत; आरामात रहावं. कर्ज काढून [त्या पैशानी चैन करीत] तूप प्यावं. [ते काही फेडावं लागणार नाही कारण मेल्यावर] एकदा का शरीराची राख झाली की पुन्हा [प्रायश्चित्त] कुणाला घ्यावं लागणार आहे?

2 comments:

Anonymous said...

नास्तिक म्हणजे सदसद्विवेकबुध्दी नसणारे असे आपण कसे म्हणू शकता? कुठला नास्तिक कधी भोंदूबुवाच्या नादी लागताना दिसत नाही!

आणि श्लोकाचा अर्थ खूप चुकीचा लावलाय असे दिसतय.
"जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखाने जागावं, प्रसंगी वाटलंच तर कर्ज काढून आनंद साजरा करावा (तूप प्यावं), (कारण) एकदा का देहाची राख झाली की परत येणे नाही (आयुष्य परत मिळणार नाही)

ह्यात कर्ज फेडू नये किंवा दुसर्याला फसवा असे चार्वाक कुठेही सुचवत नाही. केवळ आपल्या विचारांशी त्याचे विचार जुळत नाहीत म्हणून त्याची निर्भत्सना करणे हे बरोबर नाही.

K P said...

आपला ईमेल पत्ता या ब्लॉगवर कोठेही दिसत नाही. कोठे आहे, हे कळवावे.